open university
open university 
नाशिक

मुक्त विद्यापीठाच्या परीक्षेला राज्‍यभरातून 80 टक्‍के उपस्‍थिती; वंचित विद्यार्थ्यांना ‘ऑफलाईन’चा पर्याय 

अरुण मलाणी

नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या ऑनलाइन परीक्षेला राज्‍यभरातून जवळपास ऐंशी टक्‍के उपस्‍थिती राहिली. पाच जिलह्यांचा समावेश असलेल्‍या नाशिक विभागातून चोवीस हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. ऑनलाइन परीक्षा देऊ न शकलेल्‍या विद्यार्थ्यांना ऑफलाईनचा पर्याय दिला जाणार आहे. तसेच, बुधवार (ता. २१)पासून पदविका व प्रमाणपत्र अभ्यासक्रमांच्या परीक्षांना सुरवात होत असल्‍याची माहिती विद्यापीठाचे विभागीय संचालक डॉ. धनंजय माने यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

यावेळी विलास दशपुते, सुनील निकम, श्रीकांत सोनवणे, अमोल पाटील, सचिन सुर्यवंशी, सदाशिव बोडके, शरद पाटील आदी उपस्थित होते. डॉ.

माने म्‍हणाले, की ५ ऑक्‍टोबरपासून परीक्षांना सुरवात झाली. विभागातून सुमारे ३१ हजार विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. ऑनलाइन परीक्षेत येणाऱ्या संभाव्‍य अडचणी लक्षात घेता, तांत्रिक सहाय्यासाठी तीन कर्मचारी नियुक्‍त केलेले होते. सत्राची वेळ वाढवलेली होती. नाशिक विभागात कला शाखा पदवी (बीए) व पदव्‍युत्तर पदवी (एमए)चे सुमारे सतरा हजार विद्यार्थी, वाणिज्य शाखेचे पाच हजार विद्यार्थी आणि अन्‍य शिक्षणक्रमांचे विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. ज्‍या विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षा देता आलेली नाही, त्‍यांची ऑफलाइन परीक्षा घेतली जाईल. राज्‍यभरातील पारंपारीक विद्यापीठाच्‍या अंतीम वर्ष परीक्षा आटोपल्‍यानंतर या ऑफलाइन परीक्षा घेतल्या जातील. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रमनदीपने अर्शिन कुलकर्णीचा घेतला अफलातून कॅच! स्टार्कला मिळाली पहिली विकेट

Sharad Pawar : आपण सर्वजण एक आहोत तोपर्यंत कोणी धक्का लावू शकत नाही : शरद पवार

Prakash Ambedkar : पवार व ठाकरे यांची मागच्या दरवाजातून भाजपशी चर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा

SCROLL FOR NEXT