Akhil Bhartiya Marathi sahitya samelan at nashik should be successful says chhagan bhujbal.jpg
Akhil Bhartiya Marathi sahitya samelan at nashik should be successful says chhagan bhujbal.jpg 
नाशिक

"नाशिकमध्ये होणारे साहित्य संमलेन अगदी उजवं व्हावं" - छगन भुजबळ

सकाळवृत्तसेवा

नाशिक : नाशिक मध्ये ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. ही नाशिकरांसाठी अत्यंत आनंदाची बाब आहे. त्यामुळे हे साहित्य संमेलन यशस्वी करणे आणि नाशिकची वेगळी ओळख निर्माण करणे ही आपली सर्वांची सामुहिक जबाबदारी असून हे साहित्य संमेलन उजवं कसं होईल यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन स्वागताध्यक्ष तथा राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री व नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नियोजन समिती व नाशिककरांना केले आहे. 

सूक्ष्म नियोजन करण्याची आवश्यकता

यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, नाशिक मध्ये होत असलेले साहित्य संमेलन हे आनंददायी वातावरणात पार पडले पाहिजे. नाशिकच सांस्कृतिक, सामाजिक वैभव या निमित्ताने जगासमोर गेले पाहिजे. संमेलन पार पडत असतांना नाशिकमध्ये येणाऱ्या प्रत्येकाचे आदरपूर्वक सन्मान राखला गेला पाहिजे. नाशिककर म्हणून स्वागतात कुठलीही कमतरता पडणार नाही असे सूक्ष्म नियोजन करण्याची आवश्यकता आहे. या संमेलनासाठी शासन स्तरावरून आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल. त्यात कुठलीही कमतरता राहणार नाही. तसेच नाशिककरांकडून देखील नक्कीच सहकार्य मिळेल यात कुठलीच शंका नाही असे त्यांनी सांगितले.

 जिल्ह्यातील नामवंतांचा सन्मान व्हावा

ते म्हणाले की, हे साहित्य संमेलन पार पडत असतांना नाशिकचे महापौर, जिल्हा प्रशासन यांच्यासोबत महत्वाच्या व्यक्तींना सामावून घेऊन योग्य ते नियोजन करण्यात यावे. तसेच नाशिक शहर व जिल्ह्यातील साहित्य, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील नामंवत व्यक्तींना सामावून घ्यावे तसेच प्रत्येक व्यक्तिंचा सन्मान राखला जावा अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या. नाशिकमध्ये होत असलेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजनाच्या पार्श्वभूमीवर आज साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हाधिकारी सुरज मांढरे, पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिक येथील संपर्क कार्यालयात बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

या बैठकीला माजी आमदार हेमंत टकले, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, लोकहितवादी मंडळाचे जयप्रकाश जातेगावकर, अॅड. विलास लोणारी, डॉ. कैलास कमोद, संजय करंजकर, शंकर बोऱ्हाडे, सुभाष पाटील, गिरीश साळवे, मुकुंद कुलकर्णी आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT