bacchav 1234.jpg
bacchav 1234.jpg 
नाशिक

लासलगावचे मंडल अधिकारी एसीबीच्या जाळ्यात; शेतजमिनीला नाव लावण्यासाठी मागितली लाच 

अरुण खंगाळ

लासलगाव (जि.नाशिक) : येथील मंडल अधिकारी रमेश बच्छाव यांना साडेतीन हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. तक्रारदाराने खरेदी केलेल्या शेतजमिनीला त्यांचे नाव लावून तशी नोंद करण्यासाठी मंडळ अधिकारी बच्छाव यांनी साडेतीन हजारांची लाच मागितली होती. तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला माहिती दिली. त्यानुसार, निफाड शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयात सापळा रचण्यात आला.

याठिकाणी साडेतीन हजारांची लाच स्वीकारताना बच्छाव यांना पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलिस अधीक्षक नीलेश सोनवणे, दिनकर पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी संदीप साळुंके, पोलिस निरीक्षक प्रभाकर निकम, पोलिस नाईक नितीन कराड, प्रभाकर गवळी, प्रकाश डोंगरे, परशुराम जाधव यांनी ही कारवाई केली.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahadev Betting App: महादेव बेटींग अ‍ॅप प्रकरणी आणखी एका अभिनेत्याला अटक

Antarctica Penguin : ग्लोबल वॉर्मिंगमुळे नष्ट होतायत अंटार्क्टिकावरील पेंग्विन; बर्फ वितळल्यामुळे लाखो नवजात पेंग्विन्सचा मृत्यू

Iraq: इराकमध्ये समलैंगिक संबंधाना गुन्हा ठरवणारा कायदा मंजूर; तब्बल इतक्या वर्षांचा होणार तुरुंगवास

Bhandup Cash: पैशाने भरलेली व्हॅन जप्त, निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाची कारवाई

Yoga Tips : मानसिक आरोग्यासाठी अन् शारिरीक तंदूरूस्तीसाठी फायदेशीर आहेत 'ही' योगासने, दररोज करा सराव

SCROLL FOR NEXT