acb file case against police.jpg 
नाशिक

'या गुन्ह्यातून सुटकेसाठी मी तुझी मदत करतो'...पण त्याच्याबद्दल्यात..

सकाळवृत्तसेवा

नाशिक : (चांदवड) 'तुझ्याविरोधात दाखल असलेल्या गुन्ह्यातून बाहेर निघायला मी तुझी मदत करतो', म्हणत सदर व्यक्तीकडे केली पैशाची मागणी अन् मग नंतर घडले असे...

अशी आहे घटना

दहेगाव (ता. चांदवड) येथील बेचाळीस वर्षीय पुरुषाविरोधात चांदवड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात मदत करण्यासाठी त्यांच्याकडे पोलीस हवालदाराने पैशांची मागणी केली होती. चांदवड पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत नाशिक ग्रामीण पोलीस दलातील अशोक सुखदेव फुलमाळी हे ते पोलीस हवालदार होत. लाच लुचपत प्रतिबंधक नाशिक विभागाचे अधीक्षक सुनिल कडासने, अप्पर अधीक्षक निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचून तक्रारदाराकडून पाच हजार रुपयांची लाच घेताना फुलमाळी यांना रंगेहाथ पकडले. 

अशोक सुखदेव फुलमाळी यांच्याकडून वारंवार पैशाची मागणी केली जात होती. शेवटी कंटाळून तक्रारदाराने ए.सी.बी.कडे तक्रार दाखल केली होती. ए.सी.बी.चे पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे यांनी सापळा रचून फुलमाळीला रंगेहाथ पकडले. पोलीस निरीक्षक संदीप सांळुखे, पोलीस निरीक्षक प्रभाकर निकम, पोलीस नाईक वैभव देशमुख, पोलीस नाईक प्रवीण महाजन, पोलीस नाईक नितीन कराड, पोलीस हवालदार संतोष गांगुर्डे यांच्या पथकाने सदर कारवाई केली.

रिपोर्टर - भाऊसाहेब गोसावी

(संपादन - किशोरी वाघ)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Census 2026 40 Questions List : जनगणनेबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय! अनुसूचित जाती-जमाती अन् विशिष्ट जातींची होणार नोंद; पाहा 40 प्रश्नांत काय?

Raj Thackeray : पुण्यातील खड्डे, वाहतूक कोंडीवरून राज ठाकरे संतापले; म्हणाले- ज्यांना सत्ता दिली त्यांनाच जाब विचारा

Sangli Milk Collection Drop : FDA च्या धाडींमुळे सांगलीतील दुधाचा 'बनावट खेळ' बंद? तब्बल 78 हजार लिटरने दुधाची आवक घटली; पाहा आकडेवारी

Marathi News Live Updates : बीडच्या इमामपूरचंही नाव बदलणार? मंत्री भरत गोगावलेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

Shivsena Express: कोकण प्रवास मोफत करता येणार, गणेशोत्सवासाठी मुंबईतून विशेष ट्रेन सुटणार; कुठून आणि कधी?

SCROLL FOR NEXT