MBBS Admission  esakal
नाशिक

MBBS BDS Admission : एमबीबीएस, बीडीएसचा दुसरा कॅप राउंड आजपासून; जाणून घ्या प्रवेश वेळापत्रक

सकाळ वृत्तसेवा

MBBS BDS Admission : वैद्यकीय शाखेतील एमबीबीएस आणि बीडीएस या पदवी अभ्यासक्रमांच्‍या प्रथम वर्ष प्रवेशासाठी पुढील दोन फेऱ्यांचे प्रवेश वेळापत्रक जाहीर झाले आहे. प्रवेशाची पहिली फेरी पूर्ण झालेली असून, दुसऱ्या कॅप राउंडला गुरुवार (ता. २४)पासून सुरवात होत आहे.

नीट परीक्षेच्‍या आधारे वैद्यकीय अभ्यासक्रमांना प्रवेश दिला जात असून, या प्रक्रियेची दोन टप्प्यांत विभागणी केलेली आहे. सध्या एमबीबीएस आणि बीडीएस या अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशाची प्रक्रिया सुरू आहे. (admission schedule for next 2 rounds for admission of MBBS and BDS degree courses has announced nashik news)

आयुष अभ्यासक्रमांच्‍या प्रवेश फेऱ्यांचे वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही. एमबीबीएस, बीडीएसच्‍या प्रवेशाची पहिली फेरी पूर्ण झाली आहे. बुधवारी (ता. २३) रिक्‍त जागांचा तपशील जाहीर करण्यात आला असून, गुरुवार (ता. २४) पासून दुसऱ्या कॅप राउंडला सुरवात होणार आहे.

प्रवेशाचे सविस्‍तर वेळापत्रक, सहभागासाठी विद्यार्थ्यांच्‍या पात्रतेच्‍या अटी-शर्थीबाबतची माहिती संकेतस्‍थळावर उपलब्‍ध करून दिलेली असल्‍याचे सीईटी सेलतर्फे स्‍पष्ट केले आहे.

असे आहे प्रवेश वेळापत्रक

- दुसऱ्या कॅपसाठी ऑप्शन फॉर्म भरणे --------- २४ ते २६ ऑगस्‍ट

- दुसऱ्या कॅप राउंडची निवडयादी -------------- २९ ऑगस्‍ट

- प्रवेश निश्‍चितीची मुदत ---------------------- ३० ऑगस्‍ट ते ३ सप्‍टेंबर

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

- ऑनलाइन नोंदणी ---------------------------- ९ व १० सप्‍टेंबर

- नोंदणी शुल्‍क भरण्याची मुदत -------------- ९ ते ११ सप्‍टेंबर

- सर्वसामान्‍य गुणवत्तायादी प्रसिद्धी -------- १२ सप्‍टेंबर

- तिसऱ्या कॅप राउंडसाठी पर्याय नोंदविणे --- १३ व १४ सप्‍टेंबर

- तिसऱ्या कॅप राउंडची निवडयादी ------------ १५ सप्‍टेंबर

- प्रवेश घेण्यासाठीची मुदत -------------------- १६ ते २० सप्‍टेंबर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकचा खरा चेहरा पुन्हा उघड! शोएब अख्तरच्या भावाच्या अंत्यविधीत दहशतवाद्यांची उपस्थिती; पहलगाम हल्ल्याचा सूत्रधारही दिसला

Mumbai Police: सामूहिक विषप्रयोगाचा कट उधळला! विषाने भरलेल्या १४ हजार ९०० कॅप्सुल्स जप्त; मोहरमच्या मिरवणुकीत धक्कादायक प्रकार

Degloor News : जिल्हा बँकेच्या उमेदवारीसाठी देगलूरात भाजपची चाचपणी; आमदार अमर राजूरकरांचा दौरा

Latest Marathi News Live Update : राम मंदिर देणगीतील अफरातफरीच्या प्रकरणात दोन गुजराती लोक विक्री करण्यात मग्न - काँग्रेस नेते परगट सिंग

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : २७ जून २०२६ ते ३ जुलै २०२६ - मराठी राशी भविष्य

SCROLL FOR NEXT