11 admissions sakal
नाशिक

Nashik 11th Admission : तिसऱ्या विशेष फेरीला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद; निवड झालेल्‍या 529 पैकी 437 विद्यार्थ्यांचा प्रवेश

सकाळ वृत्तसेवा

Nashik 11th Admission : ऑनलाइन केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेंतर्गत इयत्ता अकरावीच्‍या प्रवेशासाठी तिसऱ्या विशेष फेरीची प्रक्रिया शनिवारी (ता. १२) पूर्ण झाली आहे.

फेरीत निवड झालेल्‍या ५२९ विद्यार्थ्यांपैकी ४३७ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्‍चित केले असून, विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. (Admission of 437 students out of 529 selected in third special round nashik news)

नाशिक महापालिका क्षेत्रातील एकूण ६६ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठी शिक्षण विभागातर्फे प्रवेशप्रक्रिया राबविली जात आहे.

यापूर्वी तीन नियमित, तसेच दोन विशेष फेऱ्या पार पडल्‍या होत्‍या. गुरुवारी (ता. १०) तिसऱ्या विशेष फेरीसाठी गुणवत्तायादी प्रसिद्ध करण्यात आली होती. या फेरीत ५५३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

यापैकी ५२९ विद्यार्थ्यांची निवड गुणवत्ता यादीत करण्यात आली असताना, ४३७ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्‍चित केले आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

या फेरीसोबत एकूण सहा प्रवेशफेऱ्यांची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. आत्तापर्यंत अकरावीला प्रवेश घेतलेल्‍या विद्यार्थ्यांची संख्या १७ हजार ३२२ झाली असून, ७४.५० टक्‍के जागांवर प्रवेश निश्‍चित झालेले आहेत.

साडेआठ हजार जागा रिक्‍त

एकूण सहा प्रवेश फेऱ्या झाल्‍यानंतरही सुमारे आठ हजार ४९४ जागा अद्यापही रिक्‍त आहेत. यामध्ये कला शाखेच्‍या दोन हजार १७३, वाणिज्‍य शाखेच्‍या तीन हजार ६०५, तर विज्ञान शाखेच्‍या तीन हजार ५७९ जागा रिक्‍त आहेत. यापुढील टप्प्यांत पुरवणी परीक्षा उत्तीर्ण, एटीकेटीसाठी पात्रताधारक विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी संधी उपलब्‍ध केली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Schedule : १४ वन डे, १६ ट्वेंटी-२० अन् ७ कसोटी! IPL 2027 पर्यत टीम इंडियाचं वेळापत्रक; विराट, रोहितच्या फॅनसाठी मेजवानी

FDA: एफडीएचा दणका! IRCTCचे बेस किचन आणि इस्कॉनमध्ये धडक कारवाई, कॅटरर्सचे परवाने थेट निलंबित

तेजश्री प्रधान जर ८० च्या दशकातील हिरोईन असती तर... पाहा झक्कास फोटो, तुम्हीही सहज बनवू शकता

Marathi News Live Updates : पुण्यात एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांने उचलले टोकाचं पाऊल

वीज गेली, मेणबत्तीच्या उजेडात रुग्णावर उपचार करण्याची वेळ; सरकारी रुग्णालयातला धक्कादायक प्रकार, VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT