Dada Bhuse SYSTEM
नाशिक

हमीभावासाठी विक्री व्यवस्थापनाला बळकटी देणार - कृषिमंत्री भुसे

संदिप मोगल

लखमापूर (जि. नाशिक) : ‘विकेल ते पिकेल’ या संकल्पनेवर आधारित (कै.) बाळासाहेब ठाकरे स्मार्ट योजनेच्या माध्यमातून शेतमालास योग्य हमीभाव मिळण्याच्या दृष्टीने शासनस्तरावर विक्री व्यवस्थापन व्यवस्थेला बळकटी देणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी केले. (agriculture-minister-said-that-sales-management-will-be-strengthened-for-guaranteed-price)

कृषिमंत्री भुसे म्हणाले, की शेतकरीराजा शेतात कुटुंबासह राबत असतो. त्याची प्रगती साधण्याच्या दृष्टीने ‘विकेल ते पिकेल’ अभियानांतर्गत वाणाच्या बाजारातील मागणीनुसार शेतकऱ्यांनी शेतात पीक घ्यावे. जेणेकरून, उत्पन्नास योग्य हमीभाव मिळेल. शेतकरी ते थेट ग्राहक या दृष्टीने विक्री व्यवस्थापन बळकट करण्याच्या दृष्टीने शासनस्तरावरून एक धोरण निश्चित केले जाणार आहे. शेतकऱ्यांची होणारी फसवणूक टाळण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने केलेल्या कायद्यात सुधारणा करण्यासाठी बीड मॉडेल सादर करण्यात आले आहे. द्राक्ष व सीताफळ या पिकांना विमाकवच देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे येणाऱ्या कालावधीत शेतकरी, फार्मर प्रोड्युसर कंपनी व शेतीमाल प्रक्रिया उद्योजक यांच्या सहभागाने महाराष्ट्रव्यापी एकदिवसीय ऑनलाइन शिबिर होणार आहे.

मोहाडी येथे ग्रामपंचायत सभागृहात शुक्रवारी (ता. २५) झालेल्या ‘विकेल ते पिकेल’ अभियानांतर्गत शेतमाल निर्यात करणाऱ्या शेतकऱ्यांच्या ऑनलाइन राजस्तरीय कार्यशाळेत ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, दूरदृश्यप्रणालीद्वारे आमदार सरोज अहिरे, कृषी सभापती संजय बनकर, कृषी विभागाचे आयुक्त धीरजकुमार, अतिरिक्त सचिव रवींद्र शिंदे, ‘आत्मा’चे संचालक किसनराव मुळे, कृषी सहसंचालक संजीव पडवळ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी सुनील वानखेडे, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक राजेंद्र निकम, स्मार्ट प्रकल्प व्यवस्थापक दशरथ तांबाळे यांच्यासह सर्व उपविभागीय कृषी अधिकारी व प्रगतिशील शेतकरी उपस्थित होते.

५३ शेतीगटांचा सहभाग

या कार्यशाळेत ५३ शेतीगटांनी शेतमाल प्रदर्शनाद्वारे सहभाग घेतला. भुसे यांच्या हस्ते ‘विकेल ते पिकेल’ पोस्टर, संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियान, पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग निर्दीष्टीकरण योजना या घडीपत्रिकांचे प्रकाशन करण्यात आले. निर्यातदार डॉ. केदार थेपडे, नाशिक मिटकॉनचे जिल्हा समन्वयक मदन लोणारे, देवळा कांदा एफपीओ स्वप्नील पाटील, मुंबई मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे शंतनू जगताप यांच्यासह दूरदृश्‍यप्रणालीद्वारे उपस्थित शेतकऱ्यांनीही मनोगत व्यक्त केले.

(agriculture-minister-said-that-sales-management-will-be-strengthened-for-guaranteed-price)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fake ₹500 Notes Seized : जळगावात सिनेस्टाईल थरार! बैलगाडीला धडक देऊन पळणाऱ्या कारमधून 500 रुपयांच्या नकली नोटा अन् तलवारी जप्त; 24 बंडले आढळल्याने गूढ वाढले

Akola: बोगस बियाण्यांवरून कृषी अधिकाऱ्यांना कक्षात डांबले; संतापाचा उद्रेक; शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन

Panchganga River Water level Update : पंचगंगेची पातळी सहा फुटांनी उतरली, इचलकरंजीतही पातळीत घट; कोल्हापुरात अद्याप 24 बंधारे पाण्याखाली, 41 मार्ग बंदच

Latest Marathi News Live Update : कागल तहसीलदारांना धमकी; पिंपळगाव खुर्दच्या एकाविरोधात गुन्हा

India A vs Nepal: BCCI चा मोठा निर्णय! भारत 'अ' संघ पहिल्यांदाच नेपाळ दौऱ्यावर; डिसेंबरमध्ये रंगणार ऐतिहासिक T20 मालिका

SCROLL FOR NEXT