96 percent of teachers in state not given Ability test nashik news esakal
नाशिक

Ashram School Teacher : राज्यात 96 टक्के शिक्षकांची परीक्षेकडे पाठ; आदिवासी शिक्षकांचा चाचणी परीक्षेवर बहिष्कार

सकाळ वृत्तसेवा

Ashram School Teacher : आदिवासी विकासमंत्री विजयकुमार गावित यांच्यासह आदिवासी विकास आयुक्त नयना गुंडे यांनी परीक्षा देण्याचे आदेश दिल्यानंतरही राज्यातील तब्बल ९८ टक्के शिक्षकांनी क्षमता चाचणी परीक्षेकडे पाठ फिरविली.

१३ हजार २६३ शिक्षकांपैकी ५२५ (केवळ चार टक्के) शिक्षकांनी हजेरी लावत परीक्षा दिली. याउलट चाचणी घेण्याच्या निर्णयाविरोधात ठिकठिकाणच्या परीक्षा केंद्राबाहेर शिक्षकांनी निदर्शने केली.

आदिवासी विकास विभागांतर्गत असलेल्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांची गुणवत्ता चाचणी परीक्षा घेतल्यानंतर विभागाने शिक्षकांची परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शिक्षकांच्या परीक्षा घेण्यात आली. ही परीक्षा शिक्षकांना अनिवार्य केली आहे. (96 percent of teachers in state not given Ability test nashik news)

मात्र, काही शिक्षक संघटनांनी यास विरोध करत बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली. याबाबत आयुक्त गुंडे यांनी शिक्षक संघटनांची बैठक घेत त्यांची समजूत काढण्याचाही प्रयत्न केला. मात्र, शिक्षक संघटनांनी बहिष्कार कायम ठेवला.

आदिवासी विकासमंत्री विजयकुमार गावित यांनी आयुक्त गुंडे यांना पाठिंबा देत परीक्षा होणार असल्याचे सांगत परीक्षा बंधनकारक असल्याचे सांगितले होते. त्यामुळे परीक्षेबाबत संभ्रम निर्माण झाला होता. आयुक्त गुंडे यांनी परीक्षा ठरल्यावेळी होणार असल्याचे जाहीर केले. त्यानुसार रविवारी (ता. १७) राज्यभरात ही परीक्षा झाली.

परीक्षेला शिक्षकांनी दांडी मारली. नाशिक अप्पर आयुक्त विभागातील पाच हजार ६०८ पैकी केवळ ४११ शिक्षकांनी परीक्षेला हजेरी लावली. नागपूर विभागात दोन हजार ७३० पैकी ३४, अमरावती विभाग दोन हजार ५६० पैकी १५ , ठाणे विभागात दोन हजार ३६५ पैकी ६५ शिक्षकांनी परीक्षा दिल्याची नोंद आहे.

यातच घेण्यात आलेल्या इंग्रजीच्या शिक्षकांना गणिताचे प्रश्न व गणिताच्या शिक्षकांना इंग्रजीचे प्रश्न विचारण्यात आल्याने ज्या शिक्षकांनी पेपर दिले त्याचा गोंधळ झाला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

याउलट चाचणी घेण्याच्या निर्णयाविरोधात ठिकठिकाणच्या परीक्षा केंद्रांबाहेर शिक्षकांनी निदर्शने करत निषेध नोंदविला.

"शिक्षकांच्या गुणवत्तावाढीसाठी चाचणी परीक्षा घेण्यात आली होती. शिक्षकांनी परीक्षा दिली नाही म्हणून कार्यवाही होणार नाही. चाचणी परीक्षेबाबत पुन्हा शिक्षकांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल." - नयना गुंडे, आयुक्त, आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र राज्य

"इंग्रजी विषय शिक्षकाला फक्त पाच प्रश्न इंग्रजीचे व बाकीचे गणिताचे होते. कोणते इंग्रजीचे शिक्षक गणित व विज्ञान शिकवतात, यातून कुठली शिक्षकांचे ज्ञान व क्षमता तपासली जाणार, शिक्षकांचे ज्ञान तपासण्याची गरजच काय, याचा अगोदर तपास करायला हवा होता. आमचा बहिष्कार यशस्वी ठरला." - भरत पटेल, प्रदेशाध्यक्ष, स्वाभिमानी शिक्षक संघटना

विभाग शिक्षक परीक्षा दिलेले शिक्षक

नागपूर विभाग २७३० ३४

अमरावती विभाग २५६० १५

ठाणे विभाग २३६५ ६५

नाशिक विभाग ५६०८ ४११

एकूण १३२६३ ५२५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Adityanath Mobile Number: अधिकारी काम करत नाहीत? CM योगींकडे करा थेट तक्रार! मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा मोबाईल नंबर

Harbhajan Singh : रोहित शर्माला ODI कर्णधारपदावरून हटवल्याने हरभजन सिंग खवळला, शुभमन गिलबाबत म्हणाला...

Marathi Movie : तरूणाईला प्रेमाचा जादुई अनुभव देणारं ‘ये ना पुन्हा’ गाणं प्रदर्शित!

Ajit Agarkar: रोहित शर्मासाठी परतीचा प्रवास सुरू? कर्णधारपदावरून दूर करण्याची माहिती दिली होती,आगरकर

Kolhapur Bhishi Scam : विश्वासू मित्र म्हणून भिशी भरायला दिली, अन् ४० महिलांना पती, पत्नीने २५ लाखांना गंडवलं...; कोल्हापुरातील घटना

SCROLL FOR NEXT