nmc google
नाशिक

Accident Insurance Plan : अपघात विमा योजना NMC कर्मचाऱ्यांनाही लागू!

विक्रांत मते

नाशिक : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लागू असलेली अपघात विमा योजना महापालिका कर्मचाऱ्यांनाही लागू केली जाणार आहे. मार्च महिन्याच्या वेतनातून सदर योजनेची कपात करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्य सरकारने त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी शासकीय कर्मचारी समूह वैयक्तिक अपघात विमा योजना लागू केली आहे. (Accident insurance plan applicable to NMC employees nashik news)

सदर योजनेची व्याप्ती वाढवताना भारतीय वनसेवा, भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी व शासकीय विभागांच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली विविध घटकांना समाविष्ट करून घेण्यात आले आहे.

सातवा वेतन आयोग व महागाई निर्देशांक विचारात घेऊन १ एप्रिल २०२३ पासून विमा योजनेची वर्गणी व राशीभूत रकमेत वाढ करण्यात आली आहे. त्याच अनुषंगाने महापालिका आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांनादेखील अपघात विमा योजना लागू केली जाणार आहे.

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

मार्चच्या वेतनातून विमा वर्गणीची कपात करण्याच्या सूचना समाजकल्याण विभागामार्फत खातेप्रमुखांना देण्यात आली आहे. गट अ वर्गातील कर्मचाऱ्यांसाठी ८८५ रुपये वर्गणी असून, त्यांना २५ लाख रुपयांची राशीभूत रक्कम मिळेल.

गट ब साठी सातशे आठ रुपये वर्गणी असून, वीस लाख रुपये वार्षिक राशिभूत रक्कम आहे. गट क साठी ५३१ रुपये वर्गणी असून, १५ लाख रुपये वार्षिक राशिभूत रक्कम आहे, तर गट ड साठी ५३१ वर्गणी असून १५ लाख रुपये राशीभूत रक्कम आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT