water supply esakal
नाशिक

Abhay Yojana : अनधिकृत नळजोडणीसाठी अभय योजना; प्रतिसाद न मिळाल्यास दंडात्मक कारवाईबरोबरच बोजा चढविणार

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शहरात मोठ्या प्रमाणात पाणीगळती होत असून त्यातून पाण्याचा अपव्यय व पाणीपट्टीच्या वसुलीवरही परिणाम होत असल्याने पाणीपुरवठा विभागाकडून घरपट्टीच्या सवलत योजनेच्या धर्तीवर अभय योजना लागू केली आहे. (Abhay scheme was implemented on lines of housing concession scheme by water supply department nashik news)

त्याअंतर्गत ठराविक रक्कम भरून नळजोडणी अधिकृत करता येणार आहे. अनधिकृत नळजोडणी अधिकृत न केल्यास दंडात्मक कारवाई व पुढे घरपट्टीवर बोजा चढविला जाणार आहे. शहरात जवळपास एक लाख ८५ हजार नळजोडणी आहेत. परंतु यात अनधिकृत नळजोडणी अधिक असण्याची शक्यता पाणीपुरवठा विभागाच्या सर्वेक्षणातून समोर आली आहे.

त्यामुळे अनधिकृत नळजोडणी धारकांवर कारवाई केली जाणार आहे. परंतु त्यापूर्वी अभय योजना राबविली जाणार आहे. २०१७ मध्ये ४५ दिवस व त्यानंतर ३० दिवसांच्या कालावधीसाठी अभय योजना राबविण्यात आली होती. त्यात एकूण १४०० नळजोडणी अधिकृत करण्यात आल्या व फेरूल चार्जेस, रोड डॅमेज फी, दंड मिळून २८ लाख २१ हजार ६६१ रुपयांचा महसुल वसुल करण्यात आला होता.

आता पुन्हा नव्याने अभय योजना अमलात आणली जाणार आहे. हिशोब बाह्य पाणी (एनआरडब्ल्यू) कमी करण्यासाठी महापालिकेसह खासगी नळ जोडण्यांची नोंद महापालिकेत करणे क्रमप्राप्त असल्याने अभय योजना अमलात आणली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात ४५ दिवसांची मोहीम हाती घेतली जाईल. मुदतीत अनधिकृत नळजोडणी नियमित होणार नाही तेथे मुदतीनंतर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

घरपट्टीवर बोजा, पाणीपुरवठा बंद

दुसऱ्या टप्प्यात आढळलेल्या अनधिकृत नळजोडणी धारकांनी १५ दिवसात नळजोडणी आकार व दंड न भरल्यास दंडात्मक रक्कम व नळजोडणी शुल्काची रक्कमेचा घरपट्टीवर बोजा चढविला जाणार आहे. तसेच नळजोडणी कायम स्वरुपी बंद करून गुन्हा दाखल केला जाणार आहे. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्याच्या नावाखाली प्लंबर वर देखील गुन्हा दाखल केला जाणार आहे.

अधिकृत करण्यासाठी कागदपत्रे

- घरगुती वापराकरीता- इमारत पूर्णत्वाचा दाखला किंवा घरपट्टी (जुनी) पाच वर्षाची किंवा नोंदणीकृत खरेदीखत.
- सोसायटी किंवा अपार्टमेंट- चेअरमन, सेक्रेटरी यांचे संमतिपत्र, स्टॅम्प पेपरवर नोटरी केलेले हमीपत्र, पाणी देयक भरल्याची पावती.
- वैयक्तीक नळ जोडणी- चालु वर्षाची घरपट्टी पावती, घरपट्टी विभागाचा नाहरकत.

अधिकृत करण्यासाठी चार्जेस (फेरुल व अनामत रक्कम)

नळ जोडणी आकार घरगुती बिगर घरगुती व्यावसायिक
१५ मी.मी. ७५० २,५०० २,७५०
२० मी.मी. १,२०० ४,८०० १,६५०
२५ मी.मी. २,५०० ११,००० ११,५००
४० मी.मी. ५,७५० २६,५०० ३२,२५०
५० मी.मी. ११,००० ७७,००० ५३,०००

अधिकृत न केल्यास असा लागेल दंड (रुपये)

नळ जोडणी आकार घरगुती बिगर घरगुती व्यावसायिक
१५ मी.मी. ५४०० १९,८०० २४,३००
२० मी.मी. ९,९०० ४७,५२० ५३,४६०
२५ मी.मी. २१,६०० १,१८,८०० १,१६,६४०
४० मी.मी. ६३,००० ३,१६,८०० ३,४७,२००
५० मी.मी. १,१५,२०० ७,९२,००० ६,२२,०८०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT