married woman 123.jpg 
नाशिक

धक्कादायक! पत्नी पतीच्या मृत्यतून सावरत नाही तोच; कुटुंबियांचा पैशासाठी 'असा' गेम

सतीश निकुंभ

नाशिक / सातपूर : ‘पैसा बोलता है’ या वाक्याचा प्रत्यय यावा, अशी ही घटना आहे. पैशासाठी नात्यातील ओलावा विसरून विनाकष्ट अधिकचा पैसा पदरात पाडून घेण्याचा हा खटाटोप म्हणून या उदाहरणाची सातपूर परिसरात चर्चा आहे.

पैशापुढे सारंच व्यर्थ....

सातपूरला एका चांगल्या मोठ्या ॲटोमोबाईल क्षेत्रातील कंपनीतील कामगाराचा कोरोनामुळे नुकताच मृत्यू झाला. या कामगाराच्या पाठीमागे पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. चार वर्षांपूर्वीच या कामगाराने कर्ज काढून घर घेतले. त्याची कर्जफेड सुरू आहे, असे असताना कामगाराचा मृत्यू होऊन काही दिवस उलटत नाही तोच या कामगाराचे भाऊ व इतर नातेवाइकांनी भावाला कंपनीतून मिळणाऱ्या सुमारे ४० लाखांपेक्षा अधिक रक्कम मिळवण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. 

मोठ्या रकमेवर डोळा
मोठ्या रकमेवर डोळा ठेवून त्यांच्या क्लुप्त्या सुरू झाल्या आहेत. आईला पुढे करून मिळणाऱ्या पैशातून काही रकमेची मागणी त्यांनी केली आहे. कंपनीने सकारात्मक दृष्टिकोन ठेवून या कामगाराच्या कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी देऊ केली असल्याने या नोकरीवर मृत कामगाराचे मूल लहान असल्याचे कारण पुढे करीत दुसऱ्या भावाने मृताच्या मुलाऐवजी स्वतःच्या मुलाला नोकरी मिळावी, यासाठी या कामगाराच्या विधवा पत्नीवर दबाव टाकल्याचे कंपनी व्यवस्थापनच्या लक्षात आल्याने महिलेला सबुरीचा सल्ला देत या परिस्थितीत धीर देण्याचा प्रयत्न केला. महिला पतीच्या मृत्यतून सावरत नाही तोच, कुटुंबातील कलहाचे उदाहरण पुढे आले आहे. 

पैशासाठी कुटुंबातच कलह

सातपूरला कोरोनामुळे कामगाराचा मृत्यू झाला. मृत कामगाराच्या कुटुंबाला त्याच्या वैयक्तिक प्रॉव्हिडंट फंडासह (पीएफ) व कंपनीकडून किमान ४० लाखांच्या आसपास रक्कम मिळणार आहे. ही बाब मृताचे भाऊ व इतर नातेवाइकांना समजताच त्यांच्यात रकमेवरून वाद सुरु झाले आहेत. आईला पुढे करून मृत भावाची रक्कम पदरात पाडण्यासाठी ना ना प्रकारे क्लुप्त्या सुरू केल्या आहेत. मृत कामगाराचा मुलगा अल्पवयीन असल्याने अनुकंपा तत्त्वावर त्याच्याऐवजी पुतण्याच्या नोकरीसाठी कुटुंबातच कलह सुरू झाल्याचे सातपूरमध्ये पाहायला मिळाले. 

संपादन - ज्योती देवरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT