police uniform.jpg 
नाशिक

दहा मिनिटांत एएसआय झाले थेट पीआय! आगळ्या-वेगळ्या सोहळ्याची पोलिस दलात चर्चा

सकाळवृत्तसेवा

नाशिक : अन् ते एएसआय झाले थेट पीआय! निवृत्ती सोहळ्याच्या दिवशी मिळाला पीआय म्हणून होण्याचा बहुमान मिळताच त्यांना गगनच ठेंगणं झालं. आगळावेगळा स्वप्नपूर्तीचा हा निवृत्ती सोहळा अलगद उपस्थितीचे डोळ पाणावून गेला...

स्वप्नपूर्तीचा निवृत्ती सोहळा... 

शिक्षण करुन कुठंतरी छान पगाराची नोकरी मिळवावी. मग ती सरकारी असो वा निमसरकारी. मात्र स्वप्न प्रत्येकाचेच असता. काहीजण चांगल्या पगाराची नोकरी मिळवून प्रामाणिकपणे काम करत राहता. त्यातच नोकरीतील बढती म्हणजे कर्मचाऱ्यास आनंदाचा क्षण असतो. नोकरीच्या कार्यकाळात आपले कर्तव्य बजावतांना कार्यकर्तृत्वावर पदे मिळत जातात. अनेकदा ते शक्य होतेच असे नाही. मात्र इच्छेला मरण नसते. मनात ते नेहमी कुठेतरी असतेच. मुंबई नाका पोलिस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्याची हीच भावना ओळखून सहायक उपनिरीक्षकास (एएसआय) थेट वरिष्ठ निरीक्षक (पीआय) पदाचा कार्यभार सोपवला. अर्थात, दहा मिनिटांसाठी का होईना, स्वप्नपूर्तीचा हा निवृत्ती सोहळा अलगद उपस्थितीचे डोळ पाणावून गेला.

हीच ती कामाची पोच पावती

मुंबई नाका पोलिस ठाण्यातील सहाय्यक उपनिरीक्षक रमेश पगार यांचा सेवानिवृत्त सोहळा होता. पोलिस दलात तब्बल ३२ वर्षांची सेवा देतांना त्यांनी शहर विविध ठाण्यात उत्कृष्ट कामगिरी बजावली. शिस्तप्रिय असल्याने त्यांचा दबदबा तेवढा होताही. त्यांचा निवृत्ती सोहळा जरा हटक्या पद्धतीने साजरा झाला. वरिष्ठ निरीक्षक विजय ढमाळ यांनी दहा मिनिटांसाठी पोलिस निरीक्षक पदाच्या खुर्चीचा पदभार पगार यांना देत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी पगार यांना गहिवरून आले. हीच ती कामाची पावती म्हणून त्यांना अश्रू अनावर झाले. वरिष्ठ आणि सहकाऱ्यांमुळे प्रदीर्घ सेवा दिल्याचे पगार यांनी सांगितले. 

या सोहळ्यानंतर पगार दाम्पंत्यास वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या वाहनातून घरी सोडण्यात आले. या आगळ्या-वेगळ्या सोहळ्याची पोलिस दलात चर्चा असून, ही सकारात्मक बाब असल्याचे पोलिस कर्मचाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs RR Live : मुंबई इंडियन्स-राजस्थान रॉयल्स सामना होण्याची शक्यता कमी, थेट गुवाहाटीवरून अपडेट्स, मॅच रद्द झाल्यास काय?

Nashik SIT Press: रुपाली चाकणकरांची चौकशी का नाही? नाशिकमध्ये एसआयटीची पत्रकार परिषद; तेजस्वी सातपुतेंचं स्पष्ट शब्दांत उत्तर

Latest Marathi News Live Update : पुणे शहरातून ड्रग्स जोपर्यंत हद्द हद्दपार होणार

लासलगावच्या हापूसला ‘न्यूयॉर्क’ची हाक; भाभा अणुसंशोधन केंद्र विकिरण प्रक्रियेमुळे पहिल्यांदाच थेट अमेरिकेत निर्यात

IPL 2400 crore loss: आयपीएलला प्रत्येक वर्षाला २४०० कोटींचा फटका बसतोय, पण कसा? मोदीने गणित समजावून सांगितलं

SCROLL FOR NEXT