'Anti-Motorcycle Theft' Squad of Deputy Commissioner of Police Circle along with two-wheeler thieves and stolen two-wheelers esakal
नाशिक

Anti Motorcycle Theft पथक ॲक्शन मोडमध्ये; 3 दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस

सकाळ वृत्तसेवा

जुने नाशिक : दुचाकी चोरीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिस आयुक्तालयाकडून ‘ॲन्टी मोटरसायकल थेप्ट’ विशेष पथक नियुक्त करण्यात आले आहे.

हे पथक ऍक्शन मोडमध्ये आले आहे.पथकाकडून पाच दिवसात तीन दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहे. तर, दोन जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या. (Anti Motorcycle Theft Squad in action mode 3 Bike Theft Crimes Revealed Nashik Latest Crime News)

पोलिस उपायुक्त परिमंडळ १ मार्गदर्शनातील ‘ॲन्टी मोटरसायकल थेप्ट’ विशेष पथकातील शिपाई संतोष पवार यांना गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक अभिजित सोनवणे, कर्मचारी संतोष पवार, अमित आव्हाड, इरफान शेख, श्रीकृष्ण पडोळ, गोरक्ष साबळे यांनी एनडी पटेल रोड एसटी महामंडळ विभागीय कार्यालय परिसरात सापळा रचून शहानवाज शहाबुद्दीन शेख (१९, रा. खडकाळी) यास अटक केली.

त्याच्याकडून चोरीची दुचाकी जप्त केली. पोलिस ठाण्यात दोन्ही दुचाकी चोरीबाबत गुन्हा दाखल आहे. पुढील कारवाईसाठी संशयितांसह दुचाकी त्यांच्या ताब्यात देण्यात आली. दुचाकी चोरीवर नियंत्रण आणण्यासाठी विशेष करून तयार करण्यात आलेले पथकाने ॲक्शन मोडमध्ये येत पाच दिवसात सलग दुसरी कारवाई केली आहे.

रविवारी (ता. ३०) अशाच प्रकारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक येथून दुचाकी चोर संशयित शरद सुखलाल बडगुजर (रा. पंचशीलनगर, गंजमाळ) यास सापळा रचून ताब्यात घेतले होते. त्याच्याकडून दोन चोरीच्या दुचाकी हस्तगत करण्यात आल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola Crime : पैशांचा पाऊस पाडण्यासाठी अघोरी पूजा! नरबळी दिल्याचा आरोप; अकोल्याच्या युवकाची इंदूरमध्ये हत्या, मांत्रिकाच्या पूजेचे व्हिडिओ आले समोर

Glasses Cleaning Tips : तुम्हीही शर्ट किंवा टिश्यू पेपरने चष्मा पुसता का? वेळीच थांबा! ही एक चूक लेन्स कायमच्या खराब करू शकते; जाणून घ्या योग्य पद्धत

Corporators Protest : सभेची कार्यपत्रिका वेळेत नाही, प्रस्तावांचा तपशीलही गायब; पुणे महापालिकेच्या नगरसचिव विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण

Marathi News Live Updates : जाणून घ्या दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी!

Pune Traffic : प्रयेजा सिटी परिसरातील भुयारी मार्गाच्या कामामुळे मुंबई-बंगळूर महामार्गावरील वाहतुकीत गुरुवारपासून तात्पुरते बदल लागू

SCROLL FOR NEXT