pratap dighavka 
नाशिक

"शेतकरी, युवकांची फसवणूक केली, तर गाठ माझ्याशी" - IGP प्रताप दिघावकर

रविंद्र पगारे

नाशिक/कळवण : शेतकऱ्यांच्या प्रश्नांची मला जाण असून, माझ्या मातृभूमीवर माझे प्रेम आहे म्हणून मी आता मातृभूमीच्या सेवेसाठी आलो आहे. त्यामुळे यापुढे जर कोणी शेतकऱ्यांची आणि सुशिक्षित बेरोजगार युवकांची फसवणूक केली तर गाठ माझ्याशी आहे, असा गर्भित इशारा नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांनी कळवण येथे झालेल्या कार्यक्रमप्रसंगी दिला. 

रवींद्र देवरे मित्रमंडळ कळवण तालुका व सर्वपक्षीय पदाधिकारी यांच्यातर्फे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांचा सत्कार समारंभ व शेतकरी संवाद कार्यक्रम साई लॉन्सवर झाला. ज्येष्ठ नेते बाबूलाल पगार अध्यक्षस्थानी होते. खासदार डॉ. भारती पवार, अपर पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत खांडवी, पोलिस उपअधीक्षक ढोले, कळवण पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ, देवळा पोलिस निरीक्षक सुहास देशमुख, अभोणा सहाय्यक पोलिस निरीक्षक उमाकांत गायकवाड आदी प्रमुख पाहुणे होते. 

शेतकरी फसवणुकीचा नवीन कायदा लवकरच

सत्कारप्रसंगी डॉ. दिघावकर म्हणाले, की नाशिक, नगर, धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यात यापूर्वी शेतकरी फसवणुकीचे गुन्हे दाखल केले जात नव्हते, मी पदभार घेतल्यानंतर पाचही जिल्ह्यांतील पोलिस अधीक्षकांना शेतकरी फसवणुकीचे तत्काळ गुन्हे दाखल करण्याच्या सूचना केल्याने आतापर्यंत व्यापाऱ्यांकडून फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना चार कोटी रुपये परत मिळाले असून, १६९ व्यापाऱ्यांनी दिवाळीपर्यंत शेतकऱ्यांना पैसे परत करण्याबाबत लिहून दिले आहे. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांची २२ कोटी रुपयांची फसवणूक झाली असून, राज्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांनी आणि अन्य घटकांनी फसवणूक केल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना अमळनेर येथील कार्यक्रमात निदर्शनास आणून दिले. राज्य सरकार लवकरच शेतकरी फसवणुकीचा नवीन कायदा निर्गमीत करणार असल्याचे डॉ. दिघावकर यांनी या वेळी सांगितले. 

डॉ. दिघावकर यांचा कळवण तालुक्यातील सर्वपक्षीयांतर्फे रवींद्र देवरे, नारायण हिरे, बाबूलाल पगार, शीतलकुमार अहिरे, दशरथ बच्छाव, संतोष देशमुख, भाऊसाहेब शिंदे यांनी सत्कार केला. या वेळी खासदार डॉ. भारती पवार, देवीदास पवार, राजेंद्र भामरे, संतोष देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास ॲड. परशुराम पगार, अशोक पवार, कृष्णा बच्छाव, शांताराम जाधव, शरद गुंजाळ, हेमंत पाटील, महेंद्र हिरे, अंबादास जाधव, जयंत पवार, अतुल पगार, नीलेश जाधव, बी. एन. पगार, मोतीराम पगार, विकास देशमुख, गोविंद पगार, रामा पाटील, कैलास चव्हाण, भाऊसाहेब शिंदे, नरेंद्र पवार आदी उपस्थित होते. राकेश हिरे यांनी सूत्रसंचालन केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Premanand Maharaj Ashram Death : प्रेमानंद महाराजांच्या आश्रमातील शिष्याच्या मृत्यूचे गूढ वाढले; मोबाईल, मानसिक स्थितीची पोलिसांकडून चौकशी

Transport & Logistics Reform : देशातील वाहतूक कोंडी आणि लॉजिस्टिक्स खर्चावर तोडगा! केंद्र सरकार स्थापन करणार 'एकात्मिक वाहतूक आणि लॉजिस्टिक्स प्राधिकरण'

IND vs WI, 1st T20I: नमन धीरला पदार्पणाची संधी, वैभवची निवड झाली की नाही? पाहा कशी आहे भारताची Playing XI

Marathi News Live Updates: कत्तलीसाठी गायी नेत असल्याच्या संशयावरून टेम्पो अडविला; दोघे ताब्यात

Satana News : दुष्काळ जाहीर; मात्र शेतकरी डिजिटल चक्रव्यूहात, सातबारा अन् ‘फार्मर आयडी’साठी संकेतस्थळे ठप्प

SCROLL FOR NEXT