suraj-mandhre1111.jpg 
नाशिक

प्रशासनाचे सहकार्य अन् शिक्षकास आभाळच ठेंगणे! ठरतोय चर्चेचा विषय!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक/ खामखेडा : लॉकडाउनमध्ये मुलाची औषधे बेंगळुरूहून मागणे ही सर्वसामान्यांच्या दृष्टीने आवाक्‍यातली गोष्टच नव्हे, मात्र राष्ट्रीय आपत्तीच्या काळात रात्रंदिवस कार्यरत जिल्हा प्रशासनातील प्रमुख जिल्हाधिकारी सूरज मांढरे, उपजिल्हाधिकारी नीलेश श्रींगी व शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर यांच्यामुळे जिल्हा परिषदेच्या एका प्राथमिक शिक्षकाला आपल्या मुलाची औषधे थेट बेंगळुरूहून मुंबईला मिळाली. शिवाय कमी कालावधीत नाशिक ते मुंबईपर्यंतचा प्रवास परवाना मिळाल्याने या शिक्षकास आभाळच ठेंगणे झाल्याचा अनुभव नुकताच आला. 

 प्रशासनामुळे शिक्षकाच्या चेहऱ्यावर हसू 
शिक्षक रमेश (नाव बदलले आहे) यांच्या मुलास अत्यंत दुर्मिळ असा आनुवंशिक आजार आहे. या आजाराची औषधे पूर्वी जर्मनी व इंग्लंड या देशांतून मिळत होती. मात्र वर्षभरापासून भारतातील बेंगळुरूस्थित एक कंपनी अशा औषधांची निर्मिती करत आहे. कुरिअरद्वारे ही औषधे घरपोच मिळतात. मात्र 24 मार्चला लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर औषध मिळणे दुरापास्त होऊ लागले. मार्चअखेरीपर्यंत औषधे पुरतील व त्यानंतर लागतील म्हणून त्यांनी 20 मार्चलाच औषधांची नोंदणी केली. मात्र लॉकडाउनमुळे औषधे थेट बेंगळुरूहून घ्यावीत, असे कळविण्यात आले. यामुळे रमेश यांनी शिक्षणाधिकारी डॉ. झनकर यांना आपल्या मुलाच्या औषधांबद्दल सांगितले. त्यांनी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या स्वीय सहाय्यकांशी बोलत शिक्षकाला थेट मांढरे साहेबांशी संपर्क साधायला लावला. 

दुर्मिळ आनुवंशिक आजाराने त्रस्त मुलास मुंबईहून मिळाली औषधे
जिल्हाधिकारी मांढरे यांच्याशी रमेश यांनी व्हॉट्‌सऍपवरून संपर्क साधला. त्यांनी सहाव्याच मिनिटाला अडचण जाणून घेत उपजिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधत कागदपत्रांची पूर्तता करायला लावली. त्यानंतर उपजिल्हाधिकारी नीलेश श्रींगी यांना सहकार्याबद्दल आश्‍वस्त केले. यादरम्यान कंपनीने मुंबईपर्यंत औषधे पाठविणार असे कळविले. प्रशासनाने रमेश यांना मुंबई जाण्यासाठीचा परवाना काही मिनिटांत उपलब्ध करून दिला. यामुळे मुंबई जाताना व येताना औपचारिक चौकशी अनेक चेकपोस्टवर झाली पण कोणताही त्रास न होता औषधे अंधेरीहून प्राप्त करता आली. जिल्हा प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांनी एक सामान्य शिक्षकाच्या मुलांच्या औषधांसाठी स्वतःहून पुढाकार घेत केलेली मदत हेदेखील चर्चेचा विषय ठरत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana Update : लाडक्या बहिणींनो लक्ष द्या! तुमच्या बँक खात्यात 1500 ऐवजी जमा होणार 3,000 रुपये? पण 'या' 80 लाख महिलांना बसू शकतो फटका!

Pune News: पुण्याची मान शरमेने खाली! एफ.सी. रस्त्यावर १५ दिवसांपासून मुतारीचे पाणी रस्त्यावर, प्रशासनाचा निष्काळजीपणा

Latest Marathi News Live Update : नवापूर तालुक्यातील कोंडाईबारी घाटात भीषण अपघात,ट्रॉला 35 फूट खोल दरीत कोसळला

'आयुष्मान सारथी' चॅटबॉट लॉन्च; WhatsApp वर मिळणार आयुष्मान भारत योजनेची सुविधा

RTI Maharashtra: माहिती अधिकार कायद्यातील बदलांना स्थगिती; मुख्यमंत्र्यांनी अण्णा हजारेंच्या मागण्यांची घेतली दखल, राळेगणसिद्धीत जल्लोष

SCROLL FOR NEXT