Saptashrungi devi wani bus stand
Saptashrungi devi wani bus stand esakal
नाशिक

Nashik : आद्यशक्तिपीठ सप्तशृंगी (वणी) गडावर होणार सुसज्ज बसस्थानक

दिगंबर पाटोळे

वणी (नाशिक) : साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धेपीठ असलेल्या सप्तशृंगी गडावरील प्रस्तावित नवीन बसस्थानकाचे कामास अखेर मंजुरी मिळाली असून परिवहन महामंडळाने सप्तशृंगी गड ग्रामपंचायतीकडे नवीन बसस्थानकासाठी जागेची मागणी केली आहे.

दरम्यान ग्रामपंचायतीने याबाबत विशेष ग्रामसभा बोलावून ग्रामसभेत शिवालय तलाव परीसरात बसस्थानकासाठी जागा उपलब्ध करुन देण्याचा ठराव करण्यात आल्याने भाविकांना गडावर सुसज्ज व अद्यावत बसस्थानकाच्या कामाचा मार्ग मोगळा झाला आहे. (Adi Shakti Peeth Saptashrungi gad will get equipped bus station Nashik latest marathi new)

आदिमायेच्या भक्तीभावा बरोबर निसर्गरम्य सौदर्याने नटलेल्या सप्तशृंगी गडावर चैत्रोत्सव, नवरात्रोत्सव, कावडयात्रा या प्रमुख उत्सवांबरोबरच धुर्मास, शांकबरी नवरात्र आदी उत्सव मोठ्या भक्तीभावाने लाखो भाविकांच्या उपस्थित साजरे केले जातात. तसेच दिवाळी, नाताळ, उन्हाळी सुट्टयां बरोबरच रविवार, मंगळवार व शुक्रवार या दिवशी गडावर नियमित पेक्षा अधिक गर्दी असते.

सप्तशृंगीगडावर कळवण, नाशिक आगारासह, मुक्ताईनगर, सुरत (गुजरात), श्रीगोंदा, उस्मानाबाद तुळजापूर आदी राज्य परीवहन महामंडळाच्या आगाराच्या बसेस दररोज ये जा करतात. यात्रा कालावधीत लाखो तर दररोज हजारो भाविक गडावर बसेसद्वारे दर्शनासाठी येतात.

यातून महामंडळास लाखोंचे उत्पन्न मिळते, मात्र गडावर महामंडळाने दहा भाविकही बसु शकणार नाही असे छोटेसे बसस्थानक बांधले, मात्र त्यात काही दिवसांतच अतिक्रमन होवून बसस्थानक नसल्यासारखेच झाले. भाविकांना ऊन, थंडी, पावसात बसथांब्याच्या मोकळ्या जागेत भाविकांना ताटकळत उभे राहूण प्रतिक्षा करावी लागत असल्याने भाविकांची मोठी गैरसोय होत होती.

तसेच बसस्थानकात तीन बसेस पेक्षा अधिक बसेस उभ्या राहू शकत नव्हत्या. त्यामूळे भाविक प्रवाशांमध्ये नाराजी होती. दरम्यान सप्तशृंगी गडास साडेचार वर्षांपूर्वी तीर्थक्षेत्राचा 'ब' वर्गाचा दर्जा मिळालेला असल्याने ऑगस्ट २०१९ मध्ये तत्कालीन परीवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सन २०१८-२०१९ च्या अर्थसंकल्पात सप्तशृंगी गडाच्या सर्वसुविधायुक्त अद्यावत बसस्थानकासाठी सुमारे तीन कोटी रुपयांची तरतुद केलेली होती.

सदर नवीन बसस्थानकासाठी ग्रामपंचायतीने शिवालय तलावाजवळील जागा देण्याची संमती दिलेली आहे. मात्र परिवहन विभागाकडून प्रस्तावित नविन बसस्थानकासाठी कुठलीच कार्यवाही होत नसल्याने सप्तशृंगी गड ग्रामपंचायतीचे तत्कालीन पदाधिकारी तसेच विद्यमान पदाधिकारी, ग्रामस्थ यांचे शिष्टमंडळाने फेब्रुवारी २०२० मध्ये तत्कालीन परिवहन मंत्री अनिल परब यांची मुंबई येथे तसेच गडावर दर्शनासाठी आले असतांना भेट घेवन बसस्थानकाबाबत चर्चा करुननिवेदन दिले होते.

यावेळी मंत्री अनिल परब यांनी लवकरच बसस्थानकासाठी निधी उपलब्ध करुन देवून प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन शिष्टमंडळास दिले होते. दरम्यान कोविड मुळे एक ते दीड वर्ष नियोजित बसस्थानकाचा प्रश्न लांबणीवर पडला असला तरी राज्य परिवहन महामंडळास सप्तशृंगी गडावर नवीन बसस्थानक बांधण्यास शासनाची मंजुरी मिळाली असल्याचे १० ऑगस्ट २०२२ रोजीचे पत्र राज्य परिवहन महामंडळाचे नाशिक विभागीय नियंत्रक यांच्याकडून सप्तशृंगी गड ग्रामंपचायतीस देण्यात आले आहे.

यात महामंडळाचे बसस्थानक बांधण्यासाठी शासकीय जागा उपलब्ध करून देणेबाबतचे पत्रान्वये अद्ययावत बसस्थानक बांधकामासाठी साधारणतः दिड ते दोन एकर किंवा त्यापेक्षा अधिक मुख्य रस्त्यालगत जागेची आवश्यकता असल्याचे कळवून जागेची मागणी केलेली आहे. त्यानूसार आज ता. २४ रोजी सप्तशृंगी गड ग्रामपंचायतीने बसस्थानकासाठी जागा निश्चितीसाठी सरंपच रमेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभा आयोजित केली होती.

या ग्रामसभेत उपस्थित ग्रामस्थ, महिला यांनी शिवालय तलाव नजीक असलेल्या जागेवर बसस्थानकासाठी जागा उपलब्ध करुन देण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. दरम्यान, सप्तशृंगीगडावर आता भाविकांना सप्तशृंगी गड येथे सुसज्ज व सुंदर असे बसस्थानक पाहायला मिळणार असून सप्तशृंगी गडावर लवकरच बसस्थानकाचे काम सूरु व्हावे यासाठी भाविक व ग्रामस्थ प्रतीक्षेत आहे.

शिवालय नजीक बसस्थानकासाठी जागा देण्याचा निर्णय आज ग्रामसभेत घेण्यात आला आहे. अनेक वर्षांपासून गडावर अपुऱ्या बसस्थानकामूळे भाविकांची गैरसोय होत होती. सुसज्ज बसस्थानकामूळे स्थानिकांना रोजगार, व्यवसायास चालना मिळेल. बसस्थानक लवकरात लवकर व्हावे यासाठी ग्रामपंचायतीचा ठराव करून पाठपुरावा करण्यात येईल. रमेश पवार, सरपंच, सप्तशृंगी गड,

मंजुर झालेल्या बसस्थानकामूळे सप्तशृंगी गडाच्या वैभवात भर पडणार असून भाविक व पर्यटकांची बसस्थानका अभावी होणारी गैरसोय दूर होणार आहे. बसस्थानकासाठी राज्य परिवहन महामंडळास ग्रामपंचायतीकडून आवश्यक बाबींची पूर्तता करुन देण्यात येईल. संदीप बेनके, ग्रामपंचायत सदस्य

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT