Trainee participating in training camp organized by Breeze Federation of India esakal
नाशिक

Bridge Game : ‘ब्रीज’ खेळास महाविद्यालय स्तरावर मान्यता! : आनंद सामंत

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या खेळांच्या यादीत उच्चस्थानावर विराजमान असलेला ‘ब्रीज’ अर्थात पत्त्यांचा खेळ आता महाविद्यालय स्तरावर खेळण्यास मान्यता मिळाली आहे.

या खेळाला शालेय स्तरावर मान्यता मिळवण्यासाठी आमचे सचोटीने प्रयत्न सुरू असल्याची माहिती ब्रीज फेडरेशन ऑफ इंडियाचे ज्येष्ठ पदाधिकारी आनंद सामंत, सचिव हेमंत पाडे व भारतातील अव्वल खेळाडू अनिल पाध्ये यांनी संयुक्तरित्या पत्रकार परिषदेत दिली. (Anand Samant statement Bridge game recognized at college level nashik news)

ब्रीज फेडरेशन ऑफ इंडियातर्फे गुरुवारी (ता. ३०) शहरातील मित्रविहार येथे शारीरिक शिक्षकांना एक दिवसीय प्रशिक्षण देण्यात आले. याप्रसंगी नाशिक जिल्ह्यातील ८० प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. याप्रसंगी ‘ब्रीज’ चे पदाधिकारी म्हणाले, ब्रीज हा खेळ एशियन गेम्समध्ये समाविष्ट झाला आहे.

येत्या सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या एशियन गेम्सच्या दृष्टीने इंडियन ऑलिंपिक असोसिएशनने खेळांची तयारी सुरू केली आहे. त्यानंतर ऑगस्टमध्ये वर्ल्ड चॅम्पियशनशिप, ज्युनिअर वर्ल्ड चॅम्पयनशिप नेदरलॅण्डमध्ये होणार आहे. थोडक्यात, या खेळामुळे विद्यार्थ्यांचा बुध्दिगुणांक वाढण्यास मदत होते.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

संख्या लक्षात ठेवत विचार करण्याची क्षमता वृद्धिंगत होते. त्यामुळे ‘माईंड जिम्नॅस्टिक’ असलेल्या या खेळास मेवाड विद्यापीठातर्फे मान्यता मिळाली आहे. कोरोना निर्बंधांमुळे अद्याप विद्यापीठ स्तरावर स्पर्धा झालेली नाही. यापुढील काळात त्या होतील. तर शालेय स्तरावर त्याला मान्यता मिळवण्यासाठी संघटनेतर्फे आमचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

ब्रीज स्पर्धा खेळास वयाची कुठलीही मर्यादा नसली तरी चार गटांमध्ये हा खेळ खेळाला जातो. पहिला गट हा ११ ते १६ वर्षे, दुसरा १७ ते २१ वर्षे, तिसरा २२ ते २६ वर्षे आणि २६ ते ३१ वर्षे अशी मान्यता मिळाली आहे. त्यामुळे या चार गटात स्पर्धा होतील, असेही आयोजकांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

Crime News : कसबे सुकेणे हादरले! शाळकरी मुलींच्या अपहरणाचा प्रयत्न, गावकऱ्यांनी आरोपींना दिला चोप

Thane News: मराठीसाठी लढणाऱ्यांवर गुन्हे दाखल झाल्यास स्वराज्य विनामूल्य केस लढणार, ॲड. जय गायकवाड यांची भूमिका

Shravan Pradosh Vrat 2025: यंदाच्या श्रावणात किती प्रदोष व्रत आहेत? जाणून घ्या तारीखा आणि त्यांचे आध्यात्मिक महत्त्व

SCROLL FOR NEXT