Durgamata Kanch Mandir esakal
नाशिक

आदिमाया- आदिशक्‍ती : शालिमार येथील दुर्गामाता काच मंदिर

सकाळ वृत्तसेवा

चतुर्थी नवदुर्गा माता कुष्‍मांडा
दुर्गतिनाशिनी त्‍वंहि दारिद्रादि विनाशिनीम् ।
जयंदा धनदां कूष्‍माण्डे प्रणमाम्यहम् ।।


शालिमार चौकात १९४९ पासून दुर्गामाता मंदिर आहे. सुरवातीच्या काळात छोटेखानी मंदिर होते. नंतर १९८१ मध्ये मंदिराचा जीर्णोद्धार झाला. विशेष म्‍हणजे जीर्णोद्धारात मंदिरात काचकाम केले. तेव्हापासून नाशिकमधील पहिले काचकाम केलेले मंदिर म्‍हणून प्रसिद्ध आहे. (Adimaya Adishakti navratri 2022 Durga Mata kanch mandir in Shalimar Nashik Latest Marathi News)

आख्यायिका

सोमेश्‍वर धबधबा येथे ‘दावेदार’ या चित्रपटासाठी देवीच्या मंदिराचा सेट उभारून चित्रीकरण झाले होते. चित्रीकरणानंतर आवराआवर केली, मात्र देवीची मूर्ती तिथेच होती. मंदिराचे संस्‍थापक पंडितराव ससाणे हे पूर्वी रिक्षाचालक होते. एके दिवशी भाडे घेऊन गेले असता, त्‍यांची नजर मूर्तीवर पडली. मूर्तीवरची धूळ झटकत त्‍यांनी धबधब्‍याच्या पाण्याने स्‍नान घालून पूजा केली.

त्‍याच रात्री देवीने त्‍यांना दृष्‍टांत दिला. दुसऱ्या दिवशी त्‍यांनी प्रसन्न मुद्रा असलेली देवीची मूर्ती आणून शालिमार चौकातील एका कोपऱ्यात प्रतिष्‍ठापना केली. हळूहळू या मंदिराची व्याप्ती व देवीची महती वाढत गेली. नंतर जयपूरच्‍या कारागिराकडून १९८१ मध्ये मंदिरात काचकाम केले. जयपूरचा चित्रकार प्रेमलता ल‍क्ष्‍मीनारायण व त्‍यांचे सहयोगी श्रवण, रमेश, तनुज व भंवर कैसरे यांनी अतिशय सुरेख काचकाम केलेले आहे.

अष्‍टमीला मंदिरात होम केला जातो. कोजागरीला देवीला नेसवलेल्‍या साड्यांचे, चुनरी, देवीसाठी भक्‍तांनी वाहिलेले साहित्‍य गरजूंना वाटप करण्यात येते. विशेष म्‍हणजे देवीला ३६५ दिवस म्‍हणजेच रोज नवीन साडी घातली जाते. देवीची साडी ही झगमग स्‍वरूपातील जसे की डायमंड वर्क केलेली डिझायनर साडी या स्‍वरूपातील असते.

"'भला कर, तेरा लाभ होगा, याद कर तुझे दया मिलेगी’, ही आईची शिकवण सतत लक्षात ठेवून त्यानुसार सर्व कर्म करत आहे. आईनेही ६० वर्षे देवीची सेवा केली. आता मुले व नातू मंदिराची व्यवस्‍था बघत आहेत. पुढची पिढीही यात आनंदाने सहभागी झाली आहे, याचा आनंद व समाधान आहे." - पंडितराव ससाणे, दुर्गादेवी काच मंदिर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China criticizes US: भारताची बाजू घेत चीनने पुन्हा एकदा अमेरिकेवर केली उघडपणे टीका, म्हटले...

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT