amount of 40 thousand was lost from women purse nashik crime esakal
नाशिक

Nashik Crime News : बँकेतून बाहेर पडताच 40 हजारांची रक्कम लंपास

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : बँकेतून बाहेर पडताच महिलेच्या पर्समधून ४० हजारांची रक्कम तीन संशयित महिलांनी लंपास केली.

संबंधित घटना सोमवारी (ता. १४) सकाळी घडली. पीडित महिलेच्या तक्रारीवरून संशयित महिलांविरुद्ध मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. (amount of 40 thousand was lost from women purse nashik crime)

खडकाळी येथील शैला धगाटे यांच्या मुलाचा काही दिवसांत साखरपुडा आहे. त्याच्या तयारीसाठी त्यांनी बँकेतून बचतगटाच्या माध्यमातून ७० हजारांचे कर्ज काढले होते. साखरपुड्याच्या खरेदीसाठी बोधलेनगर येथील बँकेतून पैसे काढण्यासाठी त्या सोमवारी बँकेत गेल्या.

बँकेच्या बाहेरून रिक्षामध्ये बसताच अन्य तीन महिला त्यांना दाटी करत रिक्षात बसल्या. द्वारका चौकात त्या महिला उतरून निघून गेल्या.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

दरम्यान त्यांनी ब्लेडने पर्स कापून ४० हजारांची रक्कम चोरी केली. कर्जाचा हप्ता भरण्यासाठी त्यातील तीन हजारांची रक्कम बाजूला काढण्यासाठी शैला यांनी पर्स उघडली, मात्र रक्कम आढळून आली नाही.

पर्स फाडलेली दिसून आली. चोरी झाल्याची खात्री होताच मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. शहरात महिला चोरट्यांचा सुळसुळाट वाढल्याचे गेल्या काही दिवसांच्या घटनांमुळे स्पष्ट झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Politics: शिंदेसेनेचा राजकीय गाफीलपणा, चालकांचा जीव धोक्यात; पलावा पूल प्रकरण तापलं

Pune News : न्यायालयाने काय बांगड्या घातल्या आहेत का? म्हणत न्यायालयाचा अवमान

Latest Maharashtra News Updates : मोतीलाल नगर वसाहतीचा पुनर्विकास करताना म्हाडाला बांधकाम करून मिळणार

Heavy Rain Alert: विदर्भासाठी अलर्ट! जोरदार पावसाचा इशारा; राज्यातल्या 'या' भागात मुसळधार बरसणार

Manish Kashyap : भाजपला सोडचिठ्ठी दिलेल्या प्रसिद्ध युट्यूबर मनीष कश्यपने सुरू केली नवी राजकीय इनिंग!

SCROLL FOR NEXT