NMC commissioner Dr Chandrakant Phulkundwar latest marathi news esakal
नाशिक

Nashik News: जमा-खर्चाची माहिती सादर न झाल्यास कारवाई; आयुक्तांकडून सर्व विभागांना अल्टिमेटम!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : प्रशासकीय राजवटीमध्ये आर्थिक वर्ष संपण्याच्या आधीच नवीन आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक सादर करण्यासाठी आयुक्तांचे प्रयत्न आहे.

परंतु, विभाग प्रमुखांकडून सुधारित अंदाजपत्रकासाठी जमाखर्चाची आकडेवारी सादर होत नसल्याने अखेरीस ९ जानेवारीचा अल्टिमेटम आयुक्तांनी दिला असून या कालावधीत जमा खर्चाची माहिती सादर न झाल्यास कारवाई केली जाणार आहे. (Action for non submission of deposit expenditure information Ultimatum to all departments till 9 january from nmc commissioner Nashik News)

दरवर्षी प्रशासनाकडून आयुक्त स्थायी समितीला नवीन आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक सादर करतात. स्थायी समिती नवीन योजनांच्या समावेश करून पुढे महासभेकडे पाठवते. महासभेत यावर चर्चा होऊन नवीन योजनांचा समावेश करून अंदाजपत्रकाला अंतिम स्वरूप दिले जाते.

जमा व खर्चाची आकडेवारी लक्षात घेऊन प्रशासनाकडून अंदाजपत्रक मांडले जाते. मात्र, सत्ताधारी पक्षाकडून नवीन योजनांचा समावेश करून मतदारांना आकर्षित करण्यासाठी अंदाजपत्रक फुगविले जाते.

त्यानंतर महासभेकडूनदेखील असाच प्रकार होतो. तसे पाहिल्यास प्रशासनाकडून सादर करण्यात आलेले अंदाजपत्रकच हे मूळ अंदाजपत्रक असते. त्याचीच अंमलबजावणी प्रशासनामार्फत होते. जमा बाजू भक्कम झाल्यास त्यानंतर स्थायी समिती किंवा महासभेच्या योजनांचा विचार केला जातो.

एकदा अंदाजपत्रक सादर झाल्यानंतर जानेवारी महिन्यात सुधारित अंदाजपत्रक सादर केले जाते. सुधारित अंदाजपत्रकामध्ये डिसेंबरपर्यंत कररूपी जमा झालेला पैसा व खर्च याचा ताळेबंद मांडला जातो. त्यानंतर सुधारित अंदाजपत्रकाला आयुक्त मान्यता देतात. त्याआधारे पुढील नवीन वर्षाचे अंदाजपत्रक तयार केले जाते.

हेही वाचा : ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट

महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी फेब्रुवारी महिन्यातच अंदाजपत्रक सादर करण्यासाठी विभाग प्रमुखांकडून जमाखर्चाचा ताळेबंद मागितला. परंतु, नियोजित वेळेत आकडेवारी सादर झाली नाही.

परिणामी इआरपी प्रणालीमध्ये नोंद करता आली नाही. त्यामुळे आयुक्तांनी आता ९ जानेवारीपर्यंत सर्व विभागांना आकडेवारी सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत, अन्यथा कारवाईचा इशारा दिला.

३० जानेवारीपर्यंत अंदाजपत्रक

२ जानेवारीपर्यंत सर्व विभाग प्रमुखांनी जमाखर्चाची अंतिम विहित नमुन्यातील लेखी मागणी लेखा विभागात सादर करण्याचे नियोजन होते. मात्र, अद्याप नियोजन झाले नाही. आता ९ जानेवारीपर्यंत इआरपी संगणक प्रणालीमध्ये जमा खर्चाची अंतिम आकडेवारी नोंदवून अंतिम व्याजाची तपासणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

१६ जानेवारीला आयुक्तांकडून जमा- खर्चाच्या बाजूचा आढावा घेऊन अंदाजपत्रकात अंतिम स्वीकृती केली जाईल. ३० जानेवारीला स्थायी समितीला अंदाजपत्रक सादर करण्याचे नियोजन आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trapit Bansal: भारतीय तरुणाचा जगभरात डंका! IITian त्रपित बंसलला Meta कडून अब्जावधींची ऑफर; सॅलरी ऐकून व्हाल थक्क

Pune News : पुणे बाजार समितीच्या दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा राजीनामा

Latest Maharashtra News Updates : मध्य वैतरणा धरणाचे तीन दरवाजे उघडले, लगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Pune court verdict : पत्नीशी दोनदा घटस्फोट, तिसऱ्यांदा लग्नाचं वचन देत केला बलात्कार? ; पुणे कोर्टाने पतीला सोडलं निर्दोष, कारण...

Viral Video: महिला पोलिसाचं धाडस! महाकाय १६ फूट लांब किंग कोब्रा पकडला, पाहा थरारक व्हायरल व्हिडिओ

SCROLL FOR NEXT