idol of Ghatan Devi
idol of Ghatan Devi esakal
नाशिक

Adimaya- Adishakti : नवसाला पावणारी ग्रामदैवत घाटनदेवी माता

सकाळ वृत्तसेवा

मुंबई-नाशिक महामार्गावर अत्यंत नागमोडी वळणाचा कसारा घाट आहे. इगतपुरीत प्रवेश करताना थळ घाटाच्या पायथ्याशी शिवकालीन काळापासून प्राचिन घाटनदेवीचे मंदिर आहे. घाटात देवीचे स्थान असल्यामुळे ‘घाटनदेवी’ म्हणून ते प्रसिद्ध झाले आहे.

घाटनदेवीचे रूप अत्यंत विराट असून, संकटसमयी भक्तांच्या मदतीला धावणारी व नवसाला पावणारी म्हणून घाटनदेवीचा महीमा आहे. घाटनदेवीचा श्रीदुर्गा सप्तशतीत शैलपुत्री, ब्रह्माचारिणी, चंद्रघाटा, कृष्णाडा, स्कंदमाता, कात्यायानी, कालरात्री, महागिरी, महासिद्धी, महागौरी व रिद्धी-सिद्धी, असे विविध रूपे आहेत. (Adimaya Adishakti Village deity Ghatandevi Mata Navratri 2022 Nashik Latest Marathi News)

यातील पहिले रूप म्हणजे शैलपुत्री म्हणजेच घाटनदेवी माता होय. प्राचिन माहितीनुसार देवी वजरेश्वरीहून भीमाशंकरकडे येण्यास निघाली. त्यावेळेस नैसर्गिक वातावरण आणि सुंदर परिसराने मोहीत होऊन देवीने येथे मुक्काम ठोकला अशी पुरातन कथा आहे. तीच घाटनदेवी होय. ‘शैलाधिराज तनया’ म्हणूनही देवीची ओळख आहे. मंदिरासमोरच उंटदरी नावाचे सृष्टीसौंदर्याने नटलेले ऐतिहासिक स्थान आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याणचा खजिना लुटून उंट याच दरीत लोटले होते. यामुळे दरीला ‘उंटदरी’ असे नाव पडले. त्याचा अपभ्रंश उंटदरी असा झाल्याचे इतिहासात नमूद आहे. जव्हारकडून पुण्याकडे मावळ प्रातांत जाणारा अतिदुर्गम रस्ता याच उंटदरीतून होता. भातसा नदीचा उगम उंटदरीतून झाला आहे. उंटदरीपासून जवळच असणाऱ्या घाटनदेवी मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज कल्याणमार्गे थळ घाटात आले होते.

या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांसह घाटनदेवीची यथासांग व शास्त्रोक्त पूजा अर्चा करून देवीचे दर्शन घेतल्याची नोंद इतिहासात आहे. देवीचे लोभस आणि तेजस्वी रूप आजही भाविकांच्या आकर्षणाचे केंद्रस्थानी आहे. वाघावर रूढ असलेली घाटनदेवी भक्तांना प्रसन्न मुद्रेने आशीर्वाद देऊन पुढील प्रवास सुखाचा होवो, याचे वरदान देते. मंदिराच्या आसपास कुठलाही आघात वा अपघात घडला नाही आणि गावावरही संकट आले नाही, अशी स्थानिकांची धारणा आहे.

नवरात्रोत्सवात नऊ दिवस यात्रा भरते. खाद्यपदार्थ, खेळणी व सौंदर्यप्रसाधनाची दुकाने थाटली असतात. राज्याच्या विविध भागातून भाविक दाखल होतात. भाविकांची पहाटे पाचपासून ते रात्री अकरापर्यंत दर्शनासाठी गर्दी असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

RCB Playoffs Scenario : चाहत्यांनो नाराज होऊ नका! RCB प्लेऑफमध्ये पोहोचणार, मुंबईनंतर गुजरातचाही खेळ जवळपास खल्लास

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

SCROLL FOR NEXT