Ambulance
Ambulance Google
नाशिक

रुग्णवाहिका चालकांकडून रुग्णांच्या नातेवाइकांची लूट! अधिकाऱ्यांचे कारवाईचे आश्वासन

मोठाभाऊ पगार

देवळा (जि. नाशिक) : देवळा ग्रामीण रुग्णालयातील डीसीएच(DCH) केंद्राने अधिग्रहित केलेल्या रुग्णवाहिकेच्या (Ambulance) चालकाने दोन रुग्णांना नाशिकला घेऊन जाण्याचे तब्बल आठ हजार रुपये घेतले. रुग्णवाहिका भाडेदरानुसार हे नियमबाह्य असल्याने याबाबत संबंधित प्रशासनाने दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे. (Ambulance drivers charge extra money from patients relatives)

चालकाने बेकायदेशीररीत्या घेतले पैसे

नव्याने सुरू झालेल्या देवळा ग्रामीण रुग्णालयातील डीसीएचसी(DCH) सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या दोन रुग्णांची प्रकृती खालावल्याने तेथील डॉक्टरांनी त्यांना जिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये (Covid centre) हलविण्याचे सांगितले. त्यानुसार त्यांच्याकडून बेडदेखील उपलब्ध करण्यात आला. कोरोना रुग्णांची ने-आण करण्यासाठी देवळा ग्रामीण रुग्णालयासाठी परिवहन विभागाने खासगी रुग्णवाहिका अधिग्रहित केली आहे. या रुग्णवाहिकेतून दोन्ही रुग्णांना नाशिकला घेऊन जाण्याचे प्रत्येकी चार हजार असे तब्बल आठ हजार रुपये चालकाने बेकायदेशीररीत्या घेतले. रुग्णाला तातडीने उपचार मिळण्यासाठी दुसरा पर्याय नसल्याने पैसे दिल्याचे रुग्णांच्या नातेवाइकांनी (Relatives) सांगितले. यासंदर्भात मालेगाव उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी रुग्णवाहिकेचे भाडे शासन अदा करते, याबाबत चौकशी करून योग्य ती कारवाई करणार असल्याचे सांगितले.

असहाय्यतेचा गैरफायदा

प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या नियमानुसार खासगी रुग्णवाहिकांनी २५ किलोमीटरहून अधिक अंतर कापल्यास परतीचे अंतरही विचारात घेऊन एकूण भाडेदर ठरविणे गरजेचे असते. तसेच दरपत्रकातील भाडेदरापेक्षा रुग्णवाहिका कमी अथवा मोफत सेवा देऊ शकतात. मात्र नियमानुसार जादा दर आकारणी करता येत नाही. प्रादेशिक परिवहन विभागाचे दरपत्रक रुग्णवाहिकेमध्ये दर्शनी भागात लावणे बंधनकारक असताना बहुतांश वाहनांमध्ये ते लावले जात नाही. त्यामुळे अनेक रुग्णवाहिका चालकांकडून या नियमाचे उल्लंघन होते. सध्याच्या प्रतिकूल परिस्थितीत अनेक रुग्णवाहिकांचे चालक दिवसरात्र सेवा करताना दिसतात. परंतु काही मात्र रुग्णांच्या असहाय्यतेचा गैरफायदा उचलतात.

''देवळा येथील ग्रामीण रुग्णालयातून रुग्ण जिल्हा रुग्णालयात हलवत असताना देवळा रुग्णालयातील अधिग्रहित केलेली रुग्णवाहिका देण्यात आली. रुग्णवाहिकेचे चालकाने माझ्याकडून आणि माझ्याबरोबर असलेल्या रुग्णाकडून प्रत्येकी चार हजार रुपये घेतले. आम्ही प्रादेशिक परिवहन विभागाकडे ई-मेलद्वारे तक्रार दाखल केली असून, आम्हाला न्याय मिळावा आणि संबंधितावर कारवाई व्हावी.''

- सोपान सोनवणे, तक्रारदार, रुग्णाचे नातेवाईक

''नियमापेक्षा जादा दर आकारल्यास नागरिकांनी mh४१@mahatranscom.in या मेल आयडीवर वाहनांच्या नंबरसह तक्रार करण्याचे आवाहन ‘आरटीओ’(RTO)ने केले आहे. रुग्णालयाने अधिग्रहित केलेल्या रुग्णवाहिकेमधून रुग्ण नेल्यास त्याला ठरलेल्या दरानुसार शासन बिल अदा करते. रुग्णांकडून अशी भाडेआकारणी झाली असेल, तर याची चौकशी करून रुग्णवाहिका आणि चालकाचा परवाना रद्द करून गुन्हे दाखल करण्यात येईल.''

-किरण बिडकर, सचिव, प्रादेशिक परिवहन प्राधिकरण तथा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, मालेगाव

(Ambulance drivers charge extra money from patients relatives)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Car Accident: कल्याणीनगर प्रकरणातील अटकेतील डॉक्टरांच्या अडचणी वाढणार? पोलिसांकडून डॉ. तावरेसह हाळनोरच्या निलंबनाचा प्रस्ताव

Rishabh Pant: 'एअरपोर्टवरही जात नव्हतो, कारण...' टी20 वर्ल्ड कप खेळण्यापूर्वी पंतने सांगितला अपघातानंतरचा अनुभव

Pune Porsche Car Accident: कल्याणीनगर अपघातातील आरोपीला मद्य देणाऱ्या कोझी व ब्लॅकच्या मालकांसह इतरांचे जामिनासाठी अर्ज; उद्या सुनावणी

Fact Check: कंगणा राणौतचा अबू सालेमसोबत फोटो व्हायरल झाल्याचा 'तो' दावा खोटा

Pune Porsche Car Accident: बालसुधारगृहात असलेल्या अल्पवयीन आरोपीचा 'असा' आहे दिनक्रम; पहाटे उठून करावी लागते प्रार्थना अन्...

SCROLL FOR NEXT