Corona self kit News Updates sakal
नाशिक

नाशिक : कोरोना सेल्फ किट खरेदी करताना आधारकार्ड बंधनकारक

आधार क्रमांक व मोबाईल क्रमांकाशिवाय किट विक्री करू नये, तशा सूचना द्याव्यात असे निर्देश अन्न व औषध प्रशासनाला दिले

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : कोरोना संसर्गाला घरच्या घरी अटकाव करण्यासाठी कोरोना सेल्फ किटचा (Corona Self Test Kit)सर्रास वापर होत असला तरी त्यातून घरच्या घरी उपचार करण्याबरोबरच मोठ्या प्रमाणात असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या बाहेर पडत नाही. यामुळे अखेरीस महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने मेडीकल स्टोअर्समधून होत असलेल्या किट विक्रीला पायबंद घातला आहे. आधार क्रमांक(Aadhaar card ) व मोबाईल क्रमांकाशिवाय (Mobile Number)किट विक्री करू नये, तशा सूचना द्याव्यात असे निर्देश अन्न व औषध प्रशासनाला दिले.(Aadhaar card compulsory when purchasing Corona self kit)

शहरात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. पहिल्या व दुसऱ्या लाटेप्रमाणेच तिसरी लाट भयानक दिसून येत आहे. सध्या कोरोना पॉझिटिव्ह रेट ४१ टक्के असल्याने रुग्ण संख्या दहा हजारांपर्यंत पोचली आहे. परंतु, तिसऱ्या लाटेत नागरिकांमध्ये भितीचे प्रमाण कमी दिसून येत आहे. त्यात मेडीकल दुकानांमध्ये सहजपणे कोरोना सेल्फ किट उपलब्ध होत असल्याने त्या किटच्या माध्यमातून टेस्ट करून पॉझिटिव्ह आढळून आल्यास घरच्या घरी उपचार केला जात आहे. परंतु, यातून किती रुग्ण बाधित झाले याची आकडेवारी सरकारी दप्तरात सापडत नाही. सेल्फ किट घेतल्यानंतर त्यासंदर्भातील माहिती पोर्टलवर नोंदविणे बंधनकारक आहे, परंतु ती पध्दत अवलंबिली जात नाही. त्यामुळे कोरोना बाधितांचा तिसऱ्या लाटेतील खरा आकडा समोर येत नाही.

शहरात दररोज जवळपास पाचशे किट विकल्या जात असल्याचा संशय आहे, परंतु त्याप्रमाणात नोंद होत नाही. त्यामुळे वैद्यकीय विभागाने अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांना पत्र लिहून किट विक्रीचा डेटा देण्याची सूचना केली आहे. त्याचबरोबर किट विक्री करताना आधार क्रमांक व संबंधितांचा मोबाईल क्रमांक बंधनकारक केला आहे.

थेट गाठणार घर

कोरोनाची भीती कमी झाली तरी सामाजिक बहिष्काराची भीती मात्र कमी झाली नाही. त्यामुळे किट खरेदी केल्यानंतर संबंधित व्यक्ती पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह याबाबत माहिती समोर येत नसल्याने आता मेडीकल स्टोअर्सना माहिती संकलित करणे बंधनकारक केले जाणार आहे. संबंधिताने माहिती न कळविल्यास वैद्यकीय विभागाचे कर्मचारी थेट घर गाठणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याच्या भावात घसरण कायम! 10 दिवसांत 15 हजारांनी सोनं स्वस्त; पाहा महाराष्ट्रातील आजचे ताजे दर

Pandharpur Chaitra Ekadashi : लाखो भाविकांसाठी महत्त्वाची बातमी! पंढरपुरात 'या' तारखेपर्यंत VIP दर्शन पूर्णपणे बंद; विठ्ठलाच्या दर्शनापूर्वी हा नियम जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : मुंबईसह ७ राज्यांमध्ये बॉम्बस्फोट करण्याचा कट, ९ दहशतवाद्यांना अटक

Iran Missile Attack Near India : युद्धाची धग भारतापर्यंत, इराणचा हिंद महासागरातल्या बेटावर क्षेपणास्त्र हल्ला

Multibagger Stock: 17 रुपायांवरून 1166 रुपयांपर्यंत झेप! 3 वर्षांत 6600% रिटर्न; बाजार कोसळत असतानाही हा शेअर तेजीत

SCROLL FOR NEXT