CM Eknath Shinde & Uddhav Thackeray news esakal
नाशिक

Nashik Political News : नाशिकमध्ये शिवसेनेला बसणार आणखी एक धक्का! वरिष्ठ नेत्यांना महामंडळाचे आमिष?

विक्रांत मते

नाशिक : तेरा माजी नगरसेवकांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्यानंतर आता शिंदे गट दुसरा धक्का देणार आहे. त्यासाठी पुढील वर्षाच्या पहिल्या आठवड्याचा मुहूर्त निश्चित झाला असून, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला धक्का देताना पक्षातील वरिष्ठ नेत्यांना महामंडळाचे आमिष दाखविण्यात आल्याचे बोलले जात आहे. (Another blow to Shiv Sena in Nashik Lure of corporations to senior leaders Nashik Political News)

महाविकास आघाडीच्या सरकारमधून बाहेर पडत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला एकनाथ शिंदे यांनी खिंडार पाडले. खिंडार पाडताना त्यांच्यासह चाळीस आमदार बाहेर पडले. भाजपच्या मदतीने मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे विराजमान झाले, तर उपमुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतंत्र गट स्थापन केल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला चारीमुंड्या चीत करण्यासाठी धक्का तंत्राचा अवलंब सुरू केला आहे.

जून महिन्यात सत्तांतराचे नाट्य घडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या गटाला नाशिकमध्ये फारसे यश मिळाले नाही. त्यामुळे नाशिकमध्ये शिंदे गट भक्कम करण्याची जबाबदारी असलेल्या स्थानिक नेत्यांवर मोठा दबाव होता. अखेरीस मागील आठवड्यात शिंदे गटासाठी आशादायक चित्र निर्माण झाले. जवळपास १३ माजी नगरसेवक आले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत वर्षा निवासस्थानी प्रवेश करत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र केला.

सरकार स्थापन झाल्यानंतर नाशिकमध्ये शिंदे गटासाठी ही मोठी उपलब्धी मानली गेली. त्यानंतर नाशिक शहरात हातपाय पसरण्यासाठी शिंदे गटाने पुन्हा नव्याने कंबर कसली आहे. त्यासाठी पुन्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेवरच धक्का तंत्र अवलंबले जाणार आहे.

हेही वाचा : असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

अनेकांना ‘मिरची‘ झोंबली

तेरा माजी नगरसेवकांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर आता शिल्लक राहिलेल्या वरिष्ठ नेत्यांपैकी काही जण एकनाथ शिंदे गटाच्या संपर्कात आले आहेत. मुळात शिवसेनेत असतानाच निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्या कुटुंबात वाद निर्माण झाले आहे. मात्र, आता शिंदे गट स्थापन झाल्यानंतर किमान हा पर्याय तरी स्वीकारावा असा आग्रह कुटुंबीयांकडून आहे.

त्या व्यतिरिक्त या वरिष्ठ नेत्यांना महामंडळाचे उपाध्यक्षपद देण्याचे आश्वासन मिळाल्याने त्या अनुषंगाने प्रमुख पदाधिकाऱ्यांसह डिसेंबर अखेरीस किंवा जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शिंदे गटात प्रवेश होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शिवसेनेबद्दल अनेकांना निष्ठेचे धडे देताना आता स्वतःच वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याने या वरिष्ठ नेत्यांबद्दल अनेकांना ‘मिरची’ झोंबल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

माेठी बातमी! 'जुन्या थकीत कर्जदारांना दिलासा नाही'; जिल्हा बँकेचा शासनाकडे प्रस्ताव, माेठे अपडेट आले समाेर..

Rishabh Pant record: धडाकेबाज रिषभ पंतने लॉर्ड्सवर रचला इतिहास!, सर विव रिचर्ड्स यांचा 'हा' विक्रम मोडला

Latest Marathi News Updates : पन्हाळगडाचा जागतिक वारसा यादीत समावेश, कोल्हापूरसाठी गौरवाचा क्षण - पालकमंत्री प्रकाश आबिटकर

छत्रपती शिवरायांचा इतिहास जगभर पोहोचणार, UNESCO यादीत पन्हाळगडाचा समावेश; पालकमंत्र्यांनी 'या' घटनेची करुन दिली आठवण

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

SCROLL FOR NEXT