नाशिक : पाच वर्षांपुर्वी झालेल्या सिंहस्थातील पाणी पुरवठाविषयक देयके काढण्याच्या निमित्ताने गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणुकीवरून नगरसेवकांचा स्वतंत्र गट करून भाजपला हादरा देणारे माजी आमदार बाळासाहेब सानप राजकारणात पुन्हा राजकारणात सक्रीय झाल्याने भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे.
राजकीय वातावरण ढवळले
कोरोनामुळे गेल्या साडेतीन महिन्यांपासून शांत असलेले शहरातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघाले. सन 2017 मध्ये बहुमताने सत्तेत आलेल्या भाजपला पहिल्या अडिच वर्षांमध्ये ठोस काम करता आले नाही. उलट अंतर्गत कुरबूरींनी पक्षाची प्रतिमा मलीन होत गेली. नगरसेवकांना विकासकामांसाठी निधी मिळतं नसल्याने आधीचं नाराजी असताना त्यात पदे वाटपावरून धुसफूस पाहायला मिळाली. सन 2019 वर्ष शहर भाजपसाठी कठीण गेले. पुर्व विधानसभा मतदारसंघात सानप यांना डावलल्याने ते दुखावले. विधानसभा निवडणुकीत भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून निवड लढविली त्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला. सानपांच्या शिवसेना एन्ट्री नंतर त्यांनी नोव्हेंबर 2019 मधील महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणुकीत भाजपला मोठा हादरा दिला.
अखेर राजकीय चर्चांना पुर्णविराम
भाजपची सत्ता जाता-जाता वाचली. त्यानंतर सानप राजकारणापासून दुर गेले. मध्यंतरीच्या काळात राजकीय सन्यास घेतल्याची चर्चा होती. मार्च महिन्यापासून कोरोनामुळे सर्व प्रकारच्या राजकीय चर्चांना पुर्णविराम मिळाला. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतं असताना सिंहस्थातील पाणी पुरवठाविषयक देयकांचे निमित्त साधून सानप यांनी भाजपला अडचणीत आणण्याची दुसरी खेळी खेळताना 22 नगरसेवकांचे विरोधाचे पत्र देवून भाजप मधील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आणताना महापौर सतीश कुलकर्णी यांना देखील धोक्याचा ईशारा दिला.
भाजपमधील धुसफूस वाढणार
महापौरांविरोधात पत्र दिलेले मच्छींद्र सानप, पुनम सोनवणे, पुनम धनगर, विशाल संगमनेरे, अनिता सातभाई, सिमा ताजणे, पंडीत आवारे, सचिन हांडगे, अंबादास पगारे, सुनिता पिंगळे, पुंडलिक खोडे, पुष्पा आव्हाड हे सानप गटाचे मानले जातात. या नगरसेवकांना साथ म्हणून जेष्ठ नगरसेवक दिनकर आढाव, संभाजी मोरुस्कर, मुकेश शहाणे, पुष्पा आव्हाड, वर्षा भालेराव, रविंद्र धिवरे, दिनकर पाटील, पल्लवी पाटील, अजिंक्य साने यांनी देखील विरोधाचे पत्र दिल्याने भाजपमधील धुसफूस येत्या काळात अधिक प्रमाणात वाढणार असल्याचे दिसून येते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.