government office
government office sakal
नाशिक

Nashik News: सरकारी काम अन सहा महिने थांब..! रिक्त जागांमुळे सरकारी कामकाज अधू, कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : ‘सरकारी काम अन् सहा महिने थांब’ अशी म्हण आहे. यास सरकारी व्यक्ती, प्रवृत्तीबरोबरच सरकारी धोरणेदेखील कारणीभूत आहे. सरकारी धोरणात महसुली खर्चाचा समावेश होतो. महसुली खर्चात सातत्याने वाढ होत आहे. महसुली खर्चात अधिकारी, कर्मचाऱ्यांचे वेतनावर सर्वाधिक खर्च होतो.

त्याव्यतिरिक्त वीज, पाणी, वाहने, सरकारी कर व अन्य पायाभूत या बाबींचा समावेश होतो. वाढत्या खर्चामुळे रिक्त पदे भरण्याला कायद्याने मर्यादा आहे. त्यामुळे रिक्त पदाच्या व्यक्तीचे कामाचा बोजा अन्य कर्मचाऱ्यांवर पडतो.

काम करण्यास मर्यादा आहे. कामाच्या मर्यादेमुळे काम करण्यास टाळाटाळ होते. या सर्वांचा परिणाम कामकाजावर होतो. एकीकडे राज्यात आरक्षणाची लढाई सुरू असताना दुसरीकडे सरकारी कार्यालयांमध्येदेखील भरती प्रक्रिया राबविली जात नाही. या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या सरकारी कार्यालयातील रिक्त जागांचा ‘सकाळ’ टीमने आढावा घेतला. (Additional stress on employees due to vacancies in government office nashik news)

नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक पदे महापालिकेत आहे. नवीन आकृतिबंधानुसार ९ हजार पदे निर्माण केली जाणार आहे. जुन्या आराखड्यात जवळपास ७७१७ पदे आहेत. त्यातील ३३३९ पदे रिक्त आहे, तर ४७८ पदे कार्यरत आहेत.

जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, सहकार विभाग, पोलिस, जिल्हा रुग्णालय या महत्त्वाच्या कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात रिक्त पदे आहेत. या सर्वांचा परिणाम कामकाजावर होत असल्याने कामाची गती मंदावली आहे. रिक्त पदांची भरती केल्यास शासन आपल्या दारी उपक्रम राबविण्याची आवश्‍यकता राहणार नाही. सरकार गतिमान करण्यासाठी पदांचा अनुशेष भरणे गरजेचे आहे.

महापालिकेत ३३३९ पदे रिक्त

नाशिक महापालिकेला ‘ब’ वर्गाचा दर्जा मिळाल्याने पदांचा नवीन आकृतिबंध तयार करण्याचे काम सुरू आहे. २०१८ मध्ये शासनाला १४ हजार पदांचा आकृतिबंध सादर करण्यात आला होता. परंतु राज्य शासनाने नव्याने आराखडा सादर करण्याच्या सूचना दिल्याने त्याअनुषंगाने ९ हजार पदांचा आकृतिबंध सादर केला जाणार आहे.

सद्यःस्थिती

एकूण मंजूर पदे- ७७१७

सरळसेवेसाठी मंजूर पदे- ६३२३

कार्यरत पदे- ४,३७८

रिक्त पदे- ३,३३९

जिल्हाधिकारी कार्यालयात ४०५ जागा रिक्त

महसूल विभागाचा कणा समजण्यात येणाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध पदांच्या एकूण ४०५ जागा रिक्त आहेत. यातील तलाठी पदाच्या २७० जागांसाठी परीक्षा झाली असून, राज्य शासनाकडून नियुक्ती आदेश मिळताच या जागा भरण्यात येतील. तर महसूल सहायकांच्या ५७ जागांच्या भरतीची प्रक्रिया सध्या सुरु असल्याने एकंदरीत या विभागात रिक्त जागांची संख्या तुलनेने कमी दिसून येते.

जिल्ह्याचा कारभार जिल्हाधिकारी कार्यालयातून चालतो. त्यामुळे येथील अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना महत्त्व प्राप्त होते. जिल्ह्याचा कारभार गतिमान करणाऱ्या या विभागात रिक्त जागा राहिल्या तर त्याचा कामकाजावर परिणाम होऊ शकतो. जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांनंतर अपर जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदारांपासून ते तलाठी व वाहन चालकांपर्यंत एकूण बारा पदांसाठी एकूण १५७३ जागा आहेत.

त्यापैकी ११६८ कार्यरत असून अवघे ४०५ रिक्त दिसतात. त्यातही तलाठी व महसूल सहायकांची भरती प्रक्रिया सुरु असल्याने त्यांची लवकरच नियुक्ती होईल. यानंतर रिक्त जागांची संख्या अजून कमी होणार आहे. अनुकंपा भरतीमुळे जिल्ह्यातील बहुतांशी रिक्त जागांचा प्रश्न निकाली निघाला आहे.

रिक्त पदांचा गोषवारा

पद मंजूर पदे कार्यरत रिक्त

अपर जिल्हाधिकारी २ २ ०

उपजिल्हाधिकारी २० १८ २

तहसीलदार २८ २७ १

नायब तहसीलदार ८३ ७० १३

लघुलेखक उच्च श्रेणी १ १ ०

लघुलेखक निम्म श्रेणी १२ ५ ७

लघुटंकलेखक ६ ० ६

अव्वल कारकून २२७ २२६ १

महसूल सहायक ३१७ २२६ ९१

मंडळ अधिकारी १२६ १२५ १

तलाठी ७११ ४४१ २७०

वाहन चालक ४० २७ १३

जिल्हा परिषद संवर्गातील मंजूर पदे व रिक्त पदे

गट मंजूर संख्या भरलेली पदे रिक्त असलेली पदे

गट ब १२३३ ६२० १०९०

गट क १६०५४ १३७४० २७६४

गट ड १०३३ ८१३ २२०

एकूण १८,७७० १५,१७३ ४०७४

सहकार विभाग

जिल्हा उपनिबंधक कार्यालय (वर्ग १, वर्ग २, वर्ग ३ व वर्ग ४ मिळून)

मंजूर पदे भरलेली पदे रिक्त

२३२ ११३ ११९

नाशिक जिल्हा मध्यवर्ती बॅक

- १२०० कर्मचारी

- ७५० कायमस्वरूपी

- ४०० कंत्राटी

२०१५-१६ मध्ये १६४० कर्मचारी भरतीसाठी कृती आराखडा शासनाला सादर झालेला आहे. परंतु, त्यावर शासनाकडून अद्याप कार्यवाही झालेली नाही

आदिवासी विकास विभाग (आयुक्तालय)

एकूण मंजूर पदे- १४,३५९

भरलेली पदे- १०,२५४

रिक्त पदे- ४,१०५

- आदिवासी आयुक्तालयांतर्गत ६०१ जागांसाठी भरती प्रक्रीया सुरू झालेली आहे. यात आयुक्तालयात १६, नाशिक अपर आयुक्तालयात १६६, ठाणे अपर आयुक्तालयात १४५, नागपूर अपर आयुक्तालयात १९२ पदे

(पदनिहाय संख्या - उच्च श्रेणी लघुलेखक- ०३, निम्न श्रेणी लघुलेख- १३, वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक- १४, संशोधन सहायक- १७, उपलेखापाल/मुख्य लिपिक- ४१, वरिष्ठ लिपिक/सांख्यिकी सहायक- १८७, लघुटंकलेक- ५, गृहपाल (पुरुष)-४३, गृहपाल (स्त्री)- २५, अधीक्षक (पुरुष)- २६, अधीक्षक (महिला)- ४८, ग्रंथपाल- ३८, प्रयोगशाळा सहायक- २९, आदिवासी विकास निरीक्षक- ८, सहायक ग्रंथपाल- १, प्रा. शिक्षणसेवक (मराठी)- २७, मा. शिक्षणसेवक (मराठी)- १५, उच्च माध्यमिक शिक्षणसेवक- १४, प्रा. शिक्षणसेवक (इंग्रजी)- ४८)

जिल्हा शासकीय रुग्णालय (जिल्हा रुग्णालय लोगो)

वर्ग मंजूर पदे भरलेली पदे रिक्त पदे

वर्ग-१ ७६ ३३ ४३

वर्ग-२ २३३ १५१ ८२

वर्ग-३ ९७ ६९ २८

वर्ग-३ (नर्सिंग) ५०३ ४८८ १५

वर्ग-४ २९१ १७३ ११८

शहर पोलिस (पोलिस आयुक्त कार्यालय फोटो)

वर्ग-१ एकूण पदे-७

वर्ग-२- एकूण पदे- ७५

वर्ग -३- पोलिस शिपाई- ३०००

ग्रामीण पोलिस (ग्रामीण पोलिस कार्यालय फोटो)

वर्ग- १- ३

वर्ग- २ - ७०

वर्ग-३- पोलिस शिपाई, हवालदार- ३५००

(माहिती संकलन : विक्रांत मते, नरेश हाळनोर, किरण कवडे, विकास गामणे)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

Nashik Lok Sabha Election 2024: ना पाण्याची सोय, ना उन्हापासून संरक्षण! मतदारांमध्ये तीव्र नाराजी; व्हिलचेअरमुळे दिलासा

SCROLL FOR NEXT