Action taken against smokers by city police sakal impact nashik news  esakal
नाशिक

Sakal Impact : शहर पोलिसांकडून धूम्रपान करणाऱ्याविरुद्ध कारवाईचा बडगा

सकाळ वृत्तसेवा

Sakal Impact : शहरात सर्रास प्रतिबंधित गुटख्याची विक्री होते तर, सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास मनाई असतानाही त्याकडे दुर्लक्ष करीत बिनदिक्कतपणे धूम्रपान करणाऱ्यांविरुद्ध बुधवारी (ता.२१) शहर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला.

‘सकाळ’ मधून यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध होताच शहर पोलिसांनी थेट ‘कोटपा’ अन्वये दंडात्मक कारवाई केली. (Action taken against smokers by city police sakal impact nashik news)

गेल्या काही दिवसांपासून शहर पोलिसांकडून प्रतिबंधित गुटख्याविरोधात धडक कारवाई सुरू आहे. आत्तापर्यंत लाखोंचा गुटखा जप्त केला तरीही शहरात चोरीछुप्या रितीने गुटख्याची विक्री चालते.

यासंदर्भातील वृत्त ‘सकाळ’ मध्ये प्रसिद्ध झाले होते. याबाबत पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पोलिस ठाणेनिहाय कोटपाअन्वये टपरीचालकांसह सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

त्यानुसार, शहरातील १३ पोलिस ठाण्यासह शहर गुन्हे शाखेच्या युनिटच्या पथकांनी आयुक्तालय हद्दीत बुधवारी (ता. २१) दुपारनंतर कारवाईचा बडगा उगारला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

यामध्ये पोलिसांनी ११३ जणांविरुद्ध कोटपाअन्वये कारवाई करीत त्यांच्याकडून ८ हजार रुपयांचा दंड वसुल केला आहे. तसेच सदर कारवाई आणखी काही दिवस पोलिसांकडून राबविली जाणार आहे.

त्याचप्रमाणे, प्रतिबंधित गुटख्याची विक्री करणाऱ्या टपऱ्यांवरही पोलिसांकडून करडी नजर ठेवली जात असून, लवकर अशा टपरीचालकांविरोधात थेट गुन्हे दाखल करून कारवाई केली जाणार असल्याचे संकेत पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिले आहेत.

दरम्यान, शहरात सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्याविरोधात केलेल्या कारवाईत सर्वाधिक कारवाई अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली आहे. सिडकोत २८ तर, इंदिरानगर, भद्रकाली, सरकारवाडा, म्हसरुळ, नाशिक रोड या परिसरातही मोठ्या प्रमाणात पोलिसांनी कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND W vs PAK W : भारताचा पाकिस्तानला धुळ चारत सर्वात मोठा विजय! दिप्ती शर्माचा विकेट्सचा पंजा, तर श्री चरणीही चमकली

NDA ला मोठा धक्का! 2026 नंतर आघाडीमध्ये पहिली फूट पडली; मोठ्या मित्रपक्षाने साथ सोडली, राजकीय समीकरणे बदलणार?

TMC Split: पश्चिम बंगालच्या राजकारणात भूकंप! टीएमसीचे बंडखोर खासदार दुसऱ्या पक्षात विलीन होणार; NDA ला पाठिंबा देणार

Poet Honoured: रुबाईकार रमेश वैद्य यांना काव्यरसिकचा जीवनगौरव; ‘खरे कवी आणि सच्चे माणूस’ असा हिमांशू कुलकर्णींचा गौरवोद्गार

Manchar Crime : मंचरमध्ये तरुणीला कालव्यात ढकलण्याची धक्कादायक घटना; आरोपी तरुण अटकेत, एनडीआरएफकडून तीव्र शोधमोहीम

SCROLL FOR NEXT