eknath khadse 
नाशिक

एकनाथ खडसेंच्या निर्णयानंतर नाशिकमध्ये भाजपची तटबंदी तुर्त भक्कम; भविष्याची चिंता 

विक्रांत मते

नाशिक : भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रवेशावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर उत्तर महाराष्ट्रात त्याचे पडसाद उमटतात का हे पाहण्यासाठी राजकीय तज्ञांचे लक्ष लागले असले तरी उत्तर महाराष्ट्राची राजधानी असलेल्या नाशिक जिल्ह्यात मात्र तुर्त भाजपच्या गडाची तटबंदी भक्कम असल्याचे दिसून आले. महापालिकेसह केंद्रातील सत्तेमुळे तुर्त कुठलीही धोका नको म्हणून समर्थकांनी भुमिका घेतली परंत चौदा महिन्यानंतर होणाया महापालिकेच्या निवडणुकीत मात्र त्याचे परिणाम दिसून येणार असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे. 

गेल्या अनेक महिन्यांपासून भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे भाजपला रामराम करून राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये प्रवेश करणार असल्याचे संकेत मिळतं होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज समाज माध्यमांतून दिलेला होकार व खडसे यांनी भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर आज खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर शिक्कामोर्तब झाले. त्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. खडसे राष्ट्रवादीत गेल्यानंतर त्यांच्या सोबत कोण जाणार यावर आज दिवसभर शहरात चर्चा सुरु होती. विशेष करून नाशिक महापालिकेतील काही नगरसेवक खडसे यांच्या बाजूने उभे राहतील अशी अटकळ बांधली जात होती. परंतू तुर्त भाजपची नाशिक मधील तटबंदी भक्कम असल्याचे दिसून आले. 

भविष्याची चिंता 

केंद्रात भाजपची असलेली सत्ता, राज्यात सक्षम विरोधी पक्ष व महापालिकेत सत्ता असल्याने तुर्त नाशिक मध्ये भाजपचा एकही नगरसेवक पक्षाविरोधात भुमिका घेणार नसल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले. खानदेश भागातील मतांचा प्रभाव असलेल्या सिडको भागात खडसे समर्थक तीन ते चार नगरसेवक आहे. परंतू महापालिकेत सत्ता असल्याने व आगामी निवडणुकांना अद्याप चौदा महिने शिल्लक असल्याने तुर्त बंडखोरी केली जाणार नाही. खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे या देखील भाजप मध्येच असल्याने आताचं कुठलीचं हालचाल नको अशी भुमिका घेण्यात आली आहे.

आजी-माजी आमदारांवर पक्षाच्या नेत्यांकडून लक्ष

पालिकेतील एकुण नगरसेवकांपैकी माजी आमदार बाळासाहेब सानप समर्थक १२ ते १५ नगरसेवक आहेत. त्यांनी देखील पक्षाविरोधात अद्याप भुमिका घेतली नाही त्यामुळे तुर्त खडसेंच्या मागे जाणे परवडणारे नसल्याची भुमिका घेण्यात आली आहे. खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर काय होवू शकते याची चाचपणी करताना काही आजी-माजी आमदारांवर मात्र पक्षाच्या नेत्यांकडून बारीक लक्ष ठेवले जात आहे. परंतू जशा निवडणुका जवळ येतील त्यावेळी मात्र खडसे समर्थक नगरसेवक उघड भुमिका घेण्याची शक्यता असल्याने भाजपला आजची नसली तरी उद्याची मात्र चिंता आहे. जिल्हा परिषदे सदस्यांमध्ये सर्वचं सदस्य माजी मंत्री गिरीष महाजन यांच्या प्रभावाखाली असल्याने ग्रामिण भागात डॅमेज कन्ट्रोलची भाजप मध्ये कुठलीचं शक्यता नाही. 

जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या भाजप सोडण्याचे दुख असले तरी त्यांच्या पाठोपाठ कोणी पक्ष सोडणार नाही. एवढेचं काय त्यांच्या स्नुषा रक्षा खडसे या देखील भाजप सोडणार नसल्याने पक्ष भक्कम व सुस्थितीत यापुर्वी होता व भविष्यातही राहील.- गिरीष पालवे, शहराध्यक्ष, भाजप. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heavy Rain Maharashtra : राज्यात २० जिल्ह्यांना ऑरेंज, येलो अलर्ट; कमी दाबाच्या क्षेत्राचा विदर्भावर परिणाम, पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार

Maratha Reservation: मनोज जरांगे यांची मोठी घोषणा; १५ सप्टेंबरला मुंबईकडे कूच, १९ पासून आझाद मैदानावर बेमुदत उपोषण

Pilbhit Tiger Reserve: व्याघ्र प्रकल्पात विकेंड सफारी महागली; शनिवार-रविवारचे तिकीट २०० रुपयांवर, काय आहे कारण ?

Team India Live Streaming: सुपर संडे! भारताचे दोन मोठे सामने, Asia Cup Final अन् अफगाणिस्तानविरुद्ध रंगणार टी२०; कुठे पाहाणार?

Ukadiche Modak Recipe: केशराचा सुगंध, नारळ-गुळाची गोडी आणि 'हा' एक पदार्थ… बाप्पासाठी असे बनवा स्पेशल उकडीचे मोदक!

SCROLL FOR NEXT