91 percent corona recovery rate in nashik marathi news 
नाशिक

कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्यात नाशिक राज्यात आघाडीवर; रिकव्हरी रेट ९१ टक्क्यांवर

विक्रांत मते

नाशिक : शहरातील करोनाबाधितांच्या नव्याने आलेल्या आकडेवारीनुसार रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८८ टक्क्यांवरून ९१.०५ टक्क्यांपर्यंत पोचल्याने संसर्गाच्या चिंताजनक परिस्थितीत ही बाब महत्त्वाची मानली जात आहे. कोरोनाबाधित बरे होण्यामध्ये नाशिक राज्यात आघाडीवरचे शहर बनले असून, राज्यात सध्या रेट ७५.०९ टक्के एवढा आहे. 

मे अखेरपासून शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढताना दिसत आहे. मेअखेर २३७ कोरोनाबाधित होते. २५ सप्टेंबरअखेर रुग्णांनी ४७ हजारांचा टप्पा पार केला. ६७९ नागरिक मृत झाले आहेत. वाढत्या कोरोनाबाधितांमुळे महापालिकेने एका पॉझिटिव्ह रुग्णामागे कॉन्टॅक्ट ट्रेसिंगद्वारे ३५ नागरिकांची तपासणी सुरू केली. महापालिकेने चार कोटी रुपये खर्च करून खरेदी केलेल्या रॅपिड टेस्टद्वारेही तपासण्या वाढविल्या. त्याचबरोबर कोमॉर्बिड रुग्णांचे सर्वेक्षण सुरू केले. त्यातून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले. जूनमध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ४२.६० टक्के होते. जुलैत तेच प्रमाण ७१ टक्क्यांपर्यंत पोचले. ऑगस्टमध्ये ८४ टक्क्यांवर रिकव्हरी रेट पोचला. सर्वाधिक रुग्ण सप्टेंबरमध्ये आढळले. तरी २४ सप्टेंबरपर्यंत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८८ टक्क्यांपर्यंत पोचले. २५ सप्टेंबरला हाती आलेल्या आकडेवारीनुसार राज्यात नाशिक शहराचा रिकव्हरी रेट सर्वाधिक असल्याचे स्पष्ट झाले. 

राज्यात नाशिक आघाडीवर 

९१ टक्क्यांपर्यंत रिकव्हरी रेट पोचल्याने नाशिक राज्यात आघाडीवर पोचले आहे. राज्याचा रिकव्हरी रेट ७५.०९ टक्के आहे. नाशिक ग्रामीणमध्ये ८०.५१ टक्के, मालेगाव महापालिका हद्दीत ८०.४२ टक्के रिकव्हरी रेट आहे. 

शहरात चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली असून, त्या अनुषंगाने ट्रेसिंग केले जात आहे. त्यामुळे रुग्ण आढळल्यास उपचार केले जात असल्याने रिकव्हरी रेट वाढला. तर ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. 
- कैलास जाधव, आयुक्त, महापलिका 

संपादन - रोहित कणसे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Shinde vs Thackeray Group : मिरजेत ठाकरे-शिंदे गटात कमानी ‘युद्ध’; दिशा सालियन प्रकरणाला ‘गद्दारी’वरुन प्रत्‍युत्तर, पोलिस परवानगीने आश्चर्य

Kolhapur Ganesh Idol Collapse : कोल्हापुरात मानाची २१ फुटी गणेशमुर्ती कोसळली, वीजवाहिनीचा धक्का लागला अन् गोखले कॉलेज चौकातील घटना

Bomb Detection Squad Miraj : मिरजेत गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी अचानक बॉम्ब शोधक पथक, श्वानपथकाकडून मिरवणूक मार्गाची तपासणी; शहरातील प्रमुख मार्ग बंद

Maharashtra Ganesh Visarjan Live: शेटफळ तलावामध्ये पाणी सोडण्याचा निर्णय- हर्षवर्धन पाटील

Bhiwandi News: माझ्या मुलाला फाशी द्या! भिवंडीतील हाय-प्रोफाईल सामूहिक अत्याचाराच्या प्रकरणात आईची मागणी

SCROLL FOR NEXT