woman-crying.jpg 
नाशिक

प्रेमसंबंधास तिचा नकार...मद्यपी प्रियकराने भररस्त्यात केला 'असा' धक्कादायक प्रकार

भाग्यश्री गुरव : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : 'तू फक्त माझी आहेस, तू मला सोडून जाऊ नको'...मात्र प्रेमसंबंध ठेवण्यास महिलेचा नकार...वारंवार विचारून देखील ती काही ऐकेना...अन् मग मद्यपी प्रियकराने भररस्त्यात येऊन केला असा धक्कादायक प्रकार... 

असा आहे प्रकार

संशयित आरोपी अजित कैलास आहेर (रा. धर्माजी कॉलनी, शिवाजीनगर) आणि पीडित महिला हे एकमेकांचे ओळखीचे असून, त्यांच्यात प्रेमसंबंध होते. परंतु फिर्यादी महिलेने अजितसोबत असलेले संबंध तोडून टाकले होते. असे असतानाही आरोपी अजितने फिर्यादी भवर टॉवरसमोर बुधवारी (दि.२२) भाजीपाला घेत असताना रिक्षातून येऊन फिर्यादीस प्रेमसंबंध तोडल्याचा जाब विचारत वाद घातला. यावेळी त्याने मद्यपान केलेले होते. मद्यपान करून त्याने पीडितेस अर्वाच्य भाषेत डोक्यात दगड घालून मारहाणही केली. या मारहाणीत महिला जखमी झाली असून, तिने दिलेल्या फिर्यादीनुसार गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

महिलेने प्रेमसंबध ठेवण्यास नकार दिल्याने तिच्या मद्यपी प्रियकराने तिच्या डोक्यात दगड मारून जखमी केले तसेच मारहाणही केल्याने परिसरात खळबळ उडाली. विशेष म्हणजे महिला भाजीपाला खरेदीसाठी घराबाहेर पडलेली असताना हा प्रकार घडला असून या प्रकारामुळे महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

(संपादन - किशोरी वाघ)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Premanand Maharaj Ashram Death : प्रेमानंद महाराजांच्या आश्रमातील शिष्याच्या मृत्यूचे गूढ वाढले; मोबाईल, मानसिक स्थितीची पोलिसांकडून चौकशी

Transport & Logistics Reform : देशातील वाहतूक कोंडी आणि लॉजिस्टिक्स खर्चावर तोडगा! केंद्र सरकार स्थापन करणार 'एकात्मिक वाहतूक आणि लॉजिस्टिक्स प्राधिकरण'

IND vs WI, 1st T20I: नमन धीरला पदार्पणाची संधी, वैभवची निवड झाली की नाही? पाहा कशी आहे भारताची Playing XI

Marathi News Live Updates: कत्तलीसाठी गायी नेत असल्याच्या संशयावरून टेम्पो अडविला; दोघे ताब्यात

Satana News : दुष्काळ जाहीर; मात्र शेतकरी डिजिटल चक्रव्यूहात, सातबारा अन् ‘फार्मर आयडी’साठी संकेतस्थळे ठप्प

SCROLL FOR NEXT