leopard attack esakal
नाशिक

Nashik Leopard Attack: बिबट्याच्या हल्ल्यात 8 वर्षीय बालकाचा मृत्यु

सकाळ वृत्तसेवा

Nashik Leopard Attack : निळवंडी, (ता. दिंडोरी) येथे आठ वर्षीय मुलगा घराच्या ओट्यावर दिवाळी निमित्त पणती लावत असतांना घराच्या आडोशाला दबा धरुन बसलेल्या बिबट्याने मुलावर हल्ला केल्याने मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे.

त्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण आहे. (An 8 year boy died in leopard attack nashik news)

दिंडोरी तालुक्यात बिबट्याने थैमान घातले आहे. पहाटेच्या सुमारास बिबट्याने एका मेंढपाळावर हल्ला केला होता. त्याचा तपास वन विभाग करत असतानाच आज संध्याकाळी ७.३० च्या सुमारास निळवंडी येथे आठ वर्षीय मुलगा गुरु खंडू गवारी हा पणती लावण्यासाठी गेला असता दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याला उचलून नेले.

घराच्या मागच्या बाजूला उसाचे क्षेत्र असून त्या उसामध्ये बिबट्याने त्या मुलाला नेले शोध घेतला असता मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. ‌गेल्या एक वर्षात ही दुसरी घटना असून मागील घटनेतही संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास शाळेतून घरी येत असताना एका शाळकरी मुलावर बिबट्याने हल्ला केला होता त्यात त्यालाही जीव गमवावा लागला.

दिवाळीत घडलेल्या या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भिंतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच वनाधिकारी अशोक काळे हे घटनास्थळी दाखल होऊन मुलाला शवविच्छेदनासाठी दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात आणले. घटनेचा पंचनामा केला असून बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी आवश्यक ते पाऊल उचलणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.

दिंडोरी शहरासह निळवंडी, हातनोरे, वाघाड, जांबुटके, मडकीजांब परिसरात मोठ्या प्रमाणात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहेत. वनविभागाने त्वरित या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सरकारचा आदेश निघाला! ५२ हजार २७६ शिक्षकांसाठी मोठा निर्णय, अशंत: अनुदानावरील शाळांना २० टक्के वाढीव टप्पा अनुदान मंजूर, १ ऑगस्टपासून मिळणार अनुदान

Crime: बनावट क्यूआर कोड अन् फर्म...; बनावट औषधांच्या मोठ्या टोळीचा पर्दाफाश, 'इतका' मुद्देमाल जप्त

Arjun Tendulkar चा खरंच साखरपुडा झाला आहे का? चाहत्याच्या प्रश्नावर सचिन तेंडुलकरने काय दिलं उत्तर? वाचा

Mumbai News: पावसात बेघरांची दैना! मोसमी निवाऱ्यांची कमतरता, उघड्यावर राहणाऱ्यांचे हाल सुरूच

Latest Marathi News Updates: फडणवीसांनी शिंदेंना काम करु दिलं नाही- जरांगे

SCROLL FOR NEXT