ॲपेक्स रुग्णालयात मेंदूवर शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णासमवेत डॉ. राहुल बिर्ला, डॉ. किरण अहिरे, डॉ. सीमा खैरनार आदी.  esakal
नाशिक

बागलाण तालुक्यात मेंदूवर पहिली शस्त्रक्रिया

अंबादास देवरे

सटाणा (नाशिक) : येथील ॲपेक्स रुग्णालयाचे मुख्य संचालक व निष्णात सर्जन डॉ. किरण अहिरे यांच्या विशेष प्रयत्नातून एका आदिवासी महिलेच्या मेंदूवर अवघड शस्त्रक्रिया करण्यात यश आले आहे. अशी जटिल शस्त्रक्रिया बागलाण तालुक्यात यशस्वी होण्याची ही पहिलीच वेळ असून, ॲपेक्समधील डॉक्टरांच्या टीमवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

शिरसमणी (ता. कळवण) येथील मंजुळा हिरामण गवांदे (वय ५०) ही आदिवासी महिला गेल्या १५ दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात मुल्हेर (ता. बागलाण) गावजवळ दुचाकीवरून पडून गंभीर जखमी झाली होती. त्यांच्या डोक्याला जबर मार लागून त्या बेशुद्ध झाल्या होत्या. जखमी अवस्थेत त्यांना सटाणा येथील ॲपेक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयाचे संचालक ज्येष्ठ सर्जन डॉ. किरण अहिरे यांनी प्रथमोपचार करून सिटीस्कॅन करण्याचा सल्ला दिला.

सिटीस्कॅनमध्ये त्यांच्या मेंदूच्या डाव्या बाजूला रक्ताची मोठी गाठ आढळली. डोक्यात मेंदूजवळ रक्तस्त्राव होऊन गुठळी तयार झाल्यामुळे त्यांची शारीरिक हालचाल मंदावली व त्या कोमात गेल्या होत्या. डॉ. अहिरे यांनी नाशिक येथील न्यूरो सर्जन डॉ. राहुल बिर्ला यांचे मार्गदर्शन घेतले. डॉ. बिर्ला यांनी दिलेल्या टिप्सनुसार डॉ. अहिरे यांनी शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला. डॉ. बिर्ला यांनाही या शस्त्रक्रियेसाठी बोलविण्यात आले. मुंबई- पुण्यासारख्या शहरात होणारी मेंदूवरील ही अवघड शस्त्रक्रिया येथे यशस्वीरित्या पार पडली.

या वेळी त्यांना डॉ. किरण अहिरे, भूलतज्ज्ञ डॉ. पंकज वानखेडे, डॉ. सीमा खैरनार, डॉ. प्रवीण अहिरे, डॉ. योगेश विंचू, डॉ. शुभम अहिरे यांनी सहकार्य केले.

"ग्रामीण भागात ॲपेक्ससारख्या रुग्णालयाने शस्त्रक्रियेची अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे अत्यवस्थ रुग्णाचे प्राण वाचले. बाह्यरूग्ण तपासणीसाठी मी उपलब्ध असेन. अवघड शस्त्रक्रिया करण्याचे धाडस मी केल्याने रुग्णाचे प्राण वाचले व माझाही आत्मविश्‍वास वाढला."

- डॉ. राहुल बिर्ला

"ग्रामीण भागातील रूग्णांना आरोग्य सुविधा मिळावी म्हणून सटाणा शहरात सर्व सोयीसुविधांनी युक्त ॲपेक्स हॉस्पिटलची निर्मिती झाली. काही दुर्धर उपचार अथवा शस्त्रक्रियेसाठी नाशिक, पुणे, मुंबई येथे जावे लागत होते. ती सुविधा ॲपेक्समध्ये पुरवण्याचा प्रयत्न आहे."

- डॉ. किरण अहिरे, संचालक, ॲपेक्स रुग्णालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

OBC आरक्षणात मोठा बदल! दोन महत्त्वाची विधेयके विधानसभेत मंजूर; नव्या कायद्याला हिरवा कंदील, कुणी घेतला निर्णय?

पुणेकरांनो लक्ष द्या! संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्यादरम्यान वाहतुकीत मोठे बदल; कोणते मार्ग बंद राहणार?

Europe Heatwave: युरोपची लाहीलाही! उष्णतेच्या लाटेत होरपळले अनेक देश, १८ शहरांना रेड अलर्ट; फ्रान्समध्ये ५ दिवसात १ हजार मृत्यू

Latest Marathi News Live Update: पश्चिम बंगाल सार्वजनिक सुरक्षा आणि समाजकंटक कारवायांवरील नियंत्रण विधेयक २०२६ विधानसभेत मंजूर

Water Palaces: ऐतिहासिक सौंदर्याचा नजराणा ! भारतातील ५ सर्वात सुंदर 'वॉटर पॅलेस' पाहिलेत का ?

SCROLL FOR NEXT