pimpalgaon light bill 1.jpg 
नाशिक

तिप्पट वीजबिलाचा आरोप अन्‌ अधिकाऱ्यांसोबत खडाजंगी....

सकाळवृत्तसेवा

नाशिक/ पिंपळगावं बसवंत  :  कोरोनाच्या संकटामुळे मिटर रिंडीग न घेता तीन महिन्याचे बील सरासरीच्या नावाखाली अधिकचे पाठविणाऱ्या वीज वितरण कंपनीच्या विरोधात भाजपाच्या कार्यकर्त्यानी पिंपळगावंच्या उपविभागीय कार्यालयावर धडक मोर्चा काढला. एप्रिल,मे,जुन या तीन महिन्याची देयके महावितरण कडुन सरासरीच्या आधारावर पाठविण्यात आली आहे.पण ही बीले तीन पट अधिक असल्याच्या तक्रारीचा पाऊस सध्या नागरिकांकडुन पडतो आहे. याविरोधात पिंपळगावंच्या भाजपाकडुन महावितरणच्या उपविभागीय कार्यालयावर भाजपाचे युवा नेते सतीश मोरे,जिल्हा संघटक बापुसाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. 

वीजबील कमी करून नागरिक व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा
पिंपळगांवचे उपकार्यकारी अभियंता एकनाथ कापसे,पगारे हे मोर्चाला सामोरे गेले. मात्र मोर्चात सहभागी असलेले नागरिक आक्रमक झाले होते. बिले नियमानुसार असल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला. यातुन मोठी बाचाबाची झाली. तक्रारदार नागरिकांचे समाधान करून देऊ,टप्प्याटप्प्याने वीज बील भरण्यास सवलत देऊ असे कापसे यांनी आश्वासन दिल्यानंतर मोर्चातील नागरिक शांत झाले. भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी वीजबील कमी करून नागरिक व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी निवेदनात केली.


दुप्पट,तिप्पट बीले देऊन नागरिकांवर अन्याय केला त्याचा निषेध करण्यासाठी हा मोर्चा आहे.वीज वितरणकडुन ग्राहकांची लुट होते आहे.नव्याने रिंडीग घेऊन योग्य ती बीले ग्राहकांना द्यावी,अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडले जाईल.-सतीश मोरे(युवा नेते,भाजपा) 


बीले देण्यात कोणतीही अनियमीतता झालेली नाही.तक्रारदार नागरिकांच्या शंकेचे निरसन केले जाईल.मागणी करणार्यानां टप्प्याटप्पयाने वीजबील भरण्याची सवलत देणार आहे.- एकनाथ कापसे,(उपकार्यकारी अभियंता,पिंपळगावं बसवंत). 

यावेळी सतीश मोरे, बापुसाहेब पाटील, प्रशांत घोडके , दत्तात्रय काळे, शितल बुरकुले, संदीप झुटे, अशोक मोरे, अल्पेश पारख,दत्तात्रय मोरे, चेतन मोरे, प्रमोद दुसाने, लखन शिंदे,दिप्ती रावल,नामदेव पवार,सचिन सुर्यवंशी,मदन पवार,संदीप जाधव,राजु खैरणार आदीसह नागरिक उपस्थित होते. 
हेही वाचा > "बा विठुराया..! चक्क निवृत्तीनाथ महाराजांनाही नाही सोडले.." एसटी महामंडळाचा चिंधीचोरपणा चव्हाट्यावर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

माेठी बातमी! 'महाबळेश्वर तालुक्यातील छमछमवर पाेलिसांचा छापा; सहा जणांवर गुन्हा; बंगल्यावरील धक्कादायक प्रकार उघडकीस..

Ramraje Naik-Nimbalkar: नार्को चाचणी त्यांची त्यांनीच करावी: रामराजे नाईक-निंबाळकर; एकाही घटनेच्या मागे मी आहे, सिद्ध करून दाखवा

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरे आजपासून मराठवाडा दौऱ्यावर, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या गावांना देणार भेटी

तुम्हाला अतिवृष्टीची भरपाई मिळाली नाही का? शेतकऱ्यांनी ‘येथे’ तातडीने काढावा फार्मर आयडी; सोलापूर जिल्ह्यातील ४.९० लाख शेतकऱ्यांना ४९८ कोटींची भरपाई अजूनही मिळाली नाही

७ नोव्हेंबरपासून मुंबईला दररोज विमान! डिसेंबरमध्ये गोव्यालाही सोलापुरातून दररोज विमान; गृह विभागाकडून मिळेना पोलिसांचे मनुष्यबळ, पोलिस ठाण्याचाही प्रस्ताव धुळखात

SCROLL FOR NEXT