amit deshmukh esakal
नाशिक

मेडिकल विद्यार्थी आत्महत्या : अमित देशमुखांची चौकशीची घोषणा

सकाळ डिजिटल टीम

नाशिक : नाशिकच्या वसंतराव पवार मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये स्वप्नील शिंदे या शिकाऊ डॉक्टरचा ( doctor) संशयास्पद मृत्यु (death) झाल्याने एकच खळबळ उडाली. याप्रकरणी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख (minister Amit Deshmukh) यांनी चौकशीची घोषणा केली आहे. तसेच या मृत्यूचे नेमके कारण काय? याची अधिकृत माहिती अद्याप उपलब्ध नाही.तसेत याची शासन स्तरावर चौकशी घोषित करण्याच आल्याचे देशमुख यांनी सांगितले आहे.

चौकशीनंतरच या प्रकाराचा लागेल छडा

रॅगिंग या प्रकारात शासनाने नियंत्रण मिळवलं आहे. याबाबत शासनाने प्रतिबंधही घातले आहे. मुळात मृत मुलाची रॅगिंग झाल्याने मृत्यू झाल्याचे पालकांचे म्हणणे आहे. तसेच महाविद्यालय प्रतिनिधीचे याबाबत वेगळे मत आहे. परंतु चौकशीनंतरच याचा तपास लागू शकेल. मेडिकल कॉलेजमधील हा दुर्दवी मृत्यू असून याचे पोस्टमोर्टम व्हायचं आहे. याबाबत त्वरित पालकांशी संवाद साधण्यात येणार असल्याचे अमित देशमुख यांनी सांगितले.

मुलींच्या रॅगिंगचा बळी?

सुत्रांच्या माहितीनुसार कॉलेजमधील काही मुली त्याला मुद्दाम त्रास देत होत्या. त्याचा वारंवार मानसिक छळ केला जात असल्याचा आरोप स्वप्नीलच्या कुटुंबियांनी केला आहे. स्वप्नीलकडे आढळून आलेल्या सुसाइड नोटमध्ये त्याने रॅगिंग करणार्‍यांची नावेही दिली असल्याचा दावा त्याच्या कुटुंबियांनी केला आहे. पोलीसांकडून याबाबत तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोपही करण्यात येत आहे. रॅगिंग प्रकरणातून स्वप्नीलचा घातपात झाल्याचा कुटुंबियांकडून आरोप करण्यात केला आहे. याप्रकरणी दोन मुलींसह कॉलेज प्रशासनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी कुटुंबियांनी केली आहे. कुटुंबियांकडून करण्यात आलेल्या आरोपांचे कॉलेज प्रशासनाकडून खंडन करण्यात आले आहे

आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

स्वप्नील महारु शिंदे (वय २६ रा. मेडीकल कॉलेज) मंगळवार (ता.१७) रोजी सुमारे ७ .३० वाजता मेडिकल कॉलेज येथील ऑपरेशन थिएटरच्या बाजूस असलेल्या वॉशरूम मध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. त्यावर उपचार सुरू होते.स्वप्नील यास रात्री सुमारे १०.३० चे सुमारास डॉ. जितेंद्र खोडीलकर यांनी त्यास मयत घोषित केले. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद आडगाव पोलिस ठाण्यात दाखल आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अंबरनाथमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, काँग्रेसच्या १२ नगरसेवकांचा भाजपप्रवेश; निकालानंतर १८ दिवसात असं काय घडलं?

Grahan 2026 in India: यंदा भारतात कोणकोणती ग्रहणे दिसतील? सुतक वेळ आणि १२ राशींवरील परिणाम जाणून घ्या एका क्लिकवर

LinkedIn: लिंक्डइनच्या धक्कादायक अहवालाने भारतभर खळबळ; ८४% प्रोफेशनल्स ‘वेट अँड वॉच’ मोडमध्ये, नोकरी शोधापासून दूर राहत करियरला ब्रेक

Organ Donate : छपन्न वर्षांच्या हृदयाची चिमुकलीत धडधडली स्पंदने; अवयवदानामुळे त्या मृत्यूनंतरही जिवंत राहिल्या

Latest Maharashtra News Updates Live: हिंगोलीच्या औंढा शहरात गटविकास अधिकाऱ्याची गाढवावरून प्रतिकात्मक धिंड

SCROLL FOR NEXT