Onion being transported to cold storage at Shahapur after irradiation at Bhabha Nuclear Research Center at Lasalgaon. esakal
नाशिक

Nashik: 700 टन कांद्यावर झाली किरणोत्सर्ग प्रक्रिया! भाभा अणुसंशोधन केंद्रावर वाढवणार कांद्याची टिकवणं क्षमता

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : सध्या देशभरात टोमॅटोच्या तुटवड्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता, बाजारात कांद्याचा पुरवठा व्यवस्थित सुरू राहावा म्हणून केंद्र सरकारने विशेष दक्षता बाळगली आहे.

काढणीनंतरच्या नुकसानीपासून संरक्षण करण्यासाठी केंद्र सरकार नवीन तंत्रज्ञानावर काम करत आहे. लासलगाव येथील भाभा अणुसंशोधन केंद्रात (BARC) कांदा विकिरणाची प्रक्रिया सुरू आहे.

येत्या काही दिवसात कांद्याचे दर आवाक्याबाहेर जाऊ शकतील म्हणूनच सरकारने कांद्यावरच प्रथम इरिडिएशन तंत्रज्ञानाची चाचणी सुरू केली आहे.

जेणेकरून त्याचे शेल्फ लाइफ वाढवता येईल. आतापर्यंत लासलगाव येथील केंद्रावर ७०० टन कांद्यावर प्रक्रिया केली असल्याची माहिती प्रकल्प अधिकारी संजय आहेर यांनी दिली. (700 tons of onions were treated with radiation storage capacity of onions will be increased at Bhabha Nuclear Research Center Nashik)

कांदा खराब न होता दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी भाभा अणुसंशोधन केंद्राच्या (बीएआरसी) मदतीने त्यावर किरणोत्साराची प्रक्रिया करण्यात येत आहे. आशिया खंडात कांद्याचे आगार म्हणून लासलगावची ओळख आहे.

येथील केंद्रात कांद्यावर प्रक्रिया सुरू झाली आहे. मार्च ते मे महिन्यात वाढलेले तापमान, मॉन्सूनच्या आगमनास झालेला विलंब यामुळे यंदा बाजारात टोमॅटोचा तुटवडा निर्माण झाला असून, त्याचे भावात वाढ झाली आहेत. तशी परिस्थिती कांद्याच्या बाबतीत उद‌्भवू नये म्हणून केंद्र सरकारने पावले उचलण्यास सुरवात केली आहे.

कांदा बदलत्या वातावरणामुळे खराब होत असल्याने भविष्यात कांद्याच्या बाजारभावात वाढ झाल्यास चांगला कांदा हा ग्राहकांना कसा भेटेल यासाठी आता केंद्र सरकारच्या ग्राहक संरक्षण विभागातर्फे कांद्याचे बाजारभाव वाढल्यास ग्राहकांना दिलासा देण्यासाठी कांद्यावर विकिरण प्रक्रिया करून कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतल्याने यावर आता काम सुरु झाले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

लासलगाव येथील भाभा अणू संशोधन केंद्रात आतापर्यंत सातशे मेट्रिक टन कांद्यावर विकिरण प्रक्रिया केली आहे. त्यानंतर तो शहापूर येथील कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवला जात आहे. तेथील कोल्ड स्टोरेजची क्षमता पूर्ण झाल्यानंतर नाशिक येथील अंबडला साठवला जाणार आहे.

नव्याने बांधण्यात येत असलेल्या कोल्ड स्टोरेजचे काम प्रगतिपथावर असल्याने लवकरच पूर्ण होणार आहे, यामुळे लासलगाव येथील कोल्ड स्टोरेजमध्ये कांदा साठवला जाणार आहे

इरॅडिएशन तंत्रज्ञान काय आहे0

कोणताही खाद्यपदार्थ किंवा पॅकेजच्या वस्तू गॅमा किरण आणि क्ष-किरण इलेक्ट्रॉन किरणांच्या रेडिएशनमध्ये येण्याला विकिरण म्हणतात.

इरिडिएशन प्रक्रियेमुळे कांद्याला अंकुर येत नाहीत. त्यांची सडण्याची शक्यता कमी होते आणि कांद्याची टिकवणं क्षमता वाढते. याला विकिरण तंत्रज्ञान असेही म्हणतात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India reaction to Sheikh Hasina death sentence : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या फाशीच्या शिक्षेवर भारताची पहिली प्रतिक्रिया!

Kagal Nagarparishad Election : हसन मुश्रीफ-समरजित घाटगे एकत्र; कागल नगरपरिषद बिनविरोध करण्याचा संकल्प

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अर्ज भरायला जाताना ‘या’ उमेदवारास १०० पोलिसांचा बंदोबस्त; पहाटे ५.३० वाजता उमेदवार नगरपंचायतीत, अनगरची बिनविरोधाची ६५ वर्षांची परंपरा खंडीत

Ladki Bahin Yojana eKYC Deadline Extension: मोठी बातमी! लाडक्या बहिणींना सरकारकडून दिलासा; अखेर eKYC साठी जाहीर केली मुदतवाढ

Crime: सासरा आणि सूनेचं प्रेम जडलं; अडसर ठरणाऱ्या मुलाचा काटा काढला, मात्र एका चुकीनं बाप पोलिसांच्या जाळ्यात अडकला

SCROLL FOR NEXT