Sachin Chandratre giving guidance on classical music in 'Shabdevin Samvadu' programme. esakal
नाशिक

Anand Mahotsav 2022 | शास्त्रीय संगीत टिकविण्यासाठी प्रयत्नांची गरज : सचिन चंद्रात्रे

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : संगीत वेदऋचामधून आलेली भाषा आहे. रागाची बिजे शास्त्रीय संगीतात दडली असून, ही कला टिकविण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्नशील राहावे, असे प्रतिपादन हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत गायक सचिन चंद्रात्रे यांनी केले. बुधवारी (ता. १९) सातपूरच्या ‘सकाळ’ कार्यालयात आनंद महोत्सवांतर्गत ‘शब्देविण संवादु’ हा कार्यक्रम झाला. त्या वेळी चंद्रात्रे यांनी आपल्या संगीताच्या जादूने उपस्थितांना खिळवून ठेवले. (Anand Mahotsav 2022 Effort needed to preserve classical music statement by Master Sachin Chandratre Nashik News)

‘सकाळ’च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादन डॉ. राहुल रनाळकर यांनी श्री. चंद्रात्रे यांचे स्वागत केले. वरिष्ठ व्यवस्थापक (एचआर) संजय पाटील यांनी परिचय करून दिला. त्यानंतर श्री. चंद्रात्रे यांनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत सादर करून शब्दांविना भाषेचे महत्त्व अधोरेखित केले. ‘यमन कल्याण’ रागाने कार्यक्रमाची सुरवात झाली. शब्दांच्या पलीकडे जाण्यासाठी सुरांच्या अलीकडे जावे लागते.

‘स्वर’ आणि ‘ताल’ यातूनच शास्त्रीय संगीताची निर्मिती होते. ‘ध्रृ’ पद गायिकीची सुरवात वेदांपासून झाली असून, ग्वाल्हेर, आग्रा, जयपूर आणि किराणा या घराण्यांनी शास्त्रीय संगीत वेगवेगळ्या शैलीतून सादर केले आहे. पारतंत्र्यात धोक्यात असलेले संगीत ऋषिमुनींनी टिकवून ठेवले. आता यापुढे हे काम आपल्याला करावयाचे असल्याचे श्री. चंद्रात्रे यांनी नमूद केले.

विविध गाण्यांच्या सादरीकरणातून श्री. चंद्रात्रे यांनी शास्त्रीय संगीतातील बारकावे उलगडून दाखविले. एकाहून एक सादर केलेल्या गीतांतून उपस्थितांच्या काळजाचा ठाव घेतला. ‘शुक्रतारा’ या गीताने तर हृदयाची तार छेडली. या वेळी ‘सकाळ’च्या कर्मचाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्‍नांची दिलखुलास उत्तरे श्री. चंद्रात्रे यांनी दिली. ‘सर्वात्मका सर्वेश्‍वरा...’ या कुसुमाग्रजांच्या गीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.

कला भरभरून देते

कला माणसाला भरभरून देते. परंतु, त्यासाठी ‘दर्शन’ आणि ‘प्रदर्शन’ यातील फरक समजायला हवा. थोडं चांगलं केले तरी आपण प्रदर्शन करीत राहतो. त्यामुळे नको त्या दिव्यांनी कलाकाराचे डोळे दिपले जातात. नवकलाकारांनी दुसऱ्यांची गाणी गाण्यापेक्षा स्वत:ची गाणी सादर करावीत. स्वत:ची मैफल रंगविणे हेच खऱ्या शास्त्रीय संगीताचे ‘दर्शन’ आहे, असे चंद्रात्रे यांनी नमूद करीत ‘सिद्धी’ हवी असेल, तर ‘प्रसिद्धी’ सोडावी लागेल, असा सल्ला दिला.

‘सुंदर माझी मराठी’तून उलगडले भाषेचे महत्त्व

माइडं ऱ्हिदम-कंटेट डेव्हलपमेंटच्या तृप्ती चावरे-तिजोरे यांनी ‘सुंदर माझी मराठी’ या छोटेखानी चित्रफितीतून मराठी भाषेचे विविध कंगोरे उलगडले. आवाज आणि उच्चारातून मराठी भाषा समृद्ध होऊन आपल्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण होते. मनापासून तयारी केल्यास मराठी भाषा सहजतेने आत्मसात होईल.

काय म्हणाले चंदात्रे...

- आवाज ही शारीरिक मेहनत

- वेगवेगळे भाव निर्माण करणे म्हणजेच राग

- ओमकारातून शब्दांची निर्मिती

- भारतीय सुरांचा संबंध रागापाशी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian student shot in USA : अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या!

Rohit Sharma: 'अद्भूत कर्णधार, टीम इंडियाला तू शिकवलंस की...' दिनेश कार्तिकचा रोहितच्या नेतृत्वाला सलाम; पाहा Video

30th Fenesta Open Tennis: महाराष्ट्राच्या वैष्णवी अडकरने जिंकले विजेतेपद; मनिष सुरेशकुमार पुरुष विभागात विजेता

सातारा अन् पालघर जिल्ह्यातील दोन न्यायाधीश सेवेतून बडतर्फ; नेमकं प्रकरण काय?

Phulambri Protest : शेतकऱ्यांच्या मदतीवरून काँग्रेस आक्रमक तहसीलदार व काँग्रेस कार्यकर्त्यांत बाचाबाची

SCROLL FOR NEXT