Maratha Samaj reservation question Community members from the district to search for Kunbi records. Esakal
नाशिक

Maratha Reservation: कुणबी नोंदींच्या शोधासाठी प्रशासन घेतंय पुरोहितांची मदत, राजेरजवाडे यांच्या वंशावळी अद्यापही टिकून

मराठा आरक्षण: कुणबी नोंदींच्या शोधासाठी प्रशासन घेतंय पुरोहितांची मदत

सकाळ वृत्तसेवा

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी या समाजातील मराठा कुणबी शोधण्यासाठी त्र्यंबकेश्‍वरबरोबरच नाशिकच्या तीर्थपुरोहितांकडील वर्षानुवर्षे जतन केलेल्या वंशावळी महत्त्वपूर्ण ठरण्याची शक्यता आहे.

याबाबत आज अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांनी गंगा गोदावरी पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांच्याशी संपर्क साधत वंशावळीबद्धल माहिती जाणून घेतली. याबाबतची पुढील बैठक लवकरच होणार असल्याची माहिती शुक्ल यांनी दिली. (administration support of priests for search of kunbi record nashik news)

मराठा समाजाच्या आरक्षणप्रश्‍नी कुणबी नोंदींच्या शोधासाठी राज्य शासनाची यंत्रणा पूर्णपणे कार्यरत झाली असून, त्यानुसार वेगवेगळ्या पातळ्यांवर कुणबी नोंदीचा शोध सुरू झाला आहे. यासाठी पुरावे शोधण्याचे व तपासण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात त्याबाबत स्वतंत्र कक्ष कार्यान्वित करण्यात आला असून, अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांच्याकडे ही जबाबदारी आहे.

त्यांच्या कार्यालयाकडून आज गंगा गोदावरी पुरोहित संघाच्या अध्यक्षांना चोपड्यांसह आमंत्रित करण्यात आले होते. या वेळी शुक्ल यांच्याकडील प्राचीन नोंदी पाहून अपर जिल्हाधिकारीही अचंबित झाले. शहरात जवळपास पाचशेच्या आसपास तीर्थपुरोहित कार्यरत असून, त्यांच्याकडील नोंदीवरून पुरावे तपासले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या चोपड्यांनाही महत्त्व आले आहे.

वंशावळ म्हणजे काय?

देशभरातून आलेले भाविक शहरातील पुरोहितांकडे जातात. ते कोणत्या भागातून आले यावरून त्यांचे नाव कोणत्या पुरोहितांकडे सापडेल, हे सपजते. वंशावळी लिहिण्याची ही परंपरा प्राचीन असल्याचे पुरोहित सांगतात. याआधारे त्यांच्याकडे कोण कोण येऊन गेले, याची स्वाक्षरीसह इत्थंभूत माहिती पुरोहितांनी ठेवली आहे. नाशिकमधील पुरोहितांकडे छत्रपतींच्या घराण्यासह अनेक राजेरजवाडे यांच्या वंशावळी अद्यापही टिकून आहेत. अनेक पुरोहितांनी ते शास्त्रशुद्धरीत्या जतन केले आहे.

राजा महाराजांच्या नोंदी

नाशिकच्या पुरोहितांकडे छत्रपती शिवाजी महाराजांसह अनेक राजे-महाराजे यांच्या नोंदी आहेत. भारतापासून ते थेट काबूल कंधहारपर्यंतच्या नोंदी असल्याचे शुक्ल यांनी सांगितले. याबाबत शासनाला पुरोहित संघाकडून सर्व सहकार्य केले जाईल. यासाठी उद्या गंगा गोदावरी पुरोहित संघाची बैठकही आयोजित केल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: ''मोदींमार्फत अल्लाने सगळं दिलंय, कुणाची मदत नको'' अपंग असलेल्या मुस्लिम व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल

माेठी बातमी! 'सातारा जिल्ह्यातील आमदार आठ महिने निधीविनाच'; फंडातील विविध कामांना ब्रेक, अधिवेशनात घोषणेची शक्यता

Viral Video: नवरा फोनमध्ये व्यस्त, पत्नी संतापली, रागात असं काही केलं की...; व्हिडिओच व्हायरल झाला, पाहा पोस्ट

Ashadhi Wari 2025: मृदंगाच्या थापाने वाढविली वारकऱ्यांची ऊर्जा; घळाटवाडीच्या गणेश महाराजांची पंढरीच्या वारीत वादनसेवा

Tata Group: टाटा ग्रुपच्या कंपनीचा शेअर 10 टक्क्यांनी घसरला; ब्रोकरेजनेही दिला अलर्ट, गुंतवणूकदार चिंतेत

SCROLL FOR NEXT