shivsena bjp.jpg 
नाशिक

भाजपपाठोपाठ 'इथे' शिवसेनेत बंडाची चिन्हे...! 

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : तीन वर्षांपासून महापालिकेत एकसंध असल्याचा दावा करणाऱ्या शिवसेनेत ठराविक चौकटीत पदांचे वाटप केले जात असल्याचा आरोप करत 30 हून अधिक नगरसेवकांनी बंडाचे निशाण फडकविण्याची तयारी सुरू केली असून, खदखद नेमकी कोणाकडे, व्यक्त करायची याचा निर्णय घेण्यासाठी एका नगरसेवकाच्या निवासस्थानी बुधवारी (ता. 26) सायंकाळी बैठक घेतली. बैठकीत विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, माजी विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर व गटनेते विलास शिंदे यांच्यावर रोष व्यक्त करण्यात आला. 

नगरसेवकांची दिशाभूल केली जाते 

महापालिकेत बोरस्ते, बडगुजर, शिंदे यांच्याव्यतिरिक्त कोणालाच पदे दिली जात नाहीत. सत्यभामा गाडेकर यांचे नाव स्थायी समितीवर ऐनवेळी आले, त्यातही या त्रिकुटाच्या मर्जीतूनच गाडेकर यांचे नाव आले. त्यापूर्वी शिवसेनेत जे काही निर्णय झाले, त्यात नगरसेवकांना विचारात न घेता परस्पर एकाधिकारशाहीने घेतले गेले. पक्षाचे वरिष्ठ नेते नाशिकमध्ये आल्यास त्यांना भेटण्यासाठी स्थानिक नेत्यांचे अडथळे पार पडावे लागतात. महत्त्वाची पदे बोरस्ते, बडगुजर, शिंदे यांच्याकडेच आहेत. महासभेत लक्षवेधी सूचना मांडता येत नाही. साधे निवेदन द्यायचे असले तरी परवानगी घ्यावी लागते. महासभेत मोकळेपणाने भूमिका मांडता येत नाही. बोरस्ते, बडगुजर यांचे एकमेकांमध्ये भांडण दिसत असले तरी आतून दोघेही एकच आहेत. नगरसेवकांची दिशाभूल केली जाते.

शिवसेना नगरसेवकांच्या तक्रारी

महापौर, उपमहापौर निवडणुकीत सत्तेची गणिते जुळून आली असताना एक तास आधी काय घडले, याची माहिती अद्यापही नगरसेवकांना का दिली जात नाही, अशा तक्रारी शिवसेना नगरसेवकांच्या आहेत. स्थायी समिती सदस्य नियुक्तीच्या मुद्यावरून आता खदखद बाहेर पडत असून, या खदखदीला व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी बैठक झाली. बैठकीला नऊ ते दहा नगरसेवक उपस्थित असले तरी 30 ते 32 नगरसेवकांनी बोरस्ते, बडगुजर व शिंदे यांच्या विरोधात मोट बांधल्याचे समजते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC घोटाळा उघड करणार असल्यानं मला निलंबित केलं, आरोग्य उपसंचालिका गायकवाड यांचे खळबळजनक आरोप

सैफ अली खान इन्स्टाग्रामवर आला अन् सर्वप्रथम करीनालाच फॉलो केलं; पहिल्या पोस्टमध्ये असं काय की, लोक करताय चर्चा

Rohit Sharma MI Captain: रोहित खरंच, Mumbai Indians चा कर्णधार होणार का? फ्रँचायझीने दिले महत्त्वाचे अपडेट्स

Maharashtra Live News : सोलापूर शहरावरील पाणी कपातीचे संकट टळलं, शहरातील पाणीपुरवठा राहणार सुरळीत..

Rahuri News: पतीचा दवाखाना सुरू करायला २० लाख माहेरून आण, डॉक्टर महिलेचा छळ; पतीसह तिघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT