Admission news esakal
नाशिक

Admission 2022- 23 : हॉटेल मॅनेजमेंट, फार्मसीच्या Diploma प्रवेशाला मुदतवाढ

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे बारावीनंतरच्‍या पदविका अभ्यासक्रम प्रवेशाच्‍या ऑनलाइन अर्जासाठी मुदतवाढ दिलेली आहे. त्‍यानुसार डी. फार्मसीसाठी १६ सप्‍टेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज भरता येईल. हॉटेल मॅनेजमेंट ॲन्ड केटरिंग टेक्‍नॉलॉजी आणि सर्फेस कोटिंग टेक्‍नॉलॉजीसाठी सोमवार (ता. १२) पर्यंत मुदत आहे. (Admission 2022 2023 Extension of Diploma Admission of Hotel Management Pharmacy Nashik Latest Marathi News)

बारावीनंतरच्‍या पदविका अभ्यासक्रमाच्‍या प्रवेशासाठी वारंवार मुदतवाढ दिली जाते आहे.त्‍यामुळे आधी नोंदणी केलेले विद्यार्थी व पालकांना पुढील प्रक्रियेची प्रतीक्षा कायम आहे. तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे शैक्षणिक वर्ष २०२२-२३ च्‍या प्रवेशासाठी सुरू असलेल्‍या या प्रक्रियेत पुन्‍हा एकदा नोंदणीप्रक्रियेला मुदतवाढ दिलेली आहे.

त्‍यानुसार औषधनिर्माणशास्‍त्र शाखेतील डी. फार्मसी अभ्यासक्रमाच्‍या ऑनलाइन अर्ज करण्यासाठी १६ सप्‍टेंबरपर्यंत मुदत असेल. डिप्‍लोमा इन सर्फेस कोटिंग टेक्‍नॉलॉजी (डी. एससीटी) आणि डिप्‍लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट ॲन्ड केटरिंग टेक्‍नॉलॉजी (डीएचएमसीटी) या अभ्यासक्रमासाठी सोमवारपर्यंत मुदत असेल.

याच वाढीव कालावधीत नव्‍याने नोंदणी केलेल्या, तसेच यापूर्वी नोंदणी केलेल्‍या विद्यार्थ्यांना कागदपत्रांच्‍या पडताळणीची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. ई-स्क्रूटिनी आणि प्रत्‍यक्ष स्क्रूटिनी असे दोन पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्‍ध असतील.

‘त्‍या’ विद्यार्थ्यांनाही संधी

बारावीच्‍या पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर झालेला आहे. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्‍या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी नोंदणी करता येणार आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी मुदतवाढ दिल्‍याने प्रवेशाच्‍या पुढील वेळापत्रकात बदल झालेला आहे. प्रारूप गुणवत्तायादीपासून पुढील सविस्‍तर वेळापत्रक डीटीईकडून राखीव ठेवण्यात आलेले आहे. त्यामुळे पालक व विद्यार्थ्यांचे लक्ष पुढील प्रक्रियेकडे लागून राहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fight Between Two Pilots: विमानात 174 प्रवासी अन् दोन पायलटचे भांडणे, हाणामारी... नंतर थेट हायजॅकचा अलर्ट; इस्राईल सरकारमध्ये खळबळ!

Earthquake: भूकंपाचे धक्के किल्लारीत; माहिती दिल्लीहून!घटनेला ३३ वर्षे होऊनही स्थानिक संशोधनाचा अभाव

Raju Shetti: ‘नोव्हेंबरपूर्वी एकही साखर कारखाना सुरू करू देणार नाही’; राजू शेट्टींचा इशारा, ‘रोक सको तो रोक लो’

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये दुष्काळाचं सावट; दर मिळत नसल्याने शेतकऱ्याने दोन एकर केळीची बाग केली उद्ध्वस्त

Babar Azam : बाबर आझम पुन्हा स्वस्तात बाद, बाऊंड्रीवरच चाहत्यांनी त्याला घेरले, सपोर्ट स्टाफ पळत आला अन्... Video Viral

SCROLL FOR NEXT