नाशिक

Nashik MD Drug Case : एमडी ड्रग्ज प्रकरणातील पाचही संशयितांना न्यायालयीन कोठडी

सकाळ वृत्तसेवा

Nashik MD Drug Case : सामनगाव येथील एमडी ड्रग्ज गुन्ह्यातील अटक करण्यात आलेल्या पाच संशयितांना आज न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यांची नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

पोलिसांकडून मुख्य संशयित सनी पगारे यांच्या मालमत्तेचा शोध सुरू केला असून, त्याच्या बँकांची माहिती घेतली जात आहे. (All 5 suspects in MD drugs case remanded to judicial custody nashik crime news)

दरम्यान, मुंबई पोलिसांनी अटक केलेल्या ललित पाटील (पानपाटील) याला न्यायालयाने कोठडी सुनावल्याने त्याचा ताबा पुणे पोलिसांनी घेतला आहे. सामनगाव येथे गेल्या सप्टेंबर महिन्यात नाशिकरोड पोलिसांनी गणेश शर्मा यास १२.५ ग्रॅम एमडी ड्रग्जसह अटक केली होती. या गुन्ह्याचा तपास करताना नाशिक अंमली पदार्थविरोधी पथकाच्या हाती रॅकेटच लागले.

या रॅकेटचा मुख्य सूत्रधार सनी पगारे, सुमीत पगारे, मनोज गांगुर्डे, अर्जुन पिवाल यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांचा सोलापुरात असलेला एमडीचा कारखानाच नाशिक पोलिसांनी उदध्वस्त केला. पथकाने कारखान्यातून तीन कोटींचे एमडी, ६० लाखांचा कच्चा माल, १० लाखांचे रसायन असा साठा जप्त केला. कारखान्याचा भाडेकरार करणाऱ्या मनोहर काळे यासही पोलिसांनी अटक केली आहे.

मुख्य सूत्रधार सनी पगारे, सुमीत पगारे, मनोज गांगुर्डे, अर्जुन पिवाल, भूषण ऊर्फ राजा गणपत मोरे यांना सोमवारी (ता.३०) न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. याप्रकरणात अद्यापही दोघे संशयित पसार असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

ललित पुणे पोलिसांच्या ताब्यात

पुण्याच्या ससून रुग्णालयातून पसार झालेल्या एमडी ड्रग्ज माफिया ललित पाटील यास मुंबई पोलिसांनी चैन्नईतून अटक केली. ललितच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यास सोमवारी (ता.३०) अंधेरी न्यायालयात हजर केले असता, त्यास न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, ललितचा ताबा घेण्यासाठी पुणे पोलिसांनी मुंबई गाठली होती. त्याला न्यायालयीन कोठडी मिळताच कायदेशीर प्रक्रिया पार पाडत पुणे पोलिसांनी ललितचा ताबा घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT