Agnipath Yojana Updates | Nashik News Esakal
नाशिक

अग्नीपथ योजना : आंदोलनाच्या धसक्याने नाशिकरोडला छावणीचे स्वरूप

केंद्र सरकारने नव्याने जाहीर केलेल्या अग्निपथ लष्कर भरतीच्या विरोधात देशभरातील तरुण रस्त्यावर उतरले आहे.

अंबादास शिंदे

नाशिक रोड : केंद्र सरकारने नव्याने जाहीर केलेल्या अग्निपथ लष्कर भरतीच्या विरोधात देशभरातील तरुण रस्त्यावर उतरले आहे. लष्करातील प्रस्तावित अग्नीवीर भरती प्रक्रिया विरोधात आंदोलनाच्या धसक्याने नाशिक रोड रेल्वे स्थानकाला छावणीचे स्वरूप आले आहे. रेल्वे स्थानक परिसरात ३०० मीटर पर्यंत जमाव बंदी करण्यात आली असून पोलिसांकडून काही संशयित आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले आहे. (Nashik News)

देशात सुरू असलेल्या अग्निपथ लष्करी भरती धोरणाच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाच्या अनुषंगाने नाशिक पोलीस आयुक्तालयाने नाशिकरोड परिसरात जमावबंदीचे आदेश पारित केले आहे. आर्टलरी सेंटर व नाशिक रोड रेल्वे स्थानक परिसरात याची अंमलबजावणी करण्यात आली आहे.(Agnipath Yojana Updates)

अनेक राज्यांमध्ये गेल्या काही दिवसापासून तरुणांनी उग्र आंदोलन हाती घेतले आहे. केंद्र व राज्य सरकारचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. रेल्वे स्थानकात उभ्या असलेल्या अनेक रेल्वे गाड्यांचे जाळपोळ करून केंद्र सरकारच्या धोरणाचा कडक विरोध या आंदोलक करतांना दिसत आहेत. त्याचे पडसाद नाशिक शहरात उमटू नये म्हणून आयुक्तालयाने सोमवार ता. 20 रोजी जमावबंदीचे आदेश जारी केले आहे. त्यात उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आर्टलरी सेंटर अशोक चाकर गेट, खोले मळा, कारगिल गेट वडनेर गाव, कॅट गेट नाशिक पुणे महामार्ग, देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यातील बुचडी मैदान, आंनद रोड, छावणी परिषद कार्यालय, एअर फोर्स देवळाली, तसेच नाशिकरोडला रेल्वे स्थानक पूर्वे पश्चिम बाजूला 300 मीटर पर्यंत परिसरात संचार बंदी लागू करण्यात येणार असल्याचे परिपत्रक सहायक पोलीस आयुक्त डॉ सिद्धेश्वर धुमाळ यांनी पारित केले आहे.

या जमावबंदीच्या काळात अनावश्यक गर्दी करणे, ज्वलन शील पदार्थ, घातक हत्यारे बाळगणे किंवा घेऊन फिरणे मनाई आहे. त्या अनुषंगाने उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश माईंकर, नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, पोलीस निरीक्षक गणेश न्याहदे, राजू पाचोरकर, देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुंदन जाधव आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. नागरिकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन पोलिसांनकडून करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : राज्यात २९ महापालिकेसाठी आज मतदान, मुंबई, नाशिक, कोल्हापुरात हायव्होल्टेज ड्रामा, शहराच्या कारभाऱ्यांचा होणार फैसला

Satara Crime: प्रत्येकी १५ लाख दे, अन्यथा जगणे मुश्कील करू; खंडणी मागितल्याप्रकरणी साताऱ्यात चौघांवर गुन्हा!

Voter List Issue : मतदारयाद्यांत अजूनही गोंधळ; प्रभाग बदलले, कुटुंबातील नावे वेगवेगळ्या केंद्रांवर

Pune Police Bandobast : पुण्यात कडेकोट पोलिस बंदोबस्त; १४ हजार कर्मचारी तैनात; शंभराहून अधिक संवेदनशील ठिकाणे निश्‍चित

Solapur Municipal Election : सोलापूर महानगरपालिकेच्या १२० जागांसाठी आज मतदान; ४६ मतदान केंद्रे संवेदनशील घोषित

SCROLL FOR NEXT