tricolour unity rally hosted 75 feet indian flag
tricolour unity rally hosted 75 feet indian flag  esakal
नाशिक

वणी येथे तिरंगा एकता रॅलीत फडकला 75 फुट लांबीचा तिरंगा

दिगंबर पाटोळे, सकाळ वृत्तसेवा

वणी (जि. नाशिक) : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्त नाशिक ग्रामिण पोलिस व वणी पोलिस ठाण्याच्या वतीने आयोजन करण्यात आलेल्या 'तिरंगा एकता रॅलीस नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. भारत माता की जय, वंदे मातरम चा जयघोष, डीजीवरील देशभक्तीपर गीत, विद्यालयांचे ढोल पथक यांच्या निनादात निघालेल्या रॅलीने वणी ग्रामस्थांमध्ये देशभक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. (75 feet long indian flag was hoisted in tricolor unity rally at Wani nashik Latest Marathi News)

नाशिक जिल्हा ग्रामिण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख उपस्थित आयोजित केलेल्या केलेल्या एकता रॅलीत शहर व पंचक्रोशीतील सर्वपक्षीय नेतेमंडळी, ग्रामस्थ विविध शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थी मोठ्या उत्साहाने रॅली मध्ये सहभागी झाले होते. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, कादवा कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे, दिंडोरीचे तहसीलदार पंकज पवार, उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल गायकवाड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दत्तात्रय पाटील, गणपत पाटील अन्य सर्वपक्षीय व सर्वधर्मीय मान्यवरांच्या उपस्थीतीत रॅलीचे उद्घाटन झाले.

बिरसा मुंडा चौक येथून रॅलीच्या प्रारंभ करण्यात आला. रॅलीच्या सुरुवातीला पोलिस वाहनांचा ताफा, घोडयावर स्वार होवून हातात तिरंगा फडकावणारे युवक, डिजेवर लावलेले देशभक्ती गीते, तिरंगी फुग्यांनी सजवलेली जिप्सी, पांढऱ्या रंगाचे टि शर्ट घालून ७५ फुट लांबीचा तिरंगा पकडून सहभागी झालेले युवक रॅलीत लक्षवेढी ठरले.

भारत माता की जय, वंदे मातरम् च्या घोषणांनी अवघे वणी शहर निनादून गेले होते. देश भक्तीपर गीतांच्या तालावर उपस्थीतांचे पाय थिरकत होते. रॅली मार्गावर ठिकठिकाणी काढण्यात आलेली आकर्षक रांगोळी, रॅलीवर ठिकठिकाणी फुल पाकळ्यांचा वर्षाव, रॅलीचे चौकाचौकात नागरिकांकडून होणारे स्वागत, संताजी चौकात तिरंगा फुग्यांनी केलेली आरास, घराघरावर लावलेले तिरंगा ध्वज तसेच मुस्लिम बांधवांनी मस्जिद चौकात केलेले रॅलीचे स्वागताने वणी शहरात एकात्मता व देशभक्तिचे अनोखे दर्शन घडले.

सदर रॅली ग्रामपंचायत कार्यालय, संताजी चौक, शनी मंदिर, जैन गल्ली, देवी मंदिर, शनी गल्ली, पांचाळ गल्ली, शिंपी गल्ली, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौक, मोठा कोळीवाडा, पिंपळगाव मार्ग अशी जाऊन वणी पोलीस स्टेशन येथे राष्ट्रगीताने रॅलीची सांगता झाली. सांगते प्रसंगी पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी हवेत तिरंगी रंग असलेले फुगे सोडले व उपस्थित नागरिक व विद्यार्थ्यांचे आभार मानले.

दरम्यान सचिन पाटील यांच्यासोबत सेल्फी अथवा फोटो काढण्यासाठी उपस्थितांनी गर्दी केली होती. श्री पाटील यांनी देखील जनभावनेचा आदर करून उपस्थितांना प्रतिसाद दिला. रॅलीच्या प्रारंभापासुन ते अखेर पर्यंत पोलिस अधिक्षक सचिन पाटील हे रॅली सोबत पुर्णवेळ चालल्याने वणीकरांनी पाटील यांचे कौतुक केले तर दुसऱ्या बाजुला निवडनुकांच्या प्रचार फेऱ्यामध्ये उन्हा तान्हात गावोगावी प्रचारासाठी पायी फिरणाऱ्या लोकप्रतिनीधींंनी मात्र रॅलीला प्रारंभ करुन नंतर काढता पाय घेतल्यामुळे उपस्थितांनी नाराजी व्यक्त केली.

रॅलीत वणी महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, के. आर. टी. हायस्कूल, संताजी इंग्लिश मेडीयम स्कूल, किसनलालजी बोरा इंग्लिश मे़डीयम स्कूल, स्व. दिनकरारव थोरात आदर्श प्राथमिक शाळा तसेच जिल्हा परिषद शाळांचे विद्यार्थी, शिक्षक, पोलिस पाटील, व्यापारी, पत्रकार संघ, डॉक्टर्स असोसिएशन, विविध संस्था, संघटना, मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

रॅली यशस्वी करण्यासाठी वणी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्नील राजपूत, पोलिस उपनिरीक्षक प्रविण उदे, रतन पगार, भरसट आदींसह पोलिस कर्मचारी यांनी प्रयत्न केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील, आम्हालाही तसाच नेता हवा.. पाकिस्तानी अब्जाधीशाने उधळली स्तुतीसुमनं

IPL 2024 : 18 मे रोजी होणारा RCB Vs CSK सामना पावसामुळे रद्द झाला तर… प्लेऑफसाठी कोण ठरणार पात्र?

Car Care: कडक उन्हात कार आतील बाजूस थंड ठेवण्यासाठी आजच करा 'या' 5 गोष्टी

Shirur Lok Sabha : मतांचा टक्का घसरल्यामुळे भल्याभल्यांचे अंदाज चुकणार... शिरूरमध्ये घड्याळ चालणार की तुतारी वाजणार?

Cannes Film Festival 2024 : कान्स फिल्म फेस्टिव्हलला मेरील स्ट्रीप यांचा सन्मान ; आईला केला पुरस्कार समर्पित

SCROLL FOR NEXT