liquor1.jpeg 
नाशिक

अहो कशाला रांगेत उभं राहताय? घरपोच बाटली मिळेल की...फक्त एवढचं करा..

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी गेल्या पावणे दोन महिन्यांपासून लॉकडाऊन सुरू आहे. याकाळात मद्याचीही विक्री बंद होती. मात्र गेल्या आठवड्यात शासनाने परवानगी दिल्यानंतर मद्यविक्री सुरू झाली. सुरवातीच्या गोंधळानंतर सध्या मद्यविक्री सुरळीत सुरू असली तरीही, परवानाधारक मद्यपींना मद्यदुकानासमोर रांगेत उभे न राहता, त्यांना आता विक्रेत्याकडून घरपोच मद्याची बाटली मिळणार आहे. तशी परवानगीच राज्य उत्पादन शुल्क विभागाने मद्यविक्रेत्यांना दिली असली तरी त्यासाठी मद्यपींना परिसरातील मद्यविक्रेत्याकडे आगाऊ नोंदणी मात्र करावी लागणार आहे. अर्थातच ही बाब मद्यपींसाठी अधिक सुखकारक आहे. 

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मद्यविक्रेत्यांना परवानगी 
मद्यविक्री बंद राहिल्याने शासनाचा कोट्यवधींचा महसुलावर परिणाम झाला. ही बाब हेरून गेल्या आठवड्यात मद्यविक्रीला परवानगी दिली गेली. परंतु मद्यपींच्या गर्दीमुळे अनेक ठिकाणी गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. मात्र त्यानंतर नियमावली करण्यात आली आणि सुरळीत मद्याची विक्री सुरू झाली. तर, सोमवारीच (ता. 11) ऑनलाईन टोकन घेऊन मद्य घेण्यासाठीची सोय राज्य उत्पादन शुल्क विभागाने करून दिली होती. त्यामुळे मद्यपींना मद्याच्या दुकानासमोर रांगेत उभे राहण्याची गरज नव्हती. 

आगाऊ नोंदणी अनिवार्य
मात्र, आता तर त्याहीपुढे जात राज्य उत्पादन शुल्क विभागाने थेट परवानाधारक मद्यपींना घरपोच मद्य उपलब्ध करून देण्याची परवानाधारक मद्यविक्रेत्यांना परवानगी दिली आहे. मात्र त्यासाठी मद्यपींना आपल्या परिसरातील मद्याच्या दुकानात आगाऊ नोंदणी करावी लागणार आहे. ज्यामुळे मद्यपीला विनाकारण मद्याच्या दुकानासमोर थाटकळत थांबण्याची गरज राहणार नाही. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या प्रधान सचिव वलसा नायर सिंग यांनी सदरचे आदेश काढले आहेत. यात भारतीय बनावटीचे विदेशी मद्य-स्पिरीट, बियर, सौम्य मद्य व वाईनची विक्री परवानाधारकास थेट ग्राहकाच्या निवासी पत्त्यावर घरपोच देण्याची परवानगी देण्यात आली आहे. 

अशा आहेत अटी 
* परवानाधारक मद्यविक्रेत्यास मद्य, बियर, स्पिरीट व वाईन हे प्रकार विक्रीस परवानगी 
* ज्या आवारात दुकान आहे, त्या परिसरातच घरपोच मद्यविक्री 
* परवानाधारक मद्यपीने परिसरातील मद्यविक्रेत्याकडे आगाऊ नोंदणी अनिवार्य 
* घरपोच मद्यसेवा देणाऱ्या व्यक्तीला मास्क अनिवार्य. हाताचे निर्जंतुकीकरण आवश्‍यक. 
* लॉकडाऊन असेपर्यंते आदेश लागू. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

India Squad for WI Series: रोहित शर्माच्या भविष्याचा फैसला झाला... वेस्ट इंडिजविरुद्ध BCCI ची वन डे, ट्वेंटी-२० संघाची घोषणा

Manoj Jarange Patil: मोठी बातमी! हैदराबाद गॅझेटियरमध्ये नावंसुद्धा सापडली; विखे पाटलांसह शिष्टमंडळ हैदराबादला जाणार?

Vidyadhar Anaskar : राज्य सहकारी बँकेचे ५,७४५ कोटींचे विक्रमी नेटवर्थ; ठेवी कमी करण्याचा निर्णय व्यावसायिक गणितातून

Marathi News Live Updates : गणेशोत्सवानिमित्त भाजपाध्यक्ष नितीन नबीन यांची मोहोळ यांच्या निवासस्थानी भेट

SCROLL FOR NEXT