traffic police.png 
नाशिक

लॉकडाऊनमध्ये नशेत महामार्ग पोलिसाने केला 'असा' धक्कादायक प्रकार!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : महामार्ग पोलिस वाहतूक शाखेत कार्यरत असलेल्या पोलिसाने मद्यपान करून महामार्गावरील बॅरिकेड्‌स कारने उडविले. त्यानंतर नाशिक रोड पोलिसांनी कार पकडली असता, संशयिताने पोलिसांशी हुज्जत घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची गंभीर दखल घेत, महामार्ग पोलिस ठाणे परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान यांनी संशयित पोलिस कर्मचाऱ्याचे निलंबन केले. 

मद्यपी महामार्ग पोलिसाने केला असा कारनामा
अभिनव अरुण नाईक (38, नेमणूक महामार्ग वाहतूक पोलिस, पिंपळगाव पथक) असे संशयित पोलिस कर्मचाऱ्याचे नाव असून, त्याच्यासह साथीदार रमेश अय्यर, प्रवीण पांडव, चेतन रायकर यांच्याविरोधात नाशिक रोड पोलिसांत गुन्हा दाखल झाला. सोमवारी (ता. 13) रात्री नऊच्या सुमारास टाटा नॅक्‍सन कार महामार्गावरून भरधाव आली. आडगाव नाका येथे लावलेले बॅरिकेड्‌स कारने तोडले. शहर पोलिसांनी या कारचा पाठलाग करीत, बिटको चौक परिसरात नाशिक रोड पोलिसांनी ती पकडली. कारमधील मद्यपी संशयित अभिनव नाईक व त्याच्या सहकाऱ्यांनी पोलिसांशी हुज्जत घालत धिंगाणा घातला.  

सोमवारी (ता.१३) रात्री बिटको चौकात बंदोबस्तसाठी असलेल्या पोलीस हवलादार शेख यांच्या अंगावर नशेत चारचाकी चालवणाऱ्या नाशिक ग्रामीण पोलीस नाईकाने गाडी घालण्याचा प्रयत्न केला. याबाबत नाशिकरोड पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

गाडी थांबविण्यासाठी हाताने इशारा दिला, पण थांबली नाही
पोलीस हवालदार अल्लाउद्दीन लतिफ शेख, यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले की, सोमवारी रात्री डयुटीवर असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक राऊत, भातुडे, पो. कॉ. शिंदे, कुहाडे, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त बिटको चौक येथे डयुटीवर होते. दरम्यान आडगाव येथे नाकाबंदी दरम्यान टाटा कंपनीची नेक्सान चारचाकी गाडी नंबर एम एच 14 जी.वाय 8018 ही थांबवली असता न थांबता तेथून बॅरीकेट तोडून पळून गेली आहे. ही गाडी पुन्हा जेलरोड मार्गी बिटको चौककडे भरधाव वेगाने येत थांबविण्यासाठी हाताने इशारा दिला, पण थांबली नाही पण अंगावर नेत जिवाला धोका होईल असे केले. ती पुढे नाशिकरोड स्टेशन दिशेने जात गाडी वेग कमी झाला यावेळी उपनगर बीट मार्शल व नाशिकरोड पोलिसांनी गाडी पकडून ताब्यात घेतली गाडी चालकास चौकशी केली असता पोलीस नाईक अभिनव अरुण नाईक, पिपळगांव महामार्ग नाशिक ग्रामीण, अशी माहिती दिली. त्याचा तोंडाचा वास येत होता. त्याच्यासोबत रमेश अय्यर, प्रविण पांडव, चंद्रकांत रायकर हे होते. हा मद्यपान करुन गाडी चालवित असल्याचे आढळल्याने पोलीस नाईक अभिनव नाईक यांच्यावर गुन्हा दाखल केला.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games 2026: भारताची 'सुवर्ण' सुरूवात! सुरूची सिंग, कमलजीत 'Gen Z' चा आशियाई विक्रमासह गोल्डन निशाणा

तो अनप्रोफेशनल, खोटारडा... दिग्दर्शकाच्या आरोपावर बोलला ओंकार भोजने, म्हणतो- मी याचं उत्तर नक्की देईन

Beed False Cases Claim : बीडमध्ये सर्वाधिक खोटे गुन्हे दाखल होतात अपर अधीक्षकांचा खळबळजनक दावा; पोलिस दलाला घरचा आहेर

Maharashtra Ganesh Visarjan Live: तांबडी जोगेश्वरी आणि तुळशीबाग गणपती मुख्य विसर्जन मिरवणुकीच्या दिशेने मार्गस्थ, मुख्य सोहळ्याला थोड्याच वेळात सुरुवात

OBC क्रिमी लेयरवरील सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास सरकारचा नकार, दोन वर्षांचा का मागितला वेळ?

SCROLL FOR NEXT