Tuljabhavani Temple at ravivar peth esakal
नाशिक

Adimaya- Adishakti : घाटावरची तुळजाभवानी

सकाळ वृत्तसेवा

सप्तमी नवदुर्गामाता कालरात्री

हृीं कालरात्री श्रींकराली चक्‍लींकल्‍याणी कलावती।
कालमाताकलिदर्पध्नीकमदींशकृपन्विता ।।

रविवार पेठ, डांगर उतारा येथे अतिप्राचीन पेशवेकालीन २०० मीटर रुंदीचा ग्‍यानूआप्पा नावाने प्रसिद्ध दगडी घाट आहे. या घाटावर पिंपळाच्या छायेत विश्रांतीचे देवीचे ठिकाण श्री तुळजा भवानीमाता मंदिर आहे. सुमारे ३०० वर्षांपासून देवीचे घाटावर वास्‍तव्य आहे. (Adimaya Adishakti Ghatavarchi Tuljabhavani navratri 2022 Nashik Latest Marathi News)

आख्यायिका

पेशवेकाळात गोदावरीच्या तटावर प्राचीन पिंपळाच्या छायेत एक शेंदूर लावलेली पूर्वाभिमुख शिळा, तसेच समोर भवानी शंकराचे मंदिर शुलेश्‍वर महादेव, दोन्ही बाजूस हनुमंताची मंदिरे, बालसिद्ध गणेश मंदिर, मंदिराच्या मागे मुंजा, वेताळ महाराज मंदिर, झेटिंग व सती आसरा अशी मंदिरे आहेत.

सर्व मंदिराची पूजाव्यवस्‍था वाघ परिवाराकडून केली जाते. श्रीपत वाघ हे १९६८ मध्‍ये देवीच्या दर्शनासाठी तुळजापूरला गेले असता त्‍यांना बालिकेच्या रूपात देवीचा साक्षात्‍कार झाला. सात वर्ष वयाच्या बालिकेने त्‍यांना नावानिशी हाक मारत ‘तू एवढ्या लांब का आलास, मी तर तुझ्याजवळच पिंपळाच्या छायेत विश्रांती घेत आहे. तिथेच तू माझी सेवा कर’, असे म्‍हणाली नंतर शोधाशोध केली असता बालिका कुठे दिसेना.

ते घरी आल्‍यावर परंपरागत पिंपळाच्या छायेतील शेंदूर लावली शिळाकडे लक्ष गेल्‍यावर त्‍यावरील शेंदूर काढला असता, आश्‍चर्यच! आत तुळजा भवानीमातेची हुबेहुब मूर्ती होती. नंतर त्‍यांनी तिथेच देवीचे मंदिर बांधले. तुळजापुरात कल्‍होळ तीर्थ आहे. या ठिकाणी तीर्थ गोदावरी नदी आहे. म्‍हणून घाटावरची तुळजाभवानी म्‍हणून प्रसिद्ध आहे. अलीकडच्‍या काळात १९९८ मध्‍ये मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला.

नवरात्रात दैनंदिन पूजा व सप्तशतीचे पाठ प्रदीप कुलकर्णी गुरुजी करतात. नवमीला होम करून पूर्णाहुती दिली जाते. तसेच दर पौर्णिमेला पोत पाझळून मंदिराला प्रदक्षिणा घातली जाते. दसऱ्याला रात्री १२ वाजता आरती करून कडकण्यांचा प्रसाद भक्‍तगणांमध्ये वाटण्यात येतो. देवीला विश्रांतीसाठी पाच दिवस मंदिरामध्ये पडदा लावला जातो. श्रीपत वाघ यांची मुले, नातू हिरामण, निवृत्ती वाघ, सर्जेराव वाघ हे मंदिराची व्यवस्‍था सांभाळत आहेत.

"परंपरेनुसार श्रीपत माझे वडील यांना झालेला साक्षात्‍कार व त्यानुसार देवीचे रूप अगदी तुळजापूरला असल्‍याचाच अनुभव येत असतो. देवीचे विश्रांतीचे ठिकाण म्‍हणून देवीने निर्जनस्‍थळाची निवड करत येथे वास्‍तव्य केले आहे." - हिरामण वाघ, व्‍यवस्‍थापक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Chairman : माळेगाव कारखाना चेअरमनपदी अखेर अजितदादाचं! , विरोधकांच्या आक्षेपावर निवडणूक अधिकारी म्हणाले, आता...

ENGU19 vs INDU19 : १३ चौकार, १० षटकार! वैभव सूर्यवंशीचे विक्रमी शतक; फक्त २३ चेंडूंत चोपल्या ११२ धावा, निघाली इंग्लंडची हवा

Mumbai News: मुंबईत पावसामुळे रस्त्यांची दैना, खड्ड्यांची आकडेवारी समोर, पण पालिकेचा वेगळाच दावा

Cyber Fraud : जळगावात सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार: 'सीबीआय'च्या नावाने निवृत्त डॉक्टरला ३१ लाखांना गंडवले

Top 5 Government Schemes: सरकारच्या तिजोरीतून तुमच्यासाठी खास! ‘पीएम किसान’सारख्या 'या' 5 योजना ठरतील तुमचं आर्थिक कवच

SCROLL FOR NEXT