Accidental death of an army man on leave nashik accident news esakal
नाशिक

Nashik Accident News : सुट्टीवर आलेल्या सैन्यातील जवानाचा अपघाती मृत्यू

रणधीर भामरे

Nashik Accident News : येथे साक्री - शिर्डी या महामार्गावर ट्रॅक्टर व मोटरसायकल यांच्यात अपघात होऊन चौंधाने ( ता. बागलाण ) येथील भारतीय सैन्यात असलेले जवान साहेबराव सोनवणे( वय ३५) यांचा मृत्यू झाला. (Accidental death of an army man on leave nashik accident news)

छत्तीसगड येथे कार्यरत असलेले जवान साहेबराव सोनवणे हे नुकतेच तीन दिवसांपूर्वीच सुट्टी घेऊन घरी आलेले होते. ते आज दासवेल येथे त्यांच्या मामाला भेटावयास गेले होते.संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास ते आपल्या मोटर सायकल क्र. MH ४१ AD ७६७५ या वाहनाने परतत असताना आव्हाटी ( ता.बागलाण) येथील कांद्याने भरलेले ट्रॅक्टर सटाणा येथे जात होते.

ट्रॅक्टरला ओव्हरटेक करत असताना ट्रॅक्टरने अचानक वळण घेतले.यात जवान साहेबराव सोनवणे यांची दुचाकी ट्रॅक्टरच्या ट्रॉली खाली आल्याने ते मागच्या चाकात गेले.यात ते गंभीर जखमी झाले. विरगाव फाट्यावर असलेल्या ग्रामस्थांनी लगेच अपघातस्थळी धाव घेतली व जखमी जवान साहेबराव सोनवणे याना बाहेर काढून उपचारासाठी सटाणा येथे घेऊन गेले.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

मात्र रस्त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.या घटनेची माहिती सटाणा पोसीस स्टेशन येथे कळविण्यात आली असून सदर अपघाताची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पी आय किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बी आर बस्ते, रवी शिंदे अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

न्यायाधीश व्हायचं होतं, पण लग्नासाठी घरच्यांचा दबाव; वकील तरुणीनं बेपत्ता होण्याचा आखला प्लॅन, १३ दिवसांनी सापडली

Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेचा मोठा निर्णय! युवा नेतृत्वासाठी मोकळी केली वाट; म्हणाला, हीच योग्य वेळ...

ठरलं तर मग! या दिवशी सुरु होणार ‘स्टार प्रवाह’वर दोन नवीन मालिका, वेळही ठरली! तर हे कलाकार घेणार प्रेक्षकांचा निरोप

Everest Base Camp: 'सातारच्या ६३ वर्षीय गिर्यारोहकाने सर केला एव्हरेस्ट बेस कॅम्प';खडतर चढाई करत हिमालयाच्या शिखरावर फडकवला मराठी झेंडा

Maharashtra Latest News Update: बाळासाहेब थोरात यांच्या समर्थनार्थ निघालेल्या मोर्चाला प्रचंड गर्दी...

SCROLL FOR NEXT