nashik nmc.jpg 
नाशिक

महापालिकेत खांदेपालट, विभागांचे वाटप; आयुक्तांकडे सर्वाधिक विभाग 

विक्रांत मते

नाशिक : महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टीने आयुक्त कैलास जाधव यांनी सोमवारी (ता. ४) बदल केले. सामान्य प्रशासन, करआकारणी, नगरनियोजन, मिळकत, पाणीपुरवठा, सार्वजनिक वाहतूक व गुणवत्ता नियंत्रण पदे आयुक्तांच्या नियंत्रणाखाली आणली असून, दोन अतिरिक्त आयुक्तांकडे उर्वरित खात्यांची विभागणी करण्यात आली. 

आयुक्तांकडे सर्वाधिक विभाग;
महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजात आयुक्त महत्त्वाचे पद असते. त्याखालोखाल अतिरिक्त आयुक्त काम पाहतात. ‘ब’ वर्ग महापालिका असल्याने नाशिक महापालिकेला दोन अतिरिक्त आयुक्त आहेत. अनेक वर्षांपासून दोन्ही पदे रिक्त होती. अतिरिक्त आयुक्त (सेवा) या पदावर डॉ. प्रवीण अष्टीकर यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर त्यांच्याकडे आरोग्य, वैद्यकीय विभागाचा कार्यभार सोपविला होता. अतिरिक्त आयुक्त असूनही एकमेव विभाग असल्याने त्यांची नाराजी होती. मध्यंतरी दीर्घ रजेवर जाताना बदलीसाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते. मात्र, आता ते पुन्हा रुजू झाले आहेत. अतिरिक्त आयुक्त (शहर) पदावर सुरेश खाडे यांची नियुक्ती करण्यात आली. दोन अतिरिक्त आयुक्त रुजू होऊनही कामात सुसूत्रता व गतिमानता येत नसल्याने आयुक्त जाधव यांनी विविध खात्यांचा फेरआढावा घेत फेररचना केली. त्यानुसार सेवांचे विभाग व उपविभागांचे प्रशासकीय सेवा, तांत्रिक सेवा व लेखा सेवा असे वर्गीकरण केले आहे.

महापालिकेत खांदेपालट; विभागांचे वाटप 

सामान्य प्रशासन, करआकारणी, नगर नियोजन, मिळकत, मलनिस्सारण, पाणीपुरवठा, पाणीपट्टी संकलन, विद्युत व यांत्रिकी, गुणवत्ता नियंत्रण, सार्वजनिक वाहतूक व नियोजन, माहिती व तंत्रज्ञान, लेखापरीक्षण, वित्त व लेखा विभागांची जबाबदारी आयुक्त जाधव यांच्याकडे आहे. अतिरिक्त आयुक्त (शहर) यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम, उद्यान व वृक्ष प्राधिकरण, समाजकल्याण, राजशिष्ठाचार, जनसंपर्क, सुरक्षा, पशुसंवर्धन, शिक्षण, तर अतिरिक्त आयुक्त (सेवा) यांच्याकडे घनकचरा व्यवस्थापन, सार्वजनिक आरोग्य विभाग, अतिक्रमण, महापालिका सचिवालय, प्रकल्प, आपत्ती व्यवस्थापन व अग्निशमन, पर्यावरण, कामगार कल्याण, कार्यशाळा हे विभाग सोपविण्यात आले आहेत.  हेही वाचा >  निर्दयी मातेनेच रचला पोटच्या गोळ्याला संपविण्याचा कट; अंगावर काटा आणणारा संतापजनक प्रकार उघड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav: पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीचा वाद अखेर मिटला; खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत बैठक

Solapur Municipal Corporation: अंत्यविधीसाठी मनपाकडून खड्ड्यांची सेवा; जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या सर्व सुविधा ऑनलाइन; ‘व्हॉट्‌सॲप चॅट’ सुरू

Pune Traffic : रस्त्याच्या मधोमध अन् बाजूलाही खड्डे; चाकण मार्गाच्या दुरुस्तीकडे ‘एमएसआयडीसी’चे दुर्लक्ष

पैशांसाठी आईने केला अभिनेत्रीचा छळ, स्टेजवर तासन् तास नाचूनही घरी उपाशी ठेवलं जायचं; मृत्यूसमयीही पडली एकटी

Navneet Rana on Bachuchu Kadu: बच्चू कडूंच्या मतदारसंघात जाऊन राणा बरसल्या.. | Amravati | Sakal K1

SCROLL FOR NEXT