नाशिक

Talathi Exam : तलाठी पेपरफुटीप्रकरणी आणखी एकाला अटक; वनविभागाच्या नागपूर कार्यालयाची उदासीनता

सकाळ वृत्तसेवा

Talathi Exam : म्हसरुळ परिसरात झालेल्या तलाठी पेपरच्या केंद्रावरील हायटेक कॉपीप्रकरणी पोलिसांनी आणखी एकाला येवल्यातून अटक केली आहे. त्यास गुरुवारी (ता. ७) न्यायालयात हजर केले असता, त्यास पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, यापूर्वी अटक करण्यात आलेला मुख्य सूत्रधार गणेश गुसिंगे याने वनविभागाचेही पेपर लिक केल्याच्या संशयावरून त्याबाबत वनविभागाकडे पाठपुरावा करण्यात आला आहे.

परंतु वनविभागाच्या नागपूर कार्यालयाकडून याबाबत कोणतीही माहिती अद्यापपर्यंत शहर पोलिसांना मिळू शकलेली नाही. (Another person arrested in Talathi paper leak case nashik news)

अर्जुन छोटीराम जारवाल (२८, रा. संजरपूरवाडी, ता. वैजापूर, जि. छ. संभाजीनगर) असे येवल्यातून अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. गेल्या १७ ऑगस्टला तलाठी पदासाठीचा पेपर म्हसरुळ केंद्रावर सुरू असताना मुख्य संशयित गणेश गुसिंगे हा हायटेकरित्या परीक्षा केंद्रातील परीक्षार्थी संगीता रामसिंग गुसिंगे (२१) हिला कॉपी पुरवीत होता.

त्यावेळी पोलिसांनी त्यास अटक केली आहे. परीक्षा केंद्रातून संशयित संगीता रामसिंग गुसिंगे ही मुख्य संशयित गणेश गुसिंगे याच्या मोबाईलवर प्रश्नपत्रिका पाठवीत होती. ती प्रश्नपत्रिका संशयित गुसिंगे हा अर्जुन जारवाल यास पाठवत असल्याचे पोलिसांच्या तांत्रिक तपासातून निष्पन्न झाले आहे.

त्यामुळे पोलिस अर्जुनच्या शोधात असताना त्यास संभाजीनगर जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

मुख्य संशयित गणेश सध्या मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे तर, अद्यापही याप्रकरणातील संगीता रामसिंग गुसिंगे, सचिन ऊर्फ जीवन मानसिंग नायमाने, जीवन उर्फ अक्षय विजय काकडवाल, योगेश रामसिंग गुसिंगे, कैलास विजयसिंग बुहरे हे संशयित पसार असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

वनविभागाची उदासीनता

तलाठी पेपरफुटीचा तपास करीत असताना मुख्य संशयित गणेश गुसिंगे याच्या मोबाईलमध्ये शेकडो परीक्षा पेपरचे स्क्रीनशॉट पोलिसांच्या हाती लागले होते. यात वनविभागाच्या पेपरचेही स्क्रीनशॉट होते.

त्याबाबत शहर पोलिसांनी वनविभागाला संबंधित पेपरबाबत विचारणा केली. नाशिक वनविभागाने याबाबत नागपूरच्या वनविभागाच्या मुख्यालयाकडे पाठपुरावा केला आहे. परंतु अद्यापही त्याबाबत कोणतीही माहिती पोलिसांना मिळू शकलेली नाही. यातून वनविभागाची उदासिनताच दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT