800 years old statue of Gautama Rishi in Ram Teertha.
800 years old statue of Gautama Rishi in Ram Teertha. esakal
नाशिक

Nashik News: रामतीर्थावर गौतम ऋषींची 800 वर्षांपूर्वीची मूर्ती! तीर्थजल कमी झाल्यावर मूर्तीचे घडते दर्शन

योगेश मोरे

पंचवटी (जि. नाशिक) : कुंभनगरी नाशिकची जगभर ओळख आहे. दक्षिण वाहिनी गोदावरीच्या काठावरील पंचवटीस धार्मिक, पौराणिक व ऐतिहासिक वारसा लाभला आहे. गोदावरीच्या रामतीर्थावर गोमुखालगत गौतम कृषींची प्राचीन मूर्ती आहे.

ही मूर्ती आठशे ते साडेआठशे वर्षांपूर्वीची असावी, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे. रामतीर्थातील पाणी कमी झाल्यावर मूर्तीचे दर्शन घडते. (800 years old idol of Gautama Rishi on Ram Teertha Nashik News)

प्रभू श्रीरामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी पंचवटी. पंचवटीतील गोदाघाट परिसर व तपोवनात मंदिरे आहेत. जवळपास प्रत्येक मंदिराचा आपला काही ना काही असा इतिहास आहे. रामशेज येथून उगम पावलेली अरुणा नदी पंचवटीतील इंद्रकुंड मार्गे रामतीर्थांतील गो मुखातून गोदावरीला भेटते.

अशाप्रकारे गोदावरी व अरुणा नदीचा संगम होतो. नाशिकमध्ये प्रत्येक बारा वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा होतो. याच गोदावरी व अरुणा नदीचा संगमाच्या ठिकाणी गोमुखालगत गौतम ऋषींची मूर्ती आहे. ही मूर्ती काळ्या पाषाणात कोरलेली आहे. गौतम ऋषींच्या मूर्तीची उंची सर्वसाधारण एक ते सव्वा फूट आहे.

मूर्तीची जागा ही पुरातन काळातील दगडी संरचनेनुसार बनवत दोन दगड एकमेकांत अडकतील, अशा स्वरूपात तयार केली आहे. गौतम ऋषींची मूर्ती काढून लावता येईल आणि आतील भागात दगडाचा स्पर्श एकमेकाला झाला, की मूर्ति काढता येणार नाही, असे विशिष्ट नियोजन कारागिरांनी केले आहे.

हेही वाचा : सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

गौतम ऋषींचा मूर्तीचा उल्लेख १८८३ च्या बॉम्बे प्रेसिडेन्सी नाशिक गॅझेटर व ‘डीएसएलआर’ मॅपमध्ये आढळतो. इसवी सन १८०० पासून १९९२ व २००१ पर्यंत वेळोवेळी विकासाच्या नावाखाली काँक्रिटीकरणाचे थरावर थर चढत गेले आणि आजच्या स्थितीत ही गोमुख आणि पाण्याखाली आहे.

गोदावरीच्या आरतीत उल्लेख

‘गोदावरी आरती’ ही गोदावरी नदीचे भौगोलिक, पौराणिक, सांस्कृतिक, वैज्ञानिक तसेच व्यावहारिक जीवनातील महत्त्व कथन करणारी आहे. गोदावरी आरतीमध्ये एकूण सहा श्र्लोक आहेत. त्यातील ‘श्री आरती गोदावरी । उगमस्थ ब्रह्मगिरी । कुशावर्त गंगाद्वारी । माता श्री त्र्यंबकेश्वरी ।।१।।’ या पहिल्या श्‍लोकात गोदावरी नदीच्या उगम स्थानाच्या भौगोलिक ठिकाणाचे वर्णन आहे. ‘जय पतित पावनी । निवृत्ती नाथाचरणी । गौतम श्री जटाधारी । वरदात्री गोदावरी ।।२।’ श्री भगवान शंकर यांनी प्रसन्न होऊन श्री गौतम ऋषींच्या पापनिवार्णार्थ गोदावरीस प्रकट होण्याची विनंती करतात. भगवान शंकर ब्रह्मगिरीच्या पर्वतावरील खडकावर जटा आपटतात आणि गोदावरी प्रकट होते, असे दुसऱ्या श्‍लोकात नमूद आहे.

"तपश्‍चर्येने भूतलावर श्री गोदावरी नदीस आणणाऱ्या गौतम ऋषींची रामतीर्थातील मूर्ती दुर्लक्षित आहे. येथे नेहमी पाण्यात असल्यामुळे मूर्तीची झीज झाली आहे. मूर्तीला वज्रलेपची आवश्यकता आहे. त्यासाठी पुरातत्त्व विभागाने पुढाकार घेऊन गौतम ऋषींच्या मूर्तीचे रक्षण करावे."

- देवांग जानी, अध्यक्ष, गोदाप्रेमी सेवा समिती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी 8 टक्के मतदान

Akshay Kumar: खिलाडी अक्षय कुमारनं भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर पहिल्यांदाच केलं मतदान; म्हणाला, "माझा भारत देश हा..."

Latest Marathi Live News Update: सुनील राऊत पोलिसांवर भडकले

PM Modi : मतपेढीच्या तुष्टीकरणासाठी संस्थांना धमक्या; पंतप्रधानांची ममतांवर टीका

Standing Problems: तुम्हीही जास्त वेळ उभे राहत असाल तर वाढू शकतात 'या' समस्या

SCROLL FOR NEXT