burglary
burglary esakal
नाशिक

Nashik Crime News : दोन दिवसात 8 घरफोड्यांचे गुन्हे दाखल!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शहरात गेल्या दोन दिवसात घरफोडीचे आठ गुन्हे दाखल झाले आहेत. वाढत्या चोऱ्या-घरफोड्यांमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. रोहित संजय दिघे (रा. शिवनेरी नेस्ट, औरंगाबाद रोड) यांच्या फिर्यादीनुसार, अज्ञात चोरट्याने सोमवारी (ता.१९) चावीने दरवाजाचे कुलूप उघडून घरात प्रवेश केला आणि घरातील कपाटातील ४५ हजार रुपयांचे सोन्याची चैन व १५ हजार रुपयांची सोन्याचे डोरले असा ६० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी आडगाव पोलिसात घरफोडीचा गुन्हा दाखल झाला आहे. (8 burglary cases registered in two days Nashik Crime News)

दुसरी घरफोडी इंदिरानगरमध्ये घडली. अभिजित गोविंद तेलंग (रा. योगेश्वर धाम अपार्टमेंट, इंदिरानगर) यांच्या फिर्यादीनुसार, सोमवारी (ता. १९) दुपारी बंद घरातून चोरट्यांनी घरातून १ लाख ६६ हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात घरफोडीचा गुन्हा दाखल झाला आहे.

तिसरी घटना सातपूर औद्योगिक वसाहतीत घडली. सागर सतीश आंबेकर (रा. वृंदावन बंगला, विधातेनगर, पंचवटी) यांच्या फिर्यादीनुसार, श्रीदत्त इंडस्ट्रीज या कंपनीच्या संरक्षण भिंतीवरून तिघा चोरट्यांनी कंपनीत प्रवेश केला आणि ७२ हजारांच्या लोखंडी प्लेट चोरून नेल्या. याप्रकरणी सातपूर पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

दागिन्यांवर नोकरानेच मारला डल्ला

गंगापूर रोड परिसरातील दातेनगरमध्ये नोकरानेच घरातील साडेचार लाख रुपयांचे दागिने चोरून नेल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी संशयित नोकर सनी शंकर गरड (२३, रा. आनंदवल्ली) यास अटक केली आहे.

स्तुती रचित जुनेजा (रा. दातेनगर) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांच्या बंगल्यात संशयित सनी गरड व त्याची पत्नी कामाला होते. संशयित सनी याने १६ नोव्हेंबर ते ९ डिसेंबर या दरम्यान घरातील कपाटातून ४ लाख ५३ हजार रुपयांचा दागिने चोरून नेले. याप्रकरणी गंगापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, उपनिरीक्षक संजय भिसे हे तपास करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Swati Maliwal Assault Case : केजरीवालांच्या निवासस्थानातून पोलिसांनी CCTV DVR केलं जप्त; पुरावे गोळा करुन टीम रवाना

Video: राहुल गांधी-अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ, दोन्ही नेत्यांना भाषण न करताच निघावं लागलं

Janhvi Kapoor : "लहान असताना अश्लील साईटवर माझे फोटो..."; जान्हवीने शेअर केला बालपणीचा 'तो' वाईट अनुभव

Rohit Sharma : खासगी संभाषण उघड करणाऱ्या आयपीएल ब्रॉडकास्टरवर रोहितनं काढला जाळ

SRH vs PBKS Live Score : पंजाबची दमदार सुरूवात; तायडे अन् प्रभसिमरनची 96 धावांची सलामी

SCROLL FOR NEXT